
नियतीने फक्त एवढा हट्ट पुरवावा..
जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा …!!धृ!!
दगडाची जशी सुंदर मूर्ती घडविली
शील, सदाचाराने ही काया मढविली…
मातीत जीव भरणारा कुंभार दिसावा…
जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा…!!१!!
इवल्याश्या रोपट्याचे संगोपन करावे.
बहारदार वृक्ष जसे गगणी भिडावे..
भिरभीरत्या पाखरांचा जो हक्काचा विसावा
जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा…!!२!!
प्रत्येक गुरुची असते एकच इच्छा खरी…
माझ्या हुनी व्हावा माझा शिष्य भारी…
मनी सदा सद् भाव आणि प्रेमाचा ओलावा…
जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा…!!३!!
गुरु म्हणजे असतो अथांग आभाळ..
सुंदर बाग फुलविणारे रान खडकाळ…
रुपेशा तुला ना लागेल कधी त्याचा सुगावा…
जन्मोजन्मी हाच माझा गुरु असावा…!!४!!
कवी -रुपेश अनिल साखरे
८१६९४५७६७६,दिंडेगांव (तुळजापूर)
माझ्या सारख्या दगडाला आकार देण्यात ज्यांचे अमूल्य योगदान आहे.
असे माझे गुरु सागर तायडे गुरुजी यांना हे काव्यपुष्प समर्पित


