“बौद्धानी योग्य निर्णय घेतल्यास बेरोजगारी सहज दूर”

बातमी शेअर करा.

 अलीकडे रोजगाराची समस्या वाढत चालली असून,कंत्राटी पद्धतीने जोर पकडल्या मुळे भविष्यात बौध्द मुलांना रोजगार मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे त्यानी स्वतःचा व्यवसाय आणि कारखाना निर्माण करावा. ती क्षमता तुमच्यात आहे. पण आम्ही त्या दिशेने वाटचाल का? करीत नाही. हे समजणे अलीकडे कठीण झाले आहे. अलीकडे प्रत्येक ज़िल्ह्यात नोकरी करणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यानी एका महिन्याचा जरी पगार दिला आणि सधन लोकांनी काही रुपये सढळ हाताने बेरोजगारी दूर करण्यासाठी दान दिले तर सहज एका महिन्यात एक कारखाना सहज उभा राहू शकतो त्यातून कमीत कमी दोन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकतो. त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून दुसरा कारखाना, तिसरा कारखाना उभा करता येईल एवढी क्षमता तुमच्यात आहे. केवळ जयंती च्या माध्यमातून पैसा गोळा करून डीजे लावून नाचणे म्हणजे बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवीने होत नाही. केवळ आम्ही श्रद्धेपोटी हे सारे करतो. आमची श्रद्धा असली पाहिजे, पण ती वैचारिक असली पाहिजे.डोळस असली पाहिजे.आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला रोखण्याचे प्रयत्न सुरु आहे. डोक्यात बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार असेल तर आम्हाला त्याना रोखता येत नाही.हे आम्ही समजून घेण्याची गरज आहे. अलीकडे सरकारी शाळा जवळपास जास्तीत,जास्त बंद होण्याच्या मार्गावार आहे. आपल्यातील काही गरीब असल्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही,असा गरीब वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्याच्या हितासाठी,सुखासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. आपला हेतू केवळ बौद्धाचे हित पाहणे नसून इतरही लोकांचे हित जपण्याचा असला पाहिजे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारत निर्माण करता येऊ शकतो. त्यासाठी त्यानी तुम्हाला शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश वजा सल्ला दिला होता. आम्ही शिकल्या नंतर किती, संघर्ष केला, संघटित आहोत हे आपल्याला सांगण्याची गरज नाही.
    शिका,म्हणजे शिकल्या नंतर आम्हाला किती समजले, कोणत्या दिशेने गेल्यामुळे आम्ही आपले हित, समाजाचे हित आणि देशाचे हित साधणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्त्पन्नाच्या विसावा भाग आपण समाज हितासाठी खर्च करावा असा संदेश वजा सल्ला दिला होता तो देण्यामागील काय? हेतू होता. तो आम्हाला खरच समजला का? समजला असता, तर आज जी गटगटात विभागलेली माणसे आपल्याला दिसली असती का? बारा वाजता असणारी लग्न डीजे च्या तालावर,आणि काही गढूळ पाणी पिऊन तीन साडेतीन वाजता लावली असती का? लहान,लहान मुला, मुलींचे भुकेसाठी रडणे,म्हाताऱ्या महिला,पुरुषांची काळजी आम्हाला वाटली नसती का? काही नशेत असणारी लोक म्हणतात, शादी तो एक ही बार होती है? ठीक आहे. म्हणूनच आपण लोकांना त्रास देता कामा नये. आपल्या मुळे लोकांना त्रास झाला तर ते चिरकाल आठवण ठेवतात. खरं तर अशा मुळे अनेकांच्या कामात व्यत्यय आलेली आहेत.अनेकांच्या तब्बेती बिघडल्यात,अनेका सोबत भांडणे झाली,अनेकांची लग्न नशेत केलेल्या धागंड,धिंगाणा मुळे,मारहाणी मुळे उशिरा लागल्यामुळे तुटलीत,हे सारे कशाचे लक्षण आहे. यासाठी आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका असे म्हटले का? दारू पिऊन आपसात,नशेत संघर्ष करा,असे सांगितले का? यावर चिंतन आणि मनन करून,आत्मपरीक्षण केले पाहिजे. 

