
विशेष प्रतिनिधी – कल्याण परिमडळ 3.पोलीस उपायुक्त यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महापालिका अधिकारी,ट्राफिक पो.उपयुक्त कल्याण, म.विद्युत वि.अधिकारी आणि कल्याण डोंबिवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळ यांची संयुक्त मिटिंग सनई मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती.अनेक मंडळ कार्यकर्ते यांनी रस्ते, खड्डे, पाणी,लाईट,ऍम्ब्युलन्स, मार्ग,महिला सुरक्षा, वैद्यकीय मदत,दारू दुकानें बंदी, असे विविध विषय मांडले.
अण्णासाहेब रोकडे म्हणाले डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीला दारू पिताच कशाला..? तर दारू दुकान बंद करायची गरजच राहणार नाही.राजू रणदिवे म्हणाले उड्डान पुलाचे काम सुरु आहे.त्यांचे लोखंडी सामान हलवावे,कालापिला टॅक्सी,बस बंद कराव्यात. असे अनेक विषय उपस्तित झाले.नवीन मंडळाना जयंतीला परवानगी देऊ नये. मार्ग बदल करण्यात येऊ नये हा मुद्दा का मांडला गेला हे काही कळाले नाही व त्याला पोलिसांनी दुजोरा दिला.खरे तर हा जयंती उत्सव संपूर्ण भारताचा आहे. याला परवानगीची गरजच कशाला हवी.नवीन वस्त्या वाढत जाणार तशी मंडळे वाढणार,काळा नुरूप मिरवणूक मार्ग बदलले गेले पाहिजेत.एप्रिल मध्ये भयानक उन्हाळा असतो म्हणुन वेळत पण बदल झाले पाहिजेत.असे मला वाटते.
डिजे बद्दल आणि प्रखर लाईट झिक झाक लाईट बद्दल कार्यकर्ते आग्रही असतात, करोना काळातही तो होता.पोलिसांचा नाईलाज असतो.डिझेच्या अति आवाजाने अनेकांना अटॅक आलेले आहेत.कान बहिरे झालेत.लहान मुलांवर परिणाम होतो.लाईट मूळे डोळे गणपती व इतर उत्सवात गेलेले आहेत.यात सुधारणा होत गेली पाहीजे असे वाटते.याच अनुषंगाने मिरवणुकीत फटाके वाजवण्यावर बंदी घालावी असा मुद्दा मी उपस्तित करताच कार्यकर्त्यांनी गदारोळ केला.एक दिवस आमच्या बापाचा जयंतीचा असतो. आम्ही फटाके वाजवणारच.फटाके हे भारतीय नाहीत. चीन मध्ये फटाके निर्माण झाले. फटाके कारखाने यांचे वास्तव भयानक आहे.कारखान्यात लहान मुलानं कडून फटाके बनवले जातात. फटाक्याच्या दारू मूळे हाताला जखमा होतात.अनेक रोग होतात.आगी लागून कामगार मरतात.हवा प्रदूषित होते.आवाज प्रदूषण होते.पशु पक्षी यांच्यावर परिणाम होतो.दिवाळी व इतर उत्सवाच्या फटाके अतिश बाजीने अनेक पक्षी शहरातून गायब झालेत.फटाके अतिश बाजीवर करोडो रुपये महाराष्ट्रात खर्च होतात.हा आपला पैसा जातो कुणाकडे.? हे आपल्या लोकांनी लक्षात घ्यावे.संपूर्ण महाराष्ट्रात काही गोष्टीवर विनाकारण खर्च करणे यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळानी विचार केला पाहीजे.गाव खेड्यात आजही अन्याय अत्याचार सुरु आहेत.आजही आपले लोक खेडी सोडण्याचा डॉ.बाबासाहेब यांचा आदेश अमलात आणत नाहीत.खैरलांजी ते परभणी काय झाले..?
देशात-राज्यात संविधान विरोधी,जातीवादी,अत्याचारी सरकार आहे. त्यांनी आपले शिक्षण-नौकऱ्या बंद केल्यात.आपले आमदार खासदार नगरसेवक निवडून येत नाहीत.आरोग्यासाठी आपल्याकडे पैसा नाही.तरुण तरुणी बेकार फिरत आहेत.आता मोर्च्याला लोक येत नाहीत.तरुण अंदोलनात भाग घेत नाहीत.कार्यकर्ता मिळणे मुश्किल झाले आहे.आपले नेते आज कोणाच्या तंबूत आहेत..? बघा विचार करा.
एक वर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधे पणाने साजरी करावी व तो करोडो रुपयाचा पैसा एकत्रित करावा.समाजाने पैसा वाचवावा.हा पैसा आरोग्य,निवडणूक, वाचनालये,अभ्यासिका अशा योग्य ठिकाणी खर्च करावा. परिस्थिती अत्यंत वाईट आहे.सरकार, पोलीस, न्यायालय तुमच्या बाजूने नाहीत.आपले नेते आपले राहिले नाहीत,याचा विचार करा.आता यावर ज्यांना टिका करायची त्यांनी खुशाल करावी. कोणी तरी शाहीर म्हणाला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घ्या. तो पुस्तकात आहे. पुतळ्यात नाही.
…जयभीम
पत्रकार बाबा रामटेके 8097540506,कल्याण,जिल्हा -ठाणे.
