“मानवाला दुःख आहे दुःख घालवण्याची ताकद फक्त विपशना ध्यान साधने मध्येच आहे”

बातमी शेअर करा.

मी या अगोदर खडवली सेंटर. इगतपुरी सेंटर. टिटवाळा सेंटर.या तीन ठिकाणी ध्यान साधना केली आहे.पण माझ्या या अगोदर केलेली ध्यान साधना डोक्यावरून व मनाच्या विरुद्ध दिशेने गेली.त्याचा परिणाम मला दिनाक.27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 ह्या चौथ्या शिबिरामध्ये मिळाला.तो पण पुन्हा खडवली सेंटरमध्ये.मी विपश्यना करण्यासाठी झटपट निर्णय घेतला.या शिबिरामध्ये मला आलेला अनुभव.मनाची एकाग्रता व अधिष्ठांन वरती विश्वास.मनाची एकग्रता वाढवण्याचा प्रयत्न केला. मला चार महिन्यापासून 50 ते 60 % ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले  होते.माझे आत्तापर्यंत खुप पैशे गेले आहेत.तोच ब्लॉक काढण्यासाठी मला चार ते पाच लाख रुपये लागले असते. मी झटपट निर्णय घेतला आणि या शिबिरामध्ये सहभागी झालो.माझा फॉर्म सहा दिवसात कन्फर्म झाला.आणि त्याचा रिझल्ट मला नवव्या दिवशी शिबिरामध्ये मिळाला.एक ते एक 40 पर्यंत ऑपरेशन चालू होतं मला सर्व त्याची जाणीव होत होती. मी जाण्यापूर्वी संकल्प मनाशी केला मला होणारा त्रास कमी झाला पाहिजे.मनाचा दृढ निश्चय करून सकाळी आठ ते नऊ. दुपारी अडीच ते साडेतीन. संध्याकाळी सहा ते सात. सामूहिक साधना केल्याने मिळाला.मी या अगोदर अर्धा तासाच्या वर बसू शकत नव्हतो.ती बैठक मी सव्वा तास दीड तास करू लागलो.आणि त्याचा परिणाम माझ्या ब्लॉकेज निघण्यावर झाला. एक वाजता ब्लॉकेज निघण्यास सुरुवात झाली.ज्या कामासाठी मी आलो आहे होतो. त्या कामांमध्ये मला सफलता मिळाली पाहिजे. त्यासाठी अगोदर मन दृढ निश्चय करून जावे लागते.तेव्हा कुठेतरी चांगला रिझल्ट त्याच सेंटरमध्ये मिळाला.काल मी सर्वांशी बोललो आहे.अक्षरशः निघताना माझ्या डोळ्यात पाणी आले.तुमच्या सर्वांच्या प्रेमा मुळे सेंटर मधून निघू वाटत नव्हतं खूप चांगले दिवस गेले.कोणताही त्रास न जाणवता सर्वांच्या तरंगाने माझे जीवन फुलून निघाले तुमच्या सर्वांची आठवन अविस्मरणीय राहील.

ध्यान साधना शिबिर करून आल्यानंतर धम्म उपासक,अभ्यासक, पत्रकार,कामगार नेते आयु.सागर तायडे व माझे कामगार मित्र आयु.नारायण वानखडे यांनी माझ्या घरी येऊन शिवाजी कोण होता?. हे गोविंद पानसरे लिखित पुस्तक, धम्म ध्वज प्रतीक,गुलाब फुलाचा गुच्छ देऊन माझा सन्मान केला आणि असीच साधना करून निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.हीच मंगल मैत्री.कायम वाढत राहो ही मंगल कामना केली.


आपला…

विपश्यना साधक 

राहुल पवार 9594411867 भांडूप मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *