
ब्राह्मण इतरांपेक्षा खूप ज्ञानी व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना सर्वच क्षेत्रात जास्त नोकऱ्या दिल्या जातात. वास्तविक तो त्यांच्या योग्यतेचा सन्मानच आहे.असा समज मनुवादी विचारधारेच्या लोकांनी करून ठेवला. म्हणूनच एक म्हण प्रसिद्ध आहे “ब्राह्मण किती ही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ” त्याला राजर्षी शाहू महाराज यांनी खोडून काढण्यासाठी गंगाराम कांबळेंना चहाचे दुकान काढण्यास शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले.ते स्वत: या दुकानात जात व “गंगाराम चहा आण” अशी ऑर्डर पुकारीत.महाराज चहा घेऊ लागल्यामुळे सोबतच्या मंडळींनाही तिथे चहा घेणे भाग पडे.हाताशी असलेली राजसत्ता दलितांच्या वस्त्या सुधारू शकत नसेल, तर त्याचा उपयोग काय ? याची जाणीव असलेला लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांना झाली होती.ते त्यांनी आपल्या संस्थान मध्ये सर्व समाजाला शिक्षणात नोकरीत विशेष सवलती देऊन समान न्याय समान अधिकार दिला हा इतिहास काही लोक विसरतात.
शेतकरी शेतमजूराच्या मुलाने सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली त्यात तो पास झाला तर कशी मानसिकता काम करते त्याचे अनेक उदाहरण वृत्तपत्रात वाचले असतील.शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या शेताऐवजी दुसऱ्याच्या शेतात किंवा शेती व्यवसायात (पशुपालन, मशागत, कापणी इ.) शारीरिक श्रम करून रोख रक्कम किंवा वस्तूंच्या स्वरूपात मजुरी मिळवते.हे मजूर प्रामुख्याने भूमिहीन असून रोजंदारी किंवा हंगामी तत्त्वावर काम करतात.जे लोक शेतीतील विविध कामांसाठी रोजनदारी वर काम करतात, त्यांना शेतमजूर म्हणतात.जमिनीची मशागत,पेरणी, कापणी, पिके काढणे,पशुधन सांभाळणे आणि इतर शेतीविषयक कामे करणे हे मजूर प्रामुख्याने त्यांच्या शारीरिक श्रमावर आणि रोजंदारीवर जगतात. भूमिहीन शेतमजूर ज्यांची स्वतःची जमीन नाही.आणि अल्पभूधारक ज्यांची जमीन कमी आहे आणि जे दुसऱ्यांच्या शेतातही काम करतात.ग्रामीण अर्थव्यवस्थेत हे सर्वात असुरक्षित,असंघटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट मानले जातात.शेतमजूर हे भारतीय शेतीचा कणा आहेत,तरीही त्यांना अनेकदा सामाजिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. यामुळेच त्यांच्या मुलाचे शिक्षण नववी दहावी च्या पुढे जात नाही.ज्याने कोणी जिद्धीने शिक्षण घेतले तरी नोकरी मिळेलच यांची शास्वती नसते. तेव्हा तो जे काम मिळेल ते करून वाटचाल करत असतो.तेव्हा सुरक्षित नोकरी करणाऱ्या सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा उठतो. कारण त्यांच्या मुलांना सर्व सुख सुविधा आणि बौद्धिक प्रशिक्षण देणारे कल्लास लावले असतांना ही विजयी होत नाही, त्यामुळेच त्यांना कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांचा जिद्दीने कष्ट करून मिळविलेला विजय पचत नाही.ते कौतुक तर करत नाहीत, उलट आम्हाला ही आता शेतकरी,शेतमजूर झाले पाहिजे,तरच आमचे मुले स्पर्धा परीक्षेत,पोलीस भरती परीक्षेत पास होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करता, त्याना शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळाली की असे शब्द काय संकेत देत असतात. बुद्धिमान असणे हे विशिष्ट समाजाची जन्मजात मक्तेदारी असते.असा समज त्यांनी सर्वच क्षेत्रात करून ठेवला.तो कसा खोटा आहे हे एका राजाला लोहार पाणक्याने बुद्धिमतेने करून दाखवला.त्यासाठी ही एक बोध कथा वाचा.

एकदा विराटनगरीचा राजा चंद्रभान याने राज्यातील लोकांमध्ये जमिनीचे वाटप केले. त्यांनी शेतकरी व मजूरांना कमी जमीन दिली व ब्राह्मणांना खूप जास्त जमीन दिली. ते पाहून लोकांनी राजाला ‘असे का’ असा प्रश्न केला.राजाने स्पष्टीकरण दिले की, ब्राह्मण इतरांपेक्षा खूप ज्ञानी व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना जास्त जमीन देणे योग्य आहे. वास्तविक तो त्यांच्या योग्यतेचा सन्मानच आहे.ते ऐकून आपली पाळी येण्याची वाट पाहात उभ्या असलेल्या लोहाराला व पाणक्याला राग आला. दोघे मित्रही होते. त्यांनी आपसात बोलून राजाला धडा शिकवण्याचे ठरवले. जेव्हा लोहाराचा नंबर आला तेव्हा त्याला राजाने ‘तुझ्या कामासाठी किती जमीन लागेल?’ असे विचारले. लोहार म्हणाला,’मला लोखंडी घन व कानात जेवढे अंतर आहे तेवढी जमीन पुरेशी आहे.’ हाच प्रश्न पाणक्याला विचारला तर तो म्हणाला, ‘महाराज एका मोटेतील पाण्याने जेवढी जमीन ओली होईल तेवढी जमीन मला पुरेशी आहे.’ राजाला त्यांचे बोलणे समजले नाही पण असे वाटले की, या दोघा मूर्खांनी तर खूपच कमी जमीन मागितली आहे. त्याने त्या सेवकांना त्यांना हवी तेवढी जमीन मोजून देण्याची आज्ञा दिली.
