
विशेष प्रतिनिधी भांडुप – भारतीय बौद्ध महासभा संस्थापक : बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर.आम्रपाली बुद्ध विहार महिला शाखा क्रमांक ६,माता रमाबाई आंबेडकर नगर नंबर १.वॉटर टँक रोड भांडुप पश्चिम मुंबई.येथे उपरोक्त महिला शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा.या तीन महिन्याच्या वर्षावास प्रवासामध्ये धम्म प्रवचन मालिका तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे पठण केले जाते. आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा तसेच उपोसथ दिन व वर्षावासाचे औचित्य साधून. “हरित आम्रपाली बुद्ध विहार” (माझं विहार स्वच्छ विहार हरित आणि सुंदर विहार) अभियाना अंतर्गत बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजता.वरिष्ठ पोलीस निरीक्षण भांडुप मान.सपनाताई क्षीरसागर,महिला पोलीस अधिकारी हांडेताई, विनय जाधव साहेब त्यांचे पोलीस सहकारी कर्मचारी आणि विभागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जेष्ट कार्यकर्ते मधुकरजी सोरटे साहेब, आम्रपाली बुद्ध विहार परिवारातील संपूर्ण परिवार सदस्य यांच्या उपस्थित.विभागातील प्रतिष्ठित नागरिकांच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वर्षावासाचे पहिले पुष्पगुंपण्यात आले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षण भांडुप सपनाताई क्षीरसागर,महिला पोलीस अधिकारी हांडेताई,यांचा अंजलीताई सोनताटे अध्यक्ष यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन बुद्ध विहारात सत्कार करण्यात आला.

यावेळी विभागातील प्रतिष्ठित जेष्ट नागरिक मधुकर सोरटे,अध्यक्षा-अंजलीताई सोनताटे,सरचिटणीस सारिकाताई काकडे,कोषाध्यक्ष शोभाताई थोरात,नंदाताई साठे,बागेश्री ताई वाघमारे, प्रतिभाताई आटकर,प्रभाताई अंकुश, बेबीताई कांबळे,निर्मलाताई राऊत,सविताताई हेमके, विद्याताई खडसे,कुसुमताई नाटेकर,संध्याताई भिडे, नंदिनीताई घनवट, बौद्धाचार्य सुनील सोनताटे गुरुजी आणि विभागातील रहिवासी बालक बालिका मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील सोनताटे गुरुजी बौद्धाचार्य यांनी केले तर सारिका ताई काकडे यांनी आभार व्यक्त केले.
सुनील सोनताटे गुरुजी बौद्धाचार्य ९९८७८१९६१५,भांडुप यांस कडून

