“प्रबोधनातून समाज परिवर्तन “

बातमी शेअर करा.

खरं पाहिले तर भारतीय समाजात खूप लोक प्रबोधन करणारे आहेत.त्यात गाणे गाणारे असतील, या कथा वाचक असतील,या सुगम संगीत वाले असेल,या कव्वा ली गाणारे असेल या नाटककार असेल,या कवी असतील या भाषण देणारे सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यकर्ते असतील. या अन्य कोणी असतील.आप आपल्या पद्धतीने ही सारी लोक समाजाचे प्रबोधन करीत असतात.ज्याचे कडे जेवढी बुद्धी मत्ता असेल,जी, जी ज्या,ज्या विचार धारेची लोक असतील ती,ती विचार धारा लोकांपर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न करतात.ऐकणारे लाखो,करोडो लोक आहेत.ज्या लोकांची शैली ही लोकांना आकृष्ट करून, त्याच्या हृदया पर्यंत शब्द पोहचविणारी असते लोक तिकडे झुकताना आपल्याला जाणवते.
    भारतीय न्याय संहिता मध्ये हिंसेला प्रतिबंध करण्यात आलेला आहे.अनाचाराला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. छेडछाड ला अटकाव करण्यात आलेली आहे. फसवणूक करणाऱ्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याच बरोबर नशा पाणी घेऊन धुमाकूळ करणाऱ्या साठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. म्हणजे हे सर्व पूर्वीच्या भारतीय दंड संहिता म्हणजे (आय पी सी) मध्ये होते.अलीकडे त्याला भारतीय न्याय संहिता (बी एन एस) मध्ये दिल्या गेलेले आहे. हे अनेकांना माहित आहे.जर प्रबोधनकरानी,आणि प्रशासन,शासनातील लोकांनी या संदर्भात लोकांना योग्य प्रबोधन केले तर देशात होत असलेला कल्लोळ सहज कमी होईल.म्हणजे च प्रबोधनातून समाज परिवर्तन होईल.खरं तर समाज सुखी व्हावा,चांगला घडावा हेच प्रशासन,शासनाचे आदय कर्तव्य आहे.आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण ती जबाबदारी कोणत्या अंगाने खांद्यावर घेतो, आणि लोकांचे प्रबोधन करतो त्यावर लोकांचे हित,अहित अवलंबून आहे.जर लोकांनी खऱ्या अर्थाने भारतीय समाजाचे हित लक्षात घेता वाटचाल केली तर देश हा प्रगतीच्या दिशेने जाईल आणि सर्व भारतीय बांधव सुखी होईल. ही जबाबदारी आपण आपले मूलभूत कर्तव्य म्हणून पार पाडली पाहिजे. म्हणजेच “प्रबोधनातून समाज परिवर्तन” होय.ते आपल्या हातून व्हावे असेच भारतीय नागरिकांना वाटते.”
अनेक लोक भाषणे देतात, कोणी काल्पनिक गोष्टी सांगून त्याना अंधश्रद्धेकडे घेऊन जाते,तर काही वैज्ञानिक दृष्टीकोण सांगून ते कसे कल्पोकल्पीत लोकांना सांगून फसवितात हे सांगितल्या जाते. या प्रबोधन करणाऱ्याच्या मधात ऐकणारा आणि त्या मार्गाने जाणारा मोठा वर्ग आहे तो अशिक्षितही आहे तर काही शिकलेला देखील आहे. खरं तर शिकलेल्या माणसाला वैज्ञानिक दृष्टीकोण समजला पाहिजे पण काहीना पूर्वी पासूनच कानावर काल्पनिक कथा ऐकायला येत असल्यामुळे त्याच्यात बदल होण्यासाठी खूप कालावधी लागतो.जसा मुलगा,मुलगी जन्म झाल्यानंतर त्याला अठरा वर्षानंतर मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे,म्हणजे त्याला स्वतःचे मत कुठे दिले पाहिजे याची जाणीव होते असे म्हणायला हरकत नाही त्याच शिक्षण देखील काही प्रमाणात झालेले असते त्यामुळे तो योग्य अयोग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो. असे असतांना देखील अशोक खरात सारखे भोंदू बाबा हे शिकलेल्या माणसाला आपल्या जाड्यात अडकवितात याला काय म्हणता येईल? 

   भारतात अंधश्रद्धा निर्मूलन चा कायदा आहे असे असतांना देखील हा अशोक खरात आपले जाळे पसरवितो याला नेमके कारण काय असेल हा संशोधनाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे.अलीकडे तो अठरा मार्च पासून जेल मध्ये, वेगवेगळ्या गुन्ह्यात लटकलेला आपल्याला दिसतो.लोकांची फसवणूक करणे हे काहींना सहज जमते,पण तो लोकांची फसवणूक करत आहे हे सांगणे आणि लोकांच्या डोक्यात प्रबोधन करून टाकणे जरा कठीण असते, कारण प्रबोधन करण्यासाठी त्याला उपलब्ध स्टेज हवा असतो. ज्ञान आहे, त्याला सांगताही येते, लोकही कार्यक्रमासाठी येतील पण त्याचे नियोजन करणे,स्टेज उपलब्ध करून देणे, प्रचार, प्रसार करण्यासाठी पैशाची जुळवा, जुळव करणे, वेळ प्रसंगी भोंदू बाबाच्या कार्यकर्त्यासोबत संघर्ष करणे,प्रशासनाला समजावून सांगणे,हे सारे करत असतांना खूप तारेवरची कसरत करावी लागते म्हणजे वेळ,पैसा,श्रम हे सारे त्याला दयावे लागते आणि ते एकट्याचे काम नसल्याने खूप त्रास होतो आणि बऱ्याचदा त्यावर कुटुंबातील लोकांची जबाबदारी असल्यामुळे लोक फारसे पुढे येतांना दिसत नाही त्यामुळे भोंदूगिरी चा बाबा लोकांचा व्यवसाय चालतो ही वास्तविकता आहे. म्हणजे फारसे लोक सार्वजनिक कामा कडे दुर्लक्ष करतात. तसा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असल्यामुळे भारतीय समाजाचे प्रबोधन होण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि शासनाने त्यावर काम करण्याची गरज आहे. तसे पाहिले तर संविधानात मूलभूत कर्तव्या मध्ये आर्टिकल 51 मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासला पाहिजे असे सांगितले आहे.त्यामुळे शासन आणि प्रशासन यांची जबाबदारी जास्त आहे.पण ते मोठया प्रमाणात प्रबोधन करीत नाही काही वैज्ञानिक दृष्टीकोणावर बोलतात यात दुमत नाही पण ते मोठया प्रमाणात व्हायला हवे तरच लोक अंधश्रद्धा मधून बाहेर येतील अन्यथा नाही.

 अविनाश टिपले चंद्रपूर” 9970917389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *