गाढवे झाली बघा,कालचे घोडेअडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे….

बातमी शेअर करा.

गाढवे झाली बघा, कालचे घोडे
अडवून ठेवले यांनी, चळवळीचे गाडे….

बीन बुडाचे तांबे, कुठे ही लुंडकती
मोजून यांच्या थोबडी, मारावे जोडे….

बाप दिला सोडून, बदलू लागले मायचे नवरे
इमान टाकले विकून, स्वार्थात झाले वेडे…..

काल पर्यंत बोंबलला, रिपब्लिकन ऐक्य हवे
आज मात्र चाटत आहे, कमळीचे जोडे….

तोच शिळा भात अन शिळ्या कढीला फोडणी
प्रसिद्धीसाठी हपापलेले असे बारबोडे…..

लेखणी हातात म्हणून नसते लिहायचे काही ही
विद्रोही मरावे नको कुत्र्याचे मढे…..

लाचार ना माझे शब्द, कविता आणि मी
“राजनच्या ” शब्दांनी जळतील काही बुडे….

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी

9172291448 ( विद्रोही राजन )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *