
माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी विनंती.
ओबीसी सुतार समाजाला विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे!.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना,संस्था,प्रतिष्ठान तर काही प्रमाणात विविध विकास मंच, युवक संघटना सुद्धा समाजात हिरीरीने कार्यरत असतील या सर्वच संघटनेवर कारभारी म्हणून सुशिक्षित उच्चशिक्षित आणि विद्वान हुशार बुद्धिवान समाज बांधवांचीच पदाधिकारी म्हणून निवड केली जाते याच माध्यमातून एका कर्तबगार पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते नंतर हळूहळू समाजात कर्तबगार कर्तृत्ववान आणि कार्यसम्राट,दिग्गज आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणून समाजात नेतेगिरी करतात किंबहुना समाज नेतृत्व म्हणूनच सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात आनंदानेच मानसन्मान मिळवतात.
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे कि,शासनकर्ती जमात बना आपले संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी राजकीय हिस्सेदारी मध्ये सहभाग महत्वाचा ठरतो आणि वैचारिक चळवळ महत्वाची ठरते.विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाची लोकसंख्या राज्यात लक्षणीय असल्याचे सोशल मीडियावर माझ्या वाचण्यात आले आहे आणि सामाजिक संघटनांचा विस्तार हा मात्र राज्यस्तरीय असल्याचे समजले जाते राज्यातील सामाजिक संघटनांची संख्या जवळपास 200 असेल या संघटनांवर शेकडोंच्या संख्येने कर्तबगार,बुद्धिवान,सुशिक्षित,उच्चशिक्षित पदाधिकारी वर्गाची वर्णी लागलेली असेल याच माध्यमातून समाजात अनके दिग्गज नेते आणि युवक नेते उदयास येतात आणि सामाजिक क्षेत्रात नेतेगिरीच्या आवेशात मोठया दिमाखात वावरतात.
समाजात एखादी संघटना स्थापन करून समाजात सर्व समाजमान्य नेतृत्व उदयास येणार नाही त्यासाठी ठोस अजेंडा असावा लागतो आणि विधायक कार्याचा कृतीआराखडा असणे गरजेचे असते त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते.तरुणांसाठी उद्योग व्यवसाय निर्मिती करण्याचा तसेच लग्नाच्या वयाची 30 ते 35 वर्षे उलटून जात आहेत अशा कितीतरी विवाह इच्छुकांचा विवाह जुळवणी हि मोठी गंभीर समस्या समाजात निर्माण होत आहे यावर तोडगा कशा पद्धतीने काढणार याचा खुलासा कोणालाही करता येणार नाही.सोशल मीडियावर समाज नेतेगिरीचे फलक झळकवून फोटोबाजीच्या माध्यमातून समाजात कार्यसम्राट समाज नेतृत्व कोणत्या नैतिक आधारावर उदयास येईल यावर स्वयंघोषित नेत्यांनी स्वतःआत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे.
विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील ओबीसी घटक असतांना समाजात ओबीसी संदर्भात आरक्षण,जनगणना,संविधान तसेच राजकीय हिस्सेदारी राजकीय प्रतिनिधित्व इत्यादी महत्वपूर्ण विषयावर तथाकथित समाज नेत्यांनी राज्यभरात आपापल्या कर्तबगार नेतृत्वाखाली राज्यभरात ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येने समाज बांधवांना एकत्रित करून अभ्यासपूर्ण भाषणबाजी करून उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध करून समाज जागरूकता अभियान राबविण्यात आले काय?.याचा सुद्धा विचार करण्याची नितांत गरज आहे विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान चिकित्सक लोकांनी यावर विचार आणि चिकित्सा करण्याची गरज आहे.
