मा.मुख्यमंत्री १ ऑगस्ट, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे जयंती पुर्वी, त्यांचा जन्मदिन ” लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करणार का?

बातमी शेअर करा.

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माॅस्कोत अण्णा भाऊंच्या नावे फिरून आलेले लोक भारतात काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, राष्ट्रीय स्तरावर ” लेखन प्रेरणा दिन ” साजरा करण्यासाठी पाठपुरावा करणार का?  यासाठी मी दि १८ जुलै २०२२ साली काॅ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनी वरील मान्यवर साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले.  परंतु चार वर्षे 

 उलटली तरी माॅस्को, रशियात गेलेल्या तत्कालीन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील मागणी ची अंमलबजावणी करणे तर दूरच पण वरील पत्राला साधे उत्तर द्यायचेही सौजन्य दाखविले नाही.  वरील मंत्र्यांची भाटगिरी करणारे व त्यांच्या सोबत रशिया फिरून आलेले सर्व महान लोक आता तरी वरील मागणीच्या अंमलबजावणीसाठी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्र्यांवर जाहीर सामाजिक दबाव आणतील का?  

भाजपा समर्थक आमदार अमित गोरखे, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन ” लेखन प्रेरणा दिन” होण्यासाठी , विधानसभेत मागणी करणार का…?

याबाबत रशिया फिरून आलेल्या लोकांनी आपली लेखी भुमिका जाहीर करावी! 

 सुबोध मोरे,7709876029.मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *