
नमन तुला शाहीरा
साहित्याच्या जगी गाजली,
तुझ्या लेखणीची धार…
महाराष्टाच्या लोकशाहिरा
नमन तुला शतवार…
कवनामधुनी तुझ्या चमकली,
शिवबाची तलवार….
महाराष्ट्राच्या लोकशाहीरा
नमन तुला शतवार …||ध्रु||
घेऊनी शिक्षण बहुजनांनी
व्हावे शूर सूदन्यानी,
शेषनागाच्या डोई धरणी…
खोटी ठरली वाणी…२
कष्टकऱ्यांचा असे मनगटी,
या पृथ्वीची भार….||१||
लढली ऐसी तुच लढाई,
संयुक्त महाराष्ट्राची…
न्याय मिळावा, मिळावी भाकर,
सकाळांना कष्टाची…२
मालकशाही, मुजुमगिरीचा,
केला तु संहार….||२||
येती अंगावरती शहारे ,
नवल तयाचे वाटे…
अजरामर ते जगी जाहले,
अण्णाभाऊ साठे.. २
शाहीर वाल्मीक सदा वर्णितो,
तुझी थोरवी फार…||३||
महाराष्ट्राच्या लोकशाहीरा,
नमन तुला शतवार…३
रचना
शाहीर वाल्मीक फाजगे
खेडगावकर मो.८६००११४१९३
खेडेगांव, ता.चाळीसगाव, जि.जळगांव

