सुजाता खीर वाटपाने उत्सवात समारोप

विशेष प्रतिनिधी भांडुप मुंबई – वर्षावास समाप्ती साधारणपणे आश्विन पौर्णिमेला होते. २०२६ मध्ये बुद्ध वर्षावासाची समाप्ती २५ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली.अनेक ठिकाणी वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.वर्षावास समाप्तीचे महत्त्व आणि परंपरा प्रत्येक बुद्ध विहारात ग्रंथ वाचून सुरवात केली जाते. त्यांचा सांगता मोठ्या उत्सवात केला जातो. बुद्ध संदेश मंडळ संचालित आम्रपाली बुद्ध विहार (स्थापना १९८५ ) आंबेडकर नगर गावदेवी टेकडी,गावदेवी रोड येथे दरवर्षी ग्रंथ वाचनाचा उपक्रम राबविला जातो. स्थानिक धम्म उपासक धम्म उपासिका मोठ्यासंख्येने बुद्ध विहारात दररोज उपस्थित राहून ज्ञान संपादन करतात.

धम्म उपासिका क्रांती मिलिंद इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचे तीन महीने एक दिवसाचा खाडा न करता जिद्धीने वाचन करून धम्म उपासक उपासिका यांना सोपी भाषेत समजवून सांगण्याचे कुशल पुण्य प्राप्त केले.त्यांचा समारोप सुजाता खीर वाटपाने करण्यात आला.यावेळी भांडुप धम्म उपासिका संघाच्या वतीने क्रांती मिलिंद इंगळे हीचा पंचशील शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर आम्रपाली बुद्ध विहार धम्म उपासिका तुळसाबई गोविंद इंगळे,कोकिळा महादेव बांगर,रेखा नाईक,उषा दशरथ अवचार,महादेव बांगर,दशरथ अवचार तुळशीराम तायडे,जे.पी मोर,सुखदेव मेढे,सह अनेक धम्म उपासक उपासिका यांनी विशेष मेहनत घेऊन वर्षावास तीन महीने राबविला. त्यामुळे आज त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. भांडुप धम्म उपासिका संघाच्या सुनिता उदेभान तायडे,ज्योती दिलीप थाटे,चंद्रकला सागर तायडे,छाया पांडुरंग पवार आणि धम्म उपासक प्रचारक अभ्यासक सागर रामभाऊ तायडे यांनी वर्षावास समारोपा निमिती आम्रपाली बुद्ध विहाराला भेट देऊन सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले. या प्रसंगी त्यांना दैनिक मुक्तनायक कोल्हापूर,आणि दैनिक बहुजन सौरभ नागपूर च्या विशेष अंकाचे वाटप केले.

सागर तायडे यांस कडून