विश्वकर्मीय म्हणून विविध कलागुणसंपन्न गुणधर्म अंगी असणाऱ्या आणि बुद्धिवान सुतार समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी तळागाळातील,उपेक्षित आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना,कष्टकरी समाज बांधवांना गोरगरीब महिलांना राज्यभरात उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले काय?स्वतःला कर्तबगार,कर्तृत्ववान,कार्यसम्राट,दिग्गज,मुरब्बी अनुभवी धुरंधर समाज नेतृत्व समजणाऱ्या तसेच धडाकेबाज,जिगरबाज,तडफदार युवक नेतृत्व समजणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे.विशेषतःसमाजात जे स्वतःला जेष्ठ मार्गदर्शक समजतात त्यांनी सुतार समाजाला कोणत्या प्रकारचे वैचारिक आणि विधायक कार्याबद्दल आणि विकासात्मक कार्याबद्दल थोर मार्गदर्शन करतात त्यांनी याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान तसेच चिकित्सक समाज बांधवांनी यावर सखोल निरीक्षण करणे गरजेचे आहे विशेषतःस्वयंघोषित नेत्यांनी सुतार समाजात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नाहीत कारण समाज जागृत झाला तर मात्र स्वयंघोषित नेत्यांना उजळमाथ्याने नेतेगिरीचा मनमुरादपणे आनंद लुटला येणार नाही.समाजात सुशिक्षित,उच्चशिक्षित आणि बुद्धिवान समाज वर्ग जागृत आणि चिकित्सक असतो अशा लोकांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत असते असा समजदार वर्ग कोणत्याही भूलथापांना कधीही बळी पडणार नाही जे अंधभक्त असतात त्यांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत नसते म्हणूनच असा अचिकित्सक वर्ग फसतो आणि भूलथापांना बळी पडतो यासाठीच समाजाने सतत जागरूक असावे.
राज्यस्तरीय नामकरणाचा मुकूट परिधान करून संघटनांचे पदाधिकारी म्हणून नेतेगिरीच्या आवेशात वावरणाऱ्या समाज नेत्यांकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात ज्यामध्ये सामाजिक सर्वांगीण विकासाठी उद्योग व्यवसाय उभारणी करणे,ओबीसी संदर्भात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करणे,समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी काही विधायक कार्याच्या अपेक्षा असतात.समाजात नेतेगिरी करणारे हुशार दिग्गज समाज नेते आणि युवक नेते अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असतील तर मग समाज कोणाकडून अपेक्षा बाळगणार जर समाजात नेतेगिरीची नैतिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर मग फक्त नावासाठीच आणि मोठेपणा मिळविण्यासाठी समाज नेतेगिरीसाठी हापापलेपणा कशासाठी?
विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्र एकप्रकारे महाकाय सागर आहे याला एखादं छोटंसं डबकं समजू नये.जेवढे खोलवर जाल तेवढेच विषय हाताला लागतील परंतु,स्वयंघोषित पुढाऱ्यांनी विविध विषयांवर समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत कारण समाज जर जागरुक झाला तर आपली समाजातील स्वयंघोषित नेतेगिरी धोक्यात येईल या भीतीने समाज जागृती निर्माण करण्यासाठी कोणताही स्वयंघोषित पुढारी पुढाकार घेण्यासाठी धजावत नाहीत.ओबीसी सुतार समाजात विकासात्मक कार्याच्या बाबतीत राज्यातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्या साठी अर्थात उद्योग व्यवसाय उभारणी करण्या संदर्भात,ओबीसी संदर्भात तसेच राजकीय हिस्सेदारी संदर्भात इत्यादी विधायक कार्याच्या बाबतीत नेतेगिरीचा सुंदर मुखवटा घेऊन फिरणारे महाशय कुठं हरवतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.म्हणूनच म्हणावेसे वाटते कि,विश्वकर्मीय सुतार समाजाला खऱ्या अर्थाने विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या आणि समाजहित जोपासणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे!प्रमोद सूर्यवंशी :-८६०५५६९५२१.चिखली मातृतीर्थ बुलडाणा
