शेतकरी संघटने तर्फे कु. मानवी भास्कर करमरकर चा सत्कार.

बातमी शेअर करा.

राजुरा २६ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयभीम मित्र मंडळाच्या वतीने भव्य Flashmob Dance कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात तब्बल १६२ महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन कुमारी मानवी करमरकर हिने संविधान चौकात सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर घेण्यात आलेल्या लावणी स्पर्धेत राजुरा संघाने मानवी च्या मार्गदर्शनात ११७ मुली व महिलांच्या सहभागाने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंदवत राजुरा शहराचे नाव लौकिक केले. महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट सादरीकरण घडवून आणले. या उल्लेखनीय कार्याबद्दल कु.मानवी हिचा ॲड. वामनराव चटप,माजी आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित दिलीप देरकर उपनगराध्यक्ष न.प.राजुरा, रमेश नळे नगरसेवक राजुरा, स्वप्नील मोहुर्ले नगरसेवक राजुरा,माजी पं.स.नरेंद्र काकडे, बळीराम खुजे, कपिल इद्दे, पुंडलिक वाढई, घनश्याम खणके, मधुकर चिंचोलकर, योगेश करमणकर, भास्कर करमणकर, मन्सूर सय्यद अली, सौरभ मादासवार ह्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला. मानवी डान्स स्टुडिओ राजुरा च्या माध्यमातून लहान मुलींपासून ते जेष्ठ महिलांना कोरिओग्राफर म्हणून मानवी नृत्यकलेचे प्रशिक्षण देत आहे. विशेषतः महाराष्ट्राची लोककला असलेली लावणीनृत्य यावर ती विशेषत्वाने परिश्रम घेत आहे. यापूर्वी मानवी चा राजुरा दांडिया क्विन व मराठमोळा दांडिया सन्मानाने गुणगौरव केला आहे. सुगम संगीत ग्रुप मधूनही आपली गायनाची आवड ती पूर्ण करीत आहे. चित्रकला व पेंटिंग मध्ये तिला आवड असून नृत्यकलेत करिअर करण्याची तिची तीव्र इच्छा आहे. तिच्या या कलेची दखल घेत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार सुभाष धोटे,नगरध्यक्ष अरुण धोटे आदींसह अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मानवीचा गुणगौरव केला आहे.

किशोर पाडले 95278 27842, राजुरा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *