मनात अहंकार आणि इतरांप्रति द्वेष नसावा.

बातमी शेअर करा.

 माणसं जन्माला येतात आणि मरतात.ही बाब जगातल्या जवळपास सर्वांना माहित आहे.असे असतांना ही ज्याला आपण शिकलेली माणसे म्हणतो,मग ती बी.एस्सी असेल या बी.ए असेल या बी.कॉम असेल,पिजी झाली असतील, इंजिनिअर,डॉक्टर,वकील,जिल्हाधिकारी,न्यायाधीश, राज्यपाल,मुख्यमंत्री,राष्ट्रपती,प्रधानमंत्री,कोणीही असो शिकलेल्या माणसानी अहंकार बाळगू नये.कोणाचाही द्वेष करू नये.जातीभेद करू नये,धर्म भेद करू नये,कोणाचा अपमान होईल असे वक्तव्य करू नये,ज्यामुळे अनेक मूल, मुली आत्महत्या करतील, खून करतील,पेटून उठतील. आपल्या भारत देशात लोकशाही असल्यामुळे कोणीही सर्व श्रेष्ठ नाही.संविधान हे सर्वांना समान अधिकार देते.त्याच बरोबर संविधान मध्ये मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य देखील सांगितली गेली आहे.प्रशासन, शासन, न्यायालय, आणि न्याय मिळवून देण्यासाठी लोकांपुढे खरं आणि खोटं सांगणारी पत्रकारिता हे चार विभाग सामान्य जनतेला न्याय देणारे आहेत असे प्रामुख्याने समजले जाते.आणि हे सर्व लोकांसाठी आहे. लोकांच्या मताच्या भरवश्यावर शासन तयार होते.त्यामुळे भारतीय समाजात जे काही मूलभूत प्रश्न आहे.ते सोडविण्याची जबाबदारी त्याची आहे.मग त्यात वीज असेल,पाणी असेल,शिक्षण असेल,आरोग्य असेल,या रोजगार असेल,पर्यावरण असेल,सोबतच भ्रष्टाचार मुक्त, शासन,प्रशासन,ठेवण्याची जबाबदारी शासनाची आहे.
    मनात असलेला अहंकार आणि इतरांप्रति असलेली कटुता,स्वार्थ,जातीयता,हे सारे अवगुण माणसाला, माणसापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात.त्यातूनच भ्रष्टाचार जन्मास येतो,तो आला की उच निचतेची भावना तयार होते.त्यामुळे माणूस हा कायद्याला दूर सारण्याचा, लोटण्याचा, समंधित अधिकारी वर्गाला विकत घेण्याचा प्रयत्न करतो.आणि तो व्यक्ती विकला गेला की परत न्याय मिळणे कठीण होते. आणि सामान्य माणूस हतास होतो, निराश होतो.आणि आत्महत्या करतो किंवा खून करतो. संविधानाची काटेकोर पणे अंमलबजावणी झाली,जर अधिकारी वर्गाने कायद्या समोर सर्वांना समान समजून वागणूक दिली,तर लोकांना सहज न्याय मिळेल.पण अलीकडे तर न्याय मागणाऱ्या शिकलेल्या तरुणांना तर काक्रोच म्हटले जाते.शासनातील लोकांनी ज्यांनी आश्वासने दिली विकासा संदर्भात बोलली,ती पूर्ण झाली नाही, उलट बेरोजगारी वाढली,वीज,पाणी,पर्यावरण, रोजगार ही समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.चीफ न्यायाधीश सूर्यकांत सर्वोच न्यायालय भारत यांनी तर शासनाला या तरुण बेरोजगार मुलांची समस्या सोडविण्यासाठी सांगायला हवे होते,तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या पण तसे न होता उलट बेरोजगार तरुण युवकांना कॉकरोच म्हटले ही तरुणाची खिल्ली उडविण्याचा एक प्रकारे प्रकार आहे.आणि तो कॉकरोच  शब्द अभिजित याला लागला तो ही तरुण होता,त्याचा स्वाभिमान जागा झाला,आणि त्यानी पत्रकारिता केली असल्याने त्याच्या मनाला तो शब्द बोचला आणि या शब्दावरूनच,अभिजित दिपके यांनी काक्रोच ला पकडून न्यायधिशाच्या शब्दाला तरुणा पर्यंत,पोहचवीण्याचा प्रयत्न केला.मुलाच्या हृदयाला भिडणारे स्टेटमेंट दिल्यामुळे, आणि तरुणांची खिल्ली होत असल्याची भावना तरुणा मध्ये निर्माण झाल्यामुळे पहाता पहाता, फेसबुक आणि इस्टाग्राम वर तरुणांनी प्रचंड,प्रतिसाद दिला लाखो तरुण पुढे आले आणि “कॉकरोच जनता पार्टी” याचा जन्म झाला.अभिजित दिपके यांनी ती स्थापन केली.