    बेरोजगारी चे प्रमाण वाढत आहे. सरकारी शाळा काही जवळपास बंद होण्याच्या मार्गांवर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी दिलेली बुद्ध धम्माची दिक्षा,आणि 16 ऑक्टोबर 1956 ला दिलेली चंद्रपूरला दिक्षा आणि बावीस प्रतिज्ञा आम्ही समजून घेतल्या का? त्यात असणाऱ्या काल्पनिक बाबी नाकारणे,वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारणे,डोळस बनणे,पंचशील,अस्टांग मार्ग स्वीकारणे,आणि शेवटी बुद्धा च्या शिकविणे प्रमाणे वागेन ही बावीसवी प्रतिज्ञा खरच आमच्या तील काही लोकांच्या लक्षात आहे का? हा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे.काहींना बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समजल्या मुळे ते त्या दिशेने जात आहेत, चालत आहेत.पण काही लोक गढूळ पाणी पीत असल्यामुळे,आणि खूप मोठया अविरर्भावात असल्यामुळे,मोठ, मोठ्याने जयभीम म्हणून,गुंडा प्रमाणे आव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चांगल्या लोकांची मानसिकता खराब होऊन या सर्व होत असलेल्या प्रकारामुळे ते दूर राहण्याचा प्रयत्न करतात,ही बाब प्रकर्षाने आम्हाला समजून घेण्याची वेळ आलेली आहे.आम्ही संघटित का? होऊ शकलो नाही,त्याची कारणे काय? लोक बौद्धाना बुद्धिजीवी समजतात,अस असतांना,आमच्यात कटुता का दिसते. अनेक गटतट का? जाणवतात.गटतट निर्माण करणार्यांना समजत नाही का? हे सारे प्रश्न आमच्या समोर बौध्द म्हणून उभे राहतात. 

    बुद्ध गयेतील बुद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात दया म्हणून आंदोलन चालूच आहे.एखाद्या संस्थेला सरकार जागा उपलब्ध करून देते.कारखाना टाकण्यासाठी कर्ज ही देते,काही टक्के सूट ही देते,आणि अनेकांची कर्ज ही माफ करते. हे सारे आपण पहातो आहोत.मग आम्ही आमच्या मुलांची बेरोजगारी दूर करण्यासाठी किती संवेदनशील आहोत याचा विचार कोण करणार? आहेत. गटतटात असणारे नेता,बेरोजगार युवक? या डीजेच्या तालावर,आणि गढूळ पाणी पिऊन बाराचे लग्न तीन वाजता लावणारी माणसे? नेमके कोण? हा अतिशय चिंतनाचा विषय आहे.खरं तर बौद्धा मध्ये सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याची क्षमता असते. ती प्रश्न सोडविले ही जाऊ शकते.फक्त नियोजना चा अभाव आहे.केवळ आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश म्हणजे शिका,संघर्ष करा,आणि संघटित व्हा,हा खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. उत्पना चा विसावा भाग समाजासाठी योग्य ठिकाणी देऊन,योग्य नियोजन करून, बँक,कारखाना, काढून बेरोजगार युवकांना,नोकरी व व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.केवळ बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार डोक्यात घेऊन,शांत पणे विचार करून योग्य कार्य करावे लागेल. “बौद्धानी योग्य निर्णय घेतल्यास बेरोजगारी सहज दूर” होऊ शकते.केवळ आमच्यातील काही लोकांनी अहंकार,आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून समाज हितासाठी,आणि देशाहितासाठी काम करण्याचा निर्धार केला पाहिजे,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे कार्य केले पाहिजे.

अविनाश टिपले- 9970917389,चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *