
सम्राट अशोकाच्या काळात भारत एक बलवान राष्ट्र म्हणून जगात नावाजले गेले.पुढे मनुवादी ब्राह्मणी लोकांनी वेगवेगळ्या जातीत विभाजन करून भारतावर धार्मिक विषमतेच्या माध्यमातून गुलामी लादण्याचा प्रयत्न केला.देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ८५ टक्के लोकांना म्हणजेच स्त्रिया शूद्र अतिशूद्र लोकांना जन्मतःच गुलाम घोषित करणारा वैदिक हिंदू धर्म आमच्या देशाच्या पराभवास कारण ठरला.स्त्री शूद्र अतिशूद्र यांना आंतरराष्ट्रीय युद्धात लढण्याचा शस्त्र धरण्याचा अधिकार इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी नाकारला.शूद्रांच्या हाती शस्त्रे दिली असती ?.तर भारताचा पराभव कुणालाच करता आला नसता.असे निरीक्षण संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंदविले आहे. यामुळे उच्चवर्णीय जातींच्या धार्मिक प्रचार प्रसार यातून मानसिक गुलाम झालेल्या समस्त स्त्री शूद्रांती शूद्र जातींना गुलामीतून मुक्त करण्याचे तत्वद्न्यान महात्मा जोतिबा फुले यांनी भारतात मांडले.
आपल्या पत्नीला आद्य शिक्षिकेचे ऐतिहासिक कर्तव्य सोपवून भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात जोतिबा फुले यांनी केली.आजही हजारो जाती गुलामीत असणाऱ्या भारताची गुलामी ही स्त्री शिक्षणातून आम्ही संपवू शकतो.फुले दांपत्याच्या या दूरदर्शी विचारांना साऱ्या देशात मुंबईच्या आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी भूमिपुत्रांनी ओळखले.म्हणूनच छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील मांडवी कोळीवाड्यात जोतिबा फुले यांना महात्मा ही पदवी आगरी कोळी भंडाऱ्यांकडून देण्यात आली.देशातील अनेक गुलाम जातीतून ज्यांनी २५०० वर्षा पासून नेहमीच स्वातंत्र्यासाठी बंड केले आहे.यात उत्तर कोकणातील म्हणजे अपरान्त प्रदेशातील आजच्या आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र लोकांचा इतिहास अत्यंत महत्वाचा प्रेरणादायी इतिहास आहे.आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि जागतिक आरमाराचे मानकरी म्हणून सम्राट अशोक ते रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या काळात परकीय आक्रमकापासून देशाचे संरक्षण करणारे हे ओबीसी सागरपुत्र म्हणजे आगरी कोळी कराडी भंडारी लोक आहेत.
निसर्गात आजही सागर किनारी भागात आपले अस्तित्व खाड्या बंदरे सागरी जलदुर्ग लेणी यातून जपणारे हे महापराक्रमी लोक त्यांच्या इतिहासासह ब्राह्मण मराठा साहित्यिक इतिहासकार यांच्याकडून नाकारले गेले.याविरोधात उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चजातीयाना प्रश्न विचारण्याची शक्ती गमावलेला आगरी कोळी भंडारी सागरपुत्र समाज पाहताना डोळ्यावर विश्वास बसत नाही.या महापराक्रमी ओबीसी जातींचे डोळे उघडून त्यांच्या हाती मनुस्मृतीचे आदेश डावलून आरमारी शस्त्रे देणारे छत्रपती शिवराय हे शूद्र अतिशूद्र यांचे म्हणजेच रयतेचे राजे होते.जेथे मनुस्मृती समुद्र उल्लंघन पाप आहे असे म्हणत असताना.हजारो वर्षांपासून आगरी कोळी भंडारी लोकांच्या उपजिविकेचे,श्रीमंतीचे आणि आंतरराष्ट्रीय पराक्रमाचे ,विद्येचे केंद्र असलेले सागरी सामर्थ्य ही छत्रपती शिवरायांची आम्हा सागरपुत्रांना महान देणगी होती.या सर्व इतिहासाचा अभ्यास करून त्यावर लिहिणे ही आमची वर्तमान गुलामी नष्ट करण्याचे राष्ट्रीय कार्य आहे.अशा बुद्धिवादी लेखकाना त्यांच्या कार्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.हे मी अत्यंत नम्रतेने आपल्यासमोर मांडत आहे.

