केडीएमटी भरारी पथकाची विना तिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

बातमी शेअर करा.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेत फुकट्या प्रवाशांमध्ये शिस्त लागावी व महसूल वाढीसाठी परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांच्या आदेशानुसार विशेष भरारी पथक कार्यरत करण्यात आले आहे.  
 पथकाची जबाबदारी संतोष हेरोडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या नियोजन व वाहतूक निरीक्षक प्रमोद बागुल यांच्या सूचनेनुसार भरारी पथक प्रमुख संतोष हेरोडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक सदस्य प्रवीण देशमुख, बाळासाहेब एरंडे व राजेंद्र पातकर हे कार्यरत आहेत.  

दि. 20 मे 2026 ते 15 जून 2026 या 25 दिवसांच्या कालावधीत पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत अचानक तपासणी मोहीम राबवून विना तिकीट फुकट्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण ₹14,734/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.चालक वाहक यांचे वैयक्तिक रक्कम व लायसन तपासणी मोहीम राबवली जात आहे.याबाबत भरारी पथक प्रमुख संतोष हेरोडे म्हणाले “मा.परिवहन व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. प्रवाशांना शिस्त लागावी व परिवहनचा महसूल वाढावा हाच उद्देश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *