शब्दांचा गंध दरवळणारी सुगंधी चंदन व्हावी कविता..

बातमी शेअर करा.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मी घ्यावी लेखणी लिहावे शब्द अन गुरूला वंदन व्हावी कविता..

काळोखात धरावा मी गुरूंचा हात अन प्रकाश देणार आसमंत व्हावी कविता…

अन म्हणावं घे झेप रिजव शब्द पुरोगामी अशी बुद्धिवंत व्हावी कविता..

प्रतिगाम्यावरही तेवढेच प्रेम अशी निखळ अन निर्मळ व्हावी कविता..

धरणीच काळीज चिरत चिखलतून प्रेम फुलवणारी कमळ व्हावी कविता..

मी धरावा हट्ट अन पुरवावा तुम्ही
अशी विलोभणी नितळ व्हावी कविता..

गुरु लक्ष्मणाच्या शब्दांसवे शब्द रुजावे अशीच माझी लेखणी व्हावी कविता..

गुरु शिष्याच अनमोल नात गौतम मोरे
डोळे मिटल्यावर ही देखणी व्हावी कविता..

कवी /गायक-गौतम भीमराव मोरे
   भांडुप (पच्चिम) मो. 9604702659


कविवर्य लक्ष्मण देठे गुरुजीस समर्पित आपणास गुरु पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *