
अ) सनदी अधिकारी,डाॅक्टर्स/इंजिनिअर वगैरे
ब) प्रशासकीय अधिकारी/ राजपत्रित अधिकारी
क) तृतीय श्रेणी कर्मचारीवर्ग/खाजगी कार्यालयाल कर्मचारीवर्ग
ड) चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग/ कामगार /कष्टकरी वर्ग
ड – वर्गातील बौध्द समाज साधारणपणे नाॅन मॅट्रिक शासकीय कार्यालयात चपराशी खाजगी कंपन्यातील कामगार रिक्षा चालक भाजीपाला विक्रेता चाळीत लहान घरात राहणारा.आंबेडकरी आंदोलनात रस्त्यावर उतरणारा आपल्या मोहल्ल्यात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जोरात जयंती साजरा करणारा,बाबासाहेब व संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी होणारा गरीब कट्टर आंबेडकरवादी समाज.
क- वर्गातील बौध्द गरीब आईवडीलांच्या पोटी आलेला स्वत: BMC शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतला पुढे काॅलैज पूर्ण करुन सरकारी सेवेत नोकरी करणारा आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण देणारा ज्या गरीब वस्तीत जन्माला ती वस्ती सोडून ठाणे व बोरिवलीच्या पलिकडे वन बीएच के त राहणारा बायको नोकरी करणारी असेल तर टू बी एच के त राहणारा समाज व नातेवाईकांपासून आलिप्त राहणारा सुरक्षा कवच म्हणून बौध्द समाजाचा ग्रूप तयार करुन धम्मदेसना चे कार्यक्रम करणारा बौध्द समाज.
ब -वर्गातील बौध्द समाज हा क वर्गातील बौध्द समाजाची उत्क्रांती झालेला समाजा हा थोडाफार धनिक वर्ग ह्या धनिक वर्गातील मुलांनी आंतरधर्मीय विवाह करुन स्वत:चे स्वतंत्र संसार थाटलेला समाज ह्या ब वर्गातील बौध्द समाजाचे आई वडील ड वर्गातील लहान मोठ्या भावांच्या घरी राहतात.ब वर्गातील समाज कोणत्याही आंबेडकरी चळवळीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात सहभागी होत नाही कधी जवळपासच्या बुध्द विहारात जात नाही.हा वर्ग प्रामुख्याने गोएंका गुरुजींनी शोध लावलेल्या विपश्यनेत गुरफटलेला समाज.
अ – वर्गातील बौध्द समाज हा सगळ्यात घातकी आणि खोटारडा समाज हा मोठ्या घरांत पाॅश सोसोयटीत राहतो हा वर्ग धनाढ्य आहे.ह्या समाजाकडे स्वत:चे व मुलांचे दाखले महार असतात.ह्या समाजाकडे कधीही धर्मांतरीत बौध्द असे शासकीय दाखले नसतात. परंतु, भोळा भाबडा समाज अशा लोकांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभात व्याख्याने द्यायला बोलावतो.ह्या वर्गातील व्याख्याता जो स्वत: हिंदू महार आहे तो भारत बौध्दमय झाला पाहिजे ह्यावर भली मोठी भाषणे देतो.

सध्या अ व ब वर्गातील बौध्द समाज अर्थात महार समाज सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेयर अट अनुसूचित जातींना लावावी असे निरीक्षण नोंदवल्यांने प्रचंड भेदरून गेलेला आहे.आपल्या मुलांना अनुसूचित जातींच्या प्रवर्गातून परदेशात शिक्षण घेता येणार नाही सनदी अधिकाऱ्यांच्या परिक्षेत मागासवर्गीय म्हणून बसता येणार नाही.डाॅक्टर इंजिनिअर होण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील, ह्या चितेने ग्रासलेले आहे.
शरद आढाव,9833175669,मुंबई.

