
कॉ.शरद पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सामाजिक संघर्षावर आधारित “स्त्री- शूद्रांचा राजा” हे,त्यांनी लिहिलेलं पहिलं आणि शेवटचं नाटक मुंबईच्या सागर तायडे व विजय सातपुतेंच्या “सरहपा प्रकाशना” तर्फे १९९९ साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर हॉलमध्ये प्रकाशित केले होते.या नाटकात एक अस्पृश्य कन्या सिता,त्यांची आई बहिणाबाईंनी श्रीशैलमच्या देऊळात शिवाजी महाराजांना प्रतीप्रश्न केला होता की, ‘तुकोबांसारख्या संताचं युध्द आध्यात्मिक समतेचं होतं.आपण,महाराज,सामाजिक समतेचं प्रत्यक्ष युध्द करणार आहात. ब्राह्मणांना तुकोबा चालले नाहीत.मग तुकोबांपुढे जाणारे शिवबा कसे चालतील?’.महाराज यावर काही काळ स्तब्ध होतात….
बहिणाबाई पुढे म्हणतात : ‘सामाजिक समतेचं युध्द जिंकलं जात नसतं ; ते धारातीर्थी पडण्याकरताच लढलं जात असतं!.महाराज,हे युध्द लढणारे बलीसारखे राजे बळी गेले!’.
त्यावर महाराज उत्तरतात : मग,माझ्या पाईकांच- सैनिकांचं काय?
बहिणाबाई म्हणतात: ते तुमच्या बरोबर हिंदवी स्वराज्यापुरते रहातील.स्वराज्य स्थापल्यानंतर पुढे जेव्हा स्त्रीशूद्रांच्या स्वराज्याचं महायुध्द तुम्ही सुरु कराल,तेव्हा तुमचे बहुतेक पाईक तुम्हाला राजे न मानणार्या ब्राह्मणांमागे, देशमुख सरदारांमागे जातील….!
शिवाजी महाराज : हि तूमची भविष्यवाणी समजायची का?
बहिणाबाई स्तब्ध रहातात…!
शिवाजी महाराज पुढे विचारतात : त्यावर उपाय काय?
बहिणाबाई : महाराज सामाजिक समतेची लढाई तुम्ही लढणार आहात, उपायही तुम्हाला शोधावे लागतील!
शिवाजी महाराज : माई, यावर माझा आराखडा तयार आहे.
वैदिक राजाभिषेक केल्याशिवाय उत्तरदक्षिणेच्या शाह्या,ब्राह्मण अन् मराठे सरदार मला राजा मानणार नाहीत.तो होऊ नये म्हणून ब्रह्मवृ़ंद आताच विरोधात उभा राहिला आहे.त्याला भारंभार धन देऊनच जिकावं लागणार आहे.परंतु या वैदिक राजाभिषेकाने माझा कार्यभाग साधणार नाही. ब्राह्मण अन् देशमुखांचा साधेल.माझ्या कार्यभागासाठी मला तांत्रिक राजाभिषेक ; त्यानंतर करावा लागेल….!
शिवाजी महाराजांचे हे मनोदय व भावी कार्यसिध्दीसाठी करावे लागणारे उपाय ऐकून बहिणाबाई दीर्घ श्वास सोडतात.त्यांना महाराजांची चिंता वाटू लागते.त्यांचा थकलेला देह अधिकच थकलेला व गतप्राण झाल्यासारख्या महाराजांना वाटतो…!
बहिणाबाईंना चरणस्पर्श करुन जड अंत:करणाने महाराज श्रीशैलम् वरुन निघतात व स्वराज्यात परततात.अगदी तशाच मनस्थितीत व अतिशय जड अंत:करणाने “मी सावित्रीबाई जोतीराव फुले” या दुरदर्शन मालिकेची सर्व टिम या मालिकेला विदाई देत आहे.व सर्वसामान्य जनता बहिणाबाईंच्या रुपाने,चिंताग्रस्त बनली आहे.या अनुषंगाने व ओघाने आलेचं की, :- “तुकोबा, शिवबा जेथे सनातन्यांना चालले नाहीत, तेथे शिवबांच्या पुढे जाणारी, जोतीराव फुले साकारणारे,व सावित्रीबाईंचा शैक्षणिक संघर्ष दाखवणारी मालिका कशी चालेल ?. कारण,आपल्या देशातील उच्चवर्णिय समाज अजूनही सामाजिकदृष्ट्र्या पुराणप्रिय आहे. सनातनी व कर्मठ आहे.स्वत:ची जरी त्यांनी शैक्षणिक व भौतिक प्रगती साध्य केली असली तरी, निम्नवर्णिय – निम्नजातिय समाज अजुनही त्यांचा गुलाम रहावा,अंधश्रद्धाळू रहावा असेच त्यांना आजही वाटते.म्हणून हि लोकप्रिय मालिका बंद पाडण्याचा घाट त्यांनी घातला आहे.परिणामी, “मी सावित्रीबाई जोतीराव फुले” ही मालिका बंद पाडली जाणं, यात नवल ते काय?” कारण,सामाजिक समतेची लढाई जेथे धारातिर्थी पडण्यासाठीच लढली जाते. त्याप्रमाणे सामाजिक समतेचा संघर्ष चित्रित करणारे सिनेमे,धारावाहिक, मालिका याही धारातिर्थीच पडतात,हा आपल्या देशाचा इतिहास आहे.
उदाहरणार्थ : १) पहरेदार पिया की.२) महाकाली अंत ही आरंभ है!,३) जोधा अकबर,४) पृथ्वी वल्लभ,५) सखाराम बाइंडर.(विजय तेंडुलकर),६) महाचैत्र,७)किचकवध,८) पहारेकरी,९) पेशवे बाजीराव,१०) स्वाभीमान,११) देवमाणूस अजून बर्याच काही…
पुस्तकांमध्ये :- १) झोत( रावसाहेब कसबे),२) रिडल्स ऑफ राम आणि कृष्ण,3) देशाचे दुष्मण.( दिनकरराव जवळकर),४) लज्जा ( कादंबरी प्रकारात तस्लिमा नसलिन), ५) प्रा.मा.म.देशमुखांचे “मध्ययुगिन भारताचा इतिहास”, ६) शिवाजी हिंदु किंग ऑफ इस्लामी.क इंडिया.(जेम्स लेन),७) द सैटेनिक व्हर्सेस.(सलमान रश्दी),८) सच्ची रामायण (पेरियार रामस्वामी),९) नाइन अवर्स टू रामा (गांधी हत्तेच्या पार्श्वभुमीवर.)
प्रतिप्रश्न अजूनही अनुत्तरित आहे! :
राजाराम तुळसाबाई सूर्यवंशी.-९५० ३८६ ७६०२.

