चीवर: बौद्ध भिक्खू परिधान करतात ते वस्त्र.
दान: श्रद्धेने आणि सद्भावनेने अर्पण करणे.
कठीण चीवर दानाचे महत्त्व

1. वर्षावास पूर्ण झाल्यानंतर योग्य कालावधीत भिक्खू संघाला चीवर अर्पण केले जाते.
2. हे दान भिक्खू संघाप्रती आदर, कृतज्ञता आणि धम्माप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
3. कठीण चीवर दान ही बौद्ध परंपरेतील विशेष पुण्यकर्म मानली जाते. त्यात दान, त्याग आणि संघाच्या गरजांची पूर्तता यांना महत्त्व आहे.
4. या प्रसंगी भिक्खू संघाकडून धम्मदेसना, प्रवचन आणि धम्मविषयक मार्गदर्शनही केले जाऊ शकते.
थोडक्यात: कठीण चीवरदान म्हणजे वर्षावासानंतरच्या निर्धारित कालावधीत बौद्ध भिक्खू संघाला विशेष पद्धतीने चिवर (वस्त्र) अर्पण करण्याची धार्मिक परंपरा आहे. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा व वर्षावास समाप्तीचा भव्य समारोप होत असतो.

चंद्राच्या शीतल प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात ही तथागत बुद्धांच्या धम्माचा प्रकाश पसरू दे…वर्षावासाच्या समाप्तीनिमित्त आत्मचिंतन,मैत्री, करुणा आणि प्रज्ञेचा संकल्प आपण सर्व धम्म उपासक उपासिका यांनी तथागत बुद्धांनी दिलेल्या समतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि बंधुत्वाच्या मार्गवर चालत आपले जीवन अधिक सुंदर व मंगलमय बनवूया.असे पूज्य भंते बोधानंद महाथेरो यांनी वर्षावास पवारणा तथा कठीण चिवरदान समारोप करतांना सांगितले.
सिद्धार्थ फाउंडेशन मुंबई (रजिस्टर) च्या वतीने वर्षवास पवारणा तथा कठीणची सोहळा बौद्ध धम्मातील वर्षातून एकदाच येणारा हा उत्सव म्हणजे वर्षावास पवारांना तथा कठीण चिवरदान सोहळा होय. हे कठीण चिवरदान उत्सव समस्त बौद्ध राष्ट्र आणि उत्साहाने संपन्न करत असतात. आपल्या जीवनात कुशल कर्म संपादित करत असतात हा पवित्र आणि महान उत्सव सोहळा सिद्धार्थ फाउंडेशन मुंबई द्वारा सिद्धार्थ गार्डन बुद्ध विहार टागोर नगर ग्रुप नंबर सहा विक्रोली पूर्व मुंबई या ठिकाणी मोठया उत्सवात संपन्न झाला.
यावेळी जपान,म्यामणार,विविध देशातील पूज्य भंतेजी व मुंबई भिक्खूसंघाचे अध्यक्ष पूज्य शांतीरत्न,आर.के.लामा, महानाम सह भिक्खूसंघाची उपस्थिती होती. त्यांनी ही कठीण चिवरदानाचे महत्व समजून सांगितले.त्यांच्या देशात अंधश्रद्धेकडून विवेकाकडे,द्वेषाकडून मैत्रीकडे,अज्ञानाकडून प्रज्ञेकडे होत असते म्हणून ते देश आज प्रगती पथा वर यशस्वी वाटचाल करिता आहेत. कारण तथागत बुद्धांच्या धम्माची शिकवणीची ते अंमलबजावणी करतात. असे पूज्य भंते आर के लामा यांनी सांगितले.

सर्वांना कठीण चिवरदान व वर्षावास समाप्तीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा! दिल्या आणि १ नोव्हेंबर २०२६ ला विश्वशांती बुद्ध विहार मानपाडा येथे कठीण चिवरदान व वर्षावास समारोपास सर्व धम्म उपासक उपाशीक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आमंत्रण दिले. सिद्धार्थ गार्डन बुद्ध विहार कठीण चिवरदान समारोप कार्यक्रमात पुण्यवान दानशूर धम्म उपासक उपासिका यांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवून कुशल कर्म संपादित केले. शेवटी पूज्य भंते बोधानंद यांनी शरणथे व मंगल मैत्री गाथा घेऊन सर्वांना मंगल कामना व्यक्त केली.

पूज्य भिक्खू बोधानंद महाथेरो व भिक्खू संघाच्या कठीण चिवरदान समारोपात विक्रोळी,पूर्व,पश्चिम, कांजूरमार्ग, भांडुप,मुलुंड धम्म उपासिकांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवली. त्याचं बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, पनवेल विविध ठिकाणावरून धम्म उपासक उपासिका सफेद वस्त्र परिधान करून आले होते. त्यामुळे विक्रोळी टागोर नगर मध्ये सिद्धार्थ गार्डन बुद्ध विहारातील कठीण चिवरदान समारोप प्रेरणादायी लक्षवेदी ठरला.अनेक धम्म उपासक उपसिकांनी तन,मन,धनाने सहभाग नोंदविला.आणि सिद्धार्थ गार्डन बुद्ध विहार कठीण चिवरदान समारोप कार्यक्रमात पुण्यवान दानशूर धम्म उपासक उपासिका यांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवून कुशल कर्म संपादित केले.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून.