जेव्हा सेवक जमीन मोजू लागले तेव्हा लोहार म्हणाला, ‘माझ्या लोखंडाच्या घनाचा आवाज ज्या जागेपर्यंत ऐकू येईल तिथपर्यंतची जमीन मला हवी.’ पाणक्या म्हणाला, ‘एक मोट पाणी जेवढ्या जमिनीवर शिंपडता येईल तेवढी जमीन मला हवी.’ चकित झालेल्या सेवकांनी ती गोष्ट राजाला सांगितली. राजा म्हणाला, ‘तुम्ही तर खूपच जमीन कमी जमीन मागत होता, आता सेवकांना का त्रास देता? याची शिक्षा तुम्हाला माहीत नाही का?’. दोघे म्हणाले, ‘माहीत आहे महाराज.’ नंतर लोहार म्हणाला, ‘महाराज, मी तर तेवढीच जमीन मागितली जेवढे घन आणि कानात अंतर आहे. सेवक ते ऐकतच नाही. मी चुकीची मागणी केली का?’ नंतर पाणक्या म्हणाला, ‘महाराज, मीही मोटभर पाण्याने जेवढी जमीन ओली होईल तेवढीच जमीन मागितली. त्यात माझी काय चूक?’
राजा लोहाराच्या आणि पाणक्याच्या हुशारीमुळे चकित झाला. त्याला त्यांच्या मर्जीची जमीन मोजून द्यावीच लागली. तो म्हणाला, ‘हे दोघे तर ब्राह्मणांपेक्षाही बुद्धिमान आहेत. यांना प्रत्येकी दहा सुवर्णमुद्रा बक्षीस द्या.’ ते दोघे म्हणाले,’ महाराज, आम्हाला जमीनही नको आणि बक्षीसही नको. आम्ही फक्त हेच सांगू इच्छितो की, आपण स्वतः शेती न करणाऱ्या व इतरांच्या दानावर जगणाऱ्या ब्राह्मणांना जास्त जमीन देत आहात व जो जीवापाड कष्ट करून राज्याला सुखी करतो त्या मजूर,शेतकरी व कारागीरांना कमी जमीन देत आहात.’ हे योग्य न्याय नाही. म्हणूनच आम्ही आमची बुद्धिमत्ता आपल्याला दाखवली.
राजा म्हणाला, ‘बुद्धिमत्ता ही एखाद्या विशिष्ट वर्गाकडेच नसते याची तुम्ही मला जाणीव करून दिली. मला माफ करा. यापुढे मी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाही. असे मी वचन देतो. तसेच यापुढे राज्यकारभारात तुमच्याशीही सल्लामसलत करीन.’ आज कृषीप्रधान भारत देशातील शेतकरी, शेतमजूर यांची कदर केली जात नाही. अति पावसामुळे महापुर येऊन व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप नुकसान करते.पण त्यांची नोंद सरकारी नोकरी करणारे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी स्वतःला खूप बुद्धिमान समजून त्यांची नोंद घेत नाही.ते मात्र नोकरी वर असतांना आणि सेवानिवृत्त नंतर ही शासनाच्या अनेक योजनेचा लाभ घेत असतात. त्यांच्यासाठी सरकारी तिजोरीत असलेला पैसा त्यांच्या मेहनतीने गोळा झाला आहे.असा त्यांचा समज असतो. आणि शेतकरी, शेतमजुरांच्या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीतून जाणारा पैसा फुकट दिला जातो असा त्यांचा एकूण कर्मचारी अधिकारी वर्गाचा समज असतो.आणि तेच सत्ताधारी मंत्रिमंडळात बुद्धीकौशल्य वापरून आम्ही किती बुद्धिमान आहोत हे सिद्ध करतात.
मग काय होते हे आपण पाहिले वाचले असेल की शेतकरी, शेतमजुरांना दिली जाणारी कर्जमाफी देशाचे नुकसान करणारी आहे,आणि उद्योगपतीला दिली जाणारी कर्जमाफी देशाच्या हितकारक आहे. हे रिजर्व बँक चे आर्थिक संचालक सल्लागार सांगतात.ही देशातील बुद्धिमान समाज म्हणून ओळख असणाऱ्या समाजाची खरी बुध्दीमत्ता आहे. ती भारतीय संविधान निर्मात्याने मोडून काढली आहे. पण ती पूर्णपणे निघाली नाही हे इमानदार सेवक,चौकीदार,शेपन्न इंच छाती असणाऱ्या महा पराक्रमी विश्वगुरू ने वेळोवेळी दाखवून दिले आहे. शेतकरी,शेतमजूर कामगार,बेरोजगार तरुणांनी त्याला धडा शिकवला पाहिजे होता.पण प्रत्येक वेळा बुद्धीमत्ता असलेला समाज बुद्धीकौशल्य कट कारस्थान करून बहुसंख्य समाजाची फसवणूक करत आला आहे. त्याला अद्दल घडविण्यासाठी धडा शिकविण्यासाठी लोहार पाणक्या सारखी शेतकरी शेतमजूर पुढे आले पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई,
