अध्यक्षपदी किशोर मोरे,सरचिटणीसपदी संजयकुमार खैरे आणि कोषाध्यक्षपदी सुरेंद्र यादव यांची निवड

विशेष प्रतिनिधी – २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे पुजनीय बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवणारा,त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारा मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचे जाहीर दहन करून या देशातील सर्व महिलांना देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीच अधिकार प्राप्त करून दिले. विषमतेचा नायनाट व समानता प्रस्थापित केली या ऐतिहासिक महिला मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला पुजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावी दिनांक २४ डिसेंबर १९२७ रोजी वास्तव्यास आले होते, त्यांच्या पाऊलखुणा या भूमीला लागल्या आहेत आणि त्या ऐतिहासिक घटनेची नोंद घेत संपूर्ण तालुक्यातील तब्बल ४८ गावातील संघटना एकत्रितपणे चिरंतन स्मरणात राहील असे प्रतीक उभारण्यासाठी एकत्रित झालेले आहेत ही फार मोठी समाधानकारक गोष्ट आहे.
बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी वनमाळी सभागृहात दादर येथे झालेल्या जाहीर सभेत कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली.अध्यक्ष: किशोर मोरे,उपाध्यक्ष: एस.के.खैरे,प्रदीप मोहिते,विद्यानंद पवार,संजय मोरे,सरचिटणीस: संजयकुमार खैरे,चिटणीस:संतोष तांबे, किरण जाधव,किशोर पवार,कोषाध्यक्ष:सुरेंद्र यादव, उपकोषाध्यक्ष: मनोहर जाधव,अंतर्गत हिशोब तपासणीस:अरुण जाधव,मिलिंद तांबे,कार्यकारिणी सभासद:प्रा.संजय खैरे,संदीप जाधव,मिलिंद शिर्के,कुशानंद हळदे,संजय कुडवळकर,राजीव येलवे,शेखर कासारे,राहुल मोरे,विशेष म्हणजे या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक प्रकल्पाला पुर्णत्वास घेऊन जाण्याची सामुहिक शपथ घेतली.सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या सभासदांची कार्यकारिणी जाहीर झाल्याने सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