आई एकवीरा ही मातृसत्ताक विचारांची अर्थात भारतीय संविधानातील स्त्री पुरुष समानतेची महामाता आहे.याच प्रमाणे ओबीसी नेते दि बा पाटील भारतीय संविधानातील समतेच्या तत्वाने ओबीसी आरक्षण मंडल आयोगाचे समर्थक राष्ट्रीय नेते दि बा पाटील आहेत.यावर खूप काही लिहावे लागेल.बोलावे लागेल.आमच्या ओबीसी जातींच्या अस्मितेची ही महान व्यक्तिमत्वे या देशात होऊन गेली.ती चमत्कारिक आभासी व्यक्तिमत्वे नाहीत.आज कार्ले बौद्ध लेण्यातील आई एकवीरा ट्रस्ट मधील आम्ही आमचे अस्तित्व गमावले आहे.उच्चवर्णीय जातींनी तेथे कब्जा करून आमच्या आईवरील श्रद्धेची,दानपेटीतील कष्टाच्या पैशांची लूट चालवली आहे.आमच्याच पैशातून आमच्या माता भगिनी मुले यांना साधे शौचालयाची सुविधा आमच्याच दानातून होत नसेल?.तर ही धर्माची गुलामी नाही तर काय आहे?
लोकनेते दि बा पाटील यांचे नाव ज्या नवी मुंबई विमानतळास देण्याची मागणी आम्ही करतोय. लाखो कोटींची जमीन आमच्या आगरी कोळी कराडी लोकांचीच होती.साडे बावीस टक्के या फसव्या पॅकेजच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने जबरदस्तीने फसवून आमच्याकडून घेतली.ही गोष्ट उच्चं न्यायालयाने सांगितली.आज ७६ टक्के मालकी उच्चवर्णीय अदानी या उद्योग पतीची झाली.आमची जाहीर फसवणूक करणाऱ्या फडणवीस पवार शिंदे या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांकडे आम्ही लोकनेते दि बा पाटील यांची मागणी करत आहोत.हे शहाणपण आहे की मूर्खपणा? आमच्या डोळ्यासमोर मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचे सरकारी उद्घाटन केले.त्यांना प्रश्न विचारणारा एकही आगरी कोळी भंडारी कराडी तरुण तेथे नव्हता.यामुळे ही नामकरण चळवळ नेतृत्वहीन झाली काय? या सर्व प्रकरणात आम्ही सरकारला प्रश्न विचारणे सोडून दिले आहे.मग तो प्रश्न कुळ कायद्याच्या अंमल बजावणीचा असेल?. सेझ मधील जमिनी लुटण्याचा असेल? किंवा सिडको साडे बारटक्के फसवणूक,साडेबावीस टक्के जमीन फसवणूक असेल? नैना जमीन फसवणूक असेल?मच्छीमार बांधवांची कोस्टल रोड फसवणूक असेल?.आमच्या गावठाण जमीन मालकी हक्कांची फसवणूक असेल?.आम्ही आमचे आमदार खासदार नगरसेवक सरपंच हे सरकार समोर मुके झाले. आम्ही सर्वसामान्य गरीब ओबीसी कधी बोलतच नाही.आमची मुले मुली ही प्रश्न विचारत नाहीत.म्हणूनच अधिक गुलामिकडे जाताना दिसत आहोत..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत.प्रश्न विचारा सरकारला ?
आई एकविरेच्या पेटीत ९९ पैसे आगरी कोळी कराडी भंडारी लोकांच्या दानातून जातात.मग सर्व ट्रस्टी आमचे ओबीसी हवेत.मराठा ब्राह्मण कशाला? नवी मुंबई विमानतळाची इंच इंच जमीन आमच्या ताबा कब्जा वहिवाट आणि मालकीची असताना.मग आमच्या पित्याचे ओबीसी नेत्याचे नाव देण्यासाठी उशीर का होतोय?
जय आई एकवीरा.
जय दि बा .
राजाराम पाटील.8286031463,उरण रायगड.