   ती पार्टी तरुणाच्या मनात असलेली खदखद,मुला, मुलींचा,त्याच्या शिक्षणाची एक प्रकारे उडविण्यात आलेली खिल्ली,त्यामुळे त्याच्या हृदयात उफाळून आलेला स्वाभिमान,या सर्व कारणाने त्याचे फालोवर वाढली,आणि पहाता, पहाता लाखो तरुण,तरुणी अभिजित दिपके कडे एक तरुणाचा नेता म्हणून बघायला लागले. त्याच बरोबर लोकांच्या मनात पूर्वी पासून असलेली खदखद ही होती त्यामुळे लोक जुळत गेली,त्याच्या वडिलांना सुरक्षा द्यावी लागली, अभिजितला पण धमकी यायला लागल्या असे सांगितले जाते या सर्व कारणाने मोर्चे,आंदोलने,जागोजागी व्हायला लागली.मुला,मुलींचा प्रतिसाद मिळू लागला आणि पहाता,पहाता अभिजित हा तरुणाचा भविष्याचा विचार करणारे नेता झाला.पुढे काय होईल,काय नाही,हे सांगता येत नाही पण मात्र कुणाच्याही भावनाला ठेच पोहचेल असे वक्तव्य कोणीही करू नये.पण ते न्यायाधीश यांनी काक्रोच म्हटल्या मुळे तरुणाचा अपमान झाला आणि त्याचा स्वाभिमान जागा झाला आणि तरुण पुढे आले ही वास्तविकता आहे.शिका,संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश जेव्हा तरुणांना कळला तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती झाली. ही क्रांती ची सुरवात आहे.
   डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गुलामाला, गुलामीची जाणीव करून दिली म्हणजे तो बंड करून उठेल. हे त्याचे वाक्य आजचा तरुण जो पेटून उठला,जे शब्द सूर्यकांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी वापरलेल्या कॉकरोच या शब्दावर पेटून उठले यावरून सारे लक्षात येईल.म्हणून म्हणतात ना शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा ही बाब खऱ्या अर्थाने अभिजित यांनी मुलांना समजावून सांगितली.तसा तो पत्रकार असल्यामुळे त्याला बऱ्या प्रकारे, न्याय? अन्याय? कळतो यात दुमत नाही.बेरोजगार तरुण मूल,मुली आपल्या न्याय हक्का साठी, रोजगारा साठी शासन,प्रशासननाला कसे धारेवर पकडून आपला प्रश्न मार्गी लावतात ते येणारा पुढील काळ सांगेल.पण न्याय देण्यासाठी न्यायाधीश असतो त्यानी न्यायाच्या बाजूला असले पाहिजे.ज्याच्या वर अन्याय होतो त्याला हीनवू नये.त्याची खिल्ली उडवू नये. न्यायाधीश कडे लोक आशेने पहातात.खिल्ली उडवीणारा न्यायाधीश असेल तर तरुणांनी कुणा कडून अपेक्षा बाळगावी.मुले,मुली स्वाभिमानी बनून उठाव करीत आहेत त्या न्याय मिळवून घेतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी. त्याचे आशास्थान अभिजित दिपके आहे तो तरुणांना कसा न्याय मिळवून देतो,कोणत्या दिशेने घेऊन जातो त्यावर यश,अपयश अवलंबून आहे. पण तरुण मात्र पेटून उठला हे मात्र नक्की! “मनात अहंकार आणि इतरांप्रति द्वेष नसावा.” तरच समान न्याय मिळण्याची शक्यता असते नाहीतर न्याय हा शब्द केवळ कागदावर बरा वाटतो.संविधान सर्वांना समान न्याय देण्यासाठी आहे. चुकीच्या माणसाला धडा शिकविण्यासाठी तरुणांनी सज्ज झाले पाहिजे.आता ज्यांना कॉकरोच म्हटले ती तरुण न्यायासाठी लढण्यास सज्ज असल्याचे अलीकडे दिसत आहे.
जय भारत, जय संविधान.
अविनाश टिपले ९९७०९१७३८९ चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *