चला नीट NEET /CET/TET ला म्हणू या नाही- मग सर्व काही नीट होईल.

बातमी शेअर करा.

चला नीट NEET /CET/TET ला म्हणू या नाही मग सर्व काही नीट होईल. सेवानिवृत्त -व्हीजेटीआय.- VJTI मुंबई- सुधीर जाधव–नळवाडीकर यांच्याकडून ऐका की कसे व्हायचे /व्हावे उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन

वारंवार नीट व तत्सम पेपर फुटी होतेय,या विकतच्या मनस्तापाचे उत्तर अगदी सोपे आहे:तमाम इंटरंन्स टेस्ट / प्रवेश परीक्षा  बिलकुल नकोत! उच्च शिक्षणाचे ॲडमिशन फक्त इयत्ता १२ वी (HSC) अंतिम परीक्षेत मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांच्या आधारेच मिळावे पूर्वीसारखे.३० हून अधिक वर्षे मुंबईतील १३९ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या (सन १८८७ पासून) महाराष्ट्र शासन अनुदानित एका नामांकित   स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात आम्ही  कार्यरत होतो.असे म्हणा की प्रश्न पत्रिका छपाईचा कार्यकारी नियंत्रक होते.अत्यंत गोपनीय जागेत टायपिस्ट, गणीतीय व तांत्रिक प्रुफरिडर, मुद्रक, छापिल प्रश्नपत्रिकांचे ब्लॉकवाईज – रोलनंबर वाईज पॅकेट पॅकिंग वाले, परिक्षा वर्गात असे पॅकेट नीटपणे निर्धारित वेळेत पोचते करणारे व वर्गातील एका परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या  समोर गोपनीय पॅकेट उघडून प्रश्न पत्रिकांचे वर्गात वितरण करणे ही जोखमीची जबाबदारी आहे.केवळ इयत्ता १२ वी (HSC) मधील PCM/PCB गुणांच्या गुणवत्तायादीवर प्रवेश मिळत असे.त्यानंतरच नाट्य सुरू झाले आणि कोचिंग क्लासेसचे व्यापारीकरण झपाट्याने वाढू लागले.पण राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा- NEET यातील मोठी विडंबना अशी की भारतातील एकही विद्यापीठ जगातील अव्वल १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवू शकलेले नाही.हो पण लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
    भारताने योग्य निर्णय घेतले तर ही प्रचंड लोकसंख्या आपल्या देशाची सर्वात मोठी राष्ट्रीय ताकद ठरू शकते.वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET आणि तत्सम प्रवेश परीक्षांना पर्याय काय असावा? उत्तर एकच NEET / CET / SET / NET / TET अशा प्रवेश परीक्षा रद्द करा.आणि पूर्वीसारखे  १२ वी HSC मार्गांच्या आधारे PCM/PCB इत्यादी मार्कावर आधारित ॲडमिशन मेरिटनुसार व निर्धारित राखीव जागा बाबतचे सर्व नियम पाळून दिले जावेत.एखाद्ये शिक्षणतज्ज्ञ  म्हणतील की चाळणी परिक्षा हवीच. तर त्यांना विनंती अशी की जे काही  अतिरिक्त ज्ञान थर तुम्हाला द्यायचे असेल तर ते १३ पर्यंतच्या स्टेबल इयत्तेत समाविष्ट करावे. निदान अशाने तरी शिक्षणाचा दर्जा सुधारतो काय ते पाहू.  


सुधीर जाधव,नळवाडीकर
,९८६९४१५५३३, सेवानिवृत्त व्हीजेटीआय.(VJTI) मुंबई (लेखक : ssjvjti@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *