वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई रमेश भाई सांगारे, यांच्या पुढाकाराने दरवर्षी केदारे चौक (गाढव नाका) भांडुप येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असतो.114 वॉर्ड अध्यक्ष सीमाताई इंगळे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विश्वास सरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करतांना विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि मान्यवरउपस्थित होते.यावेळी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विश्वासभाऊ सरदार म्हणाले की प्रजासत्ताक दिन म्हणजे सत्य नारायण महापूजा घालण्याचा दिन झाला आहे.त्या विरोधात आपल्याला पंधरा दिवस एकत्र येऊन जनजागृती केली पाहिजे. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार,महिला पुरुष समानता हे समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. उद्या शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलामुलींना विचारले की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर सत्य नारायण महापूजा घालण्याची सार्वजनिक सुट्टीचा दिवस असे सांगितले जाईल. यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नेत्यांना बहुजन समाजात प्रबोधन करण्याची अवशक्ता आहे असे विश्वासभाऊ सरदार अध्यक्ष ईशान्य मुंबई जिल्हा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. ज्येष्ट नेते जगन्नाथ बावा,मधुकर सोरटे,भगवान साळवे,अनिता कांबळे,दिव्या विनोद गवई पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने इंग्रजीत उत्तम भाषण केले,तर जिज्ञासा संतोष गायकवाड सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने शेर शायरी करून सर्वांना खडबडून जागे केले. सहयादी शाळेत ही तिचे जोरदार भाषण झाले.
आयोजक आणि उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई रमेश भाई सांगारे,ज्येष्ट साहित्यिक लक्ष्मण देठे,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट नेते भगवान साळवे,ज्येष्ठ नेते शामराव रिकीबे,भास्कर तुपे,ज्येष्ठ नेते अरुण रुके,ज्येष्ठ साहित्यिक निर्भीड पत्रकार सागर भाऊ तायडे,दिलीप गायकवाड,अरुण तायडे,मारुती कांबळे,वंचित महिला आघाडी अध्यक्ष अनिता कांबळे,सीमाताई इंगळे महिला अध्यक्ष वॉर्ड क्रमांक ११४,यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गौतम मोरे कवी गायक,नागेश खैरमोडे अध्यक्ष वॉर्ड क्रमांक ११३,जितेंद्र थाटे,अनिता गायकवाड,फेरीवाला संघटना पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती कांबळे यांनी सूत्र संचालन केले तर रमेश भाई सांगारे,आयोजक आणि उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई यांनी आभार मानले.