शहीद हिराजी पाटील यांना वंदन!

बातमी शेअर करा.

कर्जत शहरातील आमचे मित्र कवी,लेखक,कुणब्याचं पोर चित्रपट निर्माते कोमसाप तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट अँड. गोपाळ शेळके हे मागील 25 वर्षापासून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत व भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून लढणारे अँड.कोतवाल, हिराजी पाटील यांच्या 2 जानेवारी स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करतात जानेवारी 2025 च्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते, तोपर्यंत त्यांचा इतिहास मला माहीत नसल्याने अलिबागच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन या दोन्ही हुतात्म्यांचे जीवन चरित्र वाचून घेतले आणि मैत्री कोणत्या स्तरापर्यंत पोहोचते याची ओळख झाली त्याच बरोबर आपले मित्र कोणत्या स्तरापर्यंत जाऊन गद्दारी करतात याचाही धडा जीवनात मिळाला.

आजच 1 जानेवारीला सायंकाळी अँड.गोपाल शेळके,अँड.संतोष जोहेकर,विकास रणपिसे, मोहिते,निवृत्ती ढाकवळ असे मुरबाड तालुक्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध जत्रा म्हसा गावाजवळील सिध्दगड येथे जाण्यास निघालो. रस्त्यामधून अनेक वाहने नागरिकांनी भरभरून जात होते अँड.भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या नावाचा जयघोष करीत निघाले होते सिध्दगडावर पोहोचताच आगरी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे स्वागत केले यानंतर समाजाच्या मंडळाने सर्वा साठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली होती,यानंतर आम्ही या दोन्ही शहिदांच्या स्मृतीस्थळाकडे चालत  पोहोचलो.तेथे वाहनास बंदी वन खात्याने केली आहे.अतिशय कडाक्याची थंडी होती,शहीदाना नतमस्तक होण्यास 200 दिव्यांग बंधू भगिनी विश्रांतीला बसली होती. स्तंभास वंदन करताना कर्जत पंचायत समितीत कार्यरत असलेले मुरबाड दिव्यांग संघटना पदाधिकारी श्री.शिकें यांनी मला पाहताच सर्व सभासदांना माझा परिचय करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि सुरक्षेबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.त्यांना कधीही अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिका चा वापर कायम करावा,

महिलानी आपल्या सुरक्षेसाठी काय महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करावा. आपल्या कोणाही नातेवाईकांच्या मुलींच्या बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर करावा असे सांगितले तिथून निघताना अँड.कोतवाल आणि हिराजी पाटील यांना ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या त्या ठिकाणी नतमस्तक होण्यास पोहोचलो.अँड.गोपाळ शेळके यांनी तेथील माती सोबत रुमालात पहाटेच्या कर्जत येथील कार्यक्रमास पूजन करण्यासाठी घेतली.याच ठिकाणी जेवणाच्या सामानाची रसद आणावयास खालील गावातील पोलीस पाटलाकडे त्यांच्यातील एका मित्राला अँड.कोतवालानी चिठ्ठी  दिली त्यांच्यावर लावलेल्या रोख बक्षिसाच्या लालसे पोटी खाली पोलीस ठाण्यात पोहोचून सर्व जणांची माहिती दिली आणि गद्दारी केली.पुन्हा पोहोचताच अँड.कोतवाल यांना त्यांनी सांगितले की पोलीस माझे पाठलाग करीत होते. परिस्थितीचा अंदाज करून अँड.कोतवाल यांनी सर्व सहकाऱ्यांना घराकडे निघून जाण्यास विनंती केली, मात्र हिराजी पाटील म्हणाले मित्राला अशा परिस्थितीत सोडून जाणे हे मला योग्य वाटत नाही मी राहणारच आणि पहाटे 6 वाजून दोन मिनिटांनी पोलिसांनी या दोघांना घेरले आणि गोळ्यांचा वर्षाव केला आणि हे दोघे देशासाठी शहीद झाले.हे सर्व ऐकून अंगावर काटे आले तेथून कार्यक्रम स्थळी येताच आगरी समाज मंडळाच्या सचिवांनी अलिबाग होऊन प्रा.डॉ.जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, सोबत अँड.गोपाल शेळके व ॲड.संतोष जोहेकर यांनी व्यासपीठावर यावं असं घोषणा करताच आम्ही व्यासपीठावर पोहोचलो आमचा त्यांनी सन्मान केला,

रात्रीचे 2 वाजले होते, या दोन्ही शहिदांबद्दल गौरवपूर्ण इतिहासाची पाने ऊलगडली आणी जमलेल्या 3000 जनसमुदयास ज्या मध्ये शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्याने आपण सुरक्षित कसे राहायचे याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचा112क्रमांक, महिला व मुली सुरक्षेसाठी,महाराष्ट्र शासन आरोग्य केंद्रातील महिलांना बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिका व बीव्हीजी कंपनीची मोफत सर्वांसाठी अपघाताच्या वेळी 108 रुग्णवाहिकेचा वापर आपत्तीत करा असे मार्गदर्शन केले.आणि अलिबाग तालुक्यातील नागरिकांना शहिदांची माहिती व्हावी यासाठी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना वंदन करण्याची सुरुवात करीत आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रमासाठी आदर्श पतसंस्थेच्या चे संस्थापक चेअरमन श्री.सुरेश पाटील यांनी बँकेचे अद्यावत सभागृह मोफत दिले आहे,रायगडातील शहीदानां वंदन  करण्याची महुर्त मेढ रायगड चा युवक फाउंडेशन ने अलिबागेत रोवली आहे.भारत माताकी जय!

जयपाल पाटील ९६७३७२७२७७,सुरक्षा तज्ञ अलिबाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *