आगरी कोळी ओबीसी तरुणांनी युजीसी (समानता) कायदा समजून घेणे गरजेचे आहे. :- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

देशातले वातावरण वैदिक ब्राह्मणी हिंदुत्वाने भारलेले आहे.मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे हिंदूंचे शत्रू आहेत. आरक्षणामुळे देशाची प्रगती थांबली आहे. अशाप्रकारचा खोटा प्रचार हिंदुत्वाच्या नावाने जोरात होत आहे.त्यात देशातील ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्येचा ओबीसी म्हणजेच आगरी कोळी कराडी भंडारी माळी या हजारो जाती हिंदू आहेत?. असा प्रचार केला जात आहे.आम्ही ओबीसी हिंदू आहोत.मग आम्हास उच्च हिंदूंकडून त्रास का होत आहे?.
   रोहित वेमुला आणि पायल तडवी अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पालकांनी त्यांच्या न्यायासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिल्यानंतर सत्य बाहेर आले.देशातील उच्चवर्णीय हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी इतर हिंदू ओबीसी एससी एसटी या विद्यार्थ्याचा खून करतात. शोषण करतात.कारण सर्वच प्रमुख पदावर हा उच्चवर्णीय समाज सत्ताधारी आहे.मनुस्मृती समाजरचनेतून हा तिथे सत्ताधारी झालेला आहे.त्यांच्याकडे विशेष बुद्धिमत्ता आहे म्हणून पुढे आलेला नाही.देशाची ही मोठी फसवणूक आहे. देशातील मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे होणारे शोषण हे उच्चवर्णीय हिंदूंकडून होणारे मागास वर्गीय हिंदूंचे शोषण आहे. यात मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांचा हात नाही.भारतीय संविधानाने ही सत्य परिस्थिती विषम मनुवादी स्थितीत शूद्र लोकांचे काय हाल होतात हे समजून अगोदरच सामाजिक न्यायाच्या तत्वाने स्वीकारली होती.यामुळेच सुप्रीम कोर्टाने मागास विद्यार्थ्यावर उच्च जातीच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नवा UGC कायदाच केला.याला आमच्या लाडक्या हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी विरोध केला.आता या उच्च हिंदूंचे आदेश पाळणे एवढाच धर्म आम्हा आगरी कोळी ओबीसी लोकांपुढे उरला होता.
  नवी मुंबई शिळफाटा येथे एका विवाहित आगरी महिलेवर तीन ब्राह्मण पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिला ठार केले.तिच्या न्यायासाठी लढणाऱ्या पालकांनी न्यायासाठी लढा उभा केल्यानंतर,याच उच्च हिंदुनी त्यांना शांत केले. पोटच्या मुलांचे मरण उघड्या डोळ्यांनी पहायचे? ही कसली हिंदुत्वाची गुलाम संस्कृती.हा माझा आगरी कोळी ओबीसी समाजाला प्रश्न आहे?.आगरी कोळी भंडारी ओबीसी समाज खरोखर हिंदू आहे?. तर त्यांच्यावर उच्च जातींचे हिंदू अन्याय का करतात? हा प्रश्न आमच्या सागरी कोळी नेतृत्वाला पडला आहे का?
    आज UGC कायद्यांमुळे एससी एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यावर देखील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चजातीय लोकांकडून अत्याचार होतात.हे धार्मिक विषमतेचे कटुसत्य माननीय सुप्रीम कोर्टाने मान्य केले.देशात आज उच्चवर्णीय हिंदू विरोध ओबीसी हिंदू यांच्यातला संघर्ष जगासमोर आला आहे.अर्थात या सामाजिक न्यायाच्या आंदोलनात ओबीसी हिंदू तरुण उच्चवर्णीय हिंदू ब्राह्मण मराठा वैश्य अदानी अंबानी यांच्याविरोधात उतरणार का?. परवा ठाण्यात UGC कायदा समर्थनार्थ अर्थात देशातील उच्चजातीय लोकांनी लादलेली विषमता संपावी?. म्हणून समस्त एससी एसटी ओबीसी बांधवांनी एक होऊन आंदोलनं केले.मोठ्या संख्येने यात ओबीसी बांधव सहभागी झाले होते.त्याच्या बुद्धिमान निर्णयाची नोंद इतिहास घेईल.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही सामाजिक न्यायाची म्हणजेच खऱ्या साविधानिक राष्ट्रनिर्मानाची घटना घडली.ती उच्चजातीय राजकीय पक्षांनी मांडलेल्या हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र यांची उभी चिरफाड करते.प्रश्न असे आगरी कोळी ओबीसी तरुणांच्या विवेक बुद्धीचा.त्यांना मूर्ख बनविण्याचे काम सर्वच उच्चवर्णीय राजकीय पक्षांनी आतापर्यंत केले आहे.अपवाद आंबेडकरी चळवळ आणि त्याच्या विचारांचे राजकीय पक्ष यांचा आहे.

    जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाची वैचारिक चिरफाड सोशल मीडियावर करण्याचा प्रयत्न मी याअगोदर केला.महाराष्ट्रात मराठे हे ब्राह्मण वैश्य या उच्चजातीय लोकांप्रमाणेच आमचे शोषण करतात.ते सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही.अशी खंबीर भूमिका त्यानंतर सर्वांनी घेतली.आजही अशी भूमिका घेण्याची वेळ आगरी कोळी ओबीसींवर आलेली आहे.
जमीन हक्कांचा आमचा अधिकार आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि आदरणीय नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वात मिळविला.विरोधात उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य सावकार होते.लोकनेते दि बा पाटील यांनी मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील आणि सिडको विरोधात पाच हुतात्मे देऊन आमचे अधिकार मिळविले.वैश्य अदानीच्या “कर लो दुनिया मुठी में” या भूमाफिया वृत्तीस  उरणच्या समुद्रात बुडविले ते लोकनेते दत्ता पाटील यांनी.

   आज मराठा एकनाथ शिंदे यांच्या सिडको नगर विकास खात्यातील अत्याचारा विरोधात आगरी कोळी जमीन गावठाणे,नवी मुंबई विमानतळ येथे आपण लढत आहोत.भाजपा सरकार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतलास देत नाही.अर्थात उच्चवर्णीय हिंदू भाजप चालवतात.आगरी कोळी ओबीसींचे तेथील स्थान शूद्र गुलाम असल्याचेच आहे.काँग्रेस..राष्ट्रवादी हे ब्राह्मण मराठा पक्षच आहेत.तेही आमच्या विरोधातच आहेत.आगरी कोळी भंडारी तरुणांनी निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय उच्चवर्णीय हिंदूंच्या शोषणातून येणाऱ्या पिढ्यांना मुक्त करण्याचा निर्णय आहे.मी आज पन्नाशीत आहे.या लढाईत जीव गेला तरी मी माझी खरी “मुक्ती” म्हणून ती आनंदाने स्वीकारून पुढे निघालो आहे.ही ओबीसींच्या सामाजिक हक्कांची लढाई बुद्ध फुले आंबेडकर दि बा पाटील यांनी आमच्यावर सोपविलेली लढाई आहे.यासाठी पैसा मनुष्यबळ गाड्या साधने,मिडिया कमी पडू देऊ नका..आपल्याकडे मनापासून विनंती करतो आहे.

राजाराम पाटील.८२८६०३१४६३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *