मिरांश यांचा प्रथम वाढदिवस मोठ्या थाटात साजरा.

मुंबई : मिरांश ममता मयूर आढाव यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कवी सुभाष आढाव यांचे बकुबाई प्रकाशनाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक रानपाखरं बालकाव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न. मिरांश यांचा प्रथम वाढदिवस मोठ्या थाटात श्री गोवंडी गावदेवी ट्रस्ट बालवाडी सभागृह, गोवंडी मुंबई येथे साजरा करण्यात आला.ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या हस्ते सुभाष आढाव यांच्या पहिल्या पुस्तकाचे ‘रानपाखरं’ या बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.प्रफुल्ल चव्हाण होते.
बालकविता लिहिण्यासाठी निरागस मनाची गरज असते, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो,आंबेडकरी कवी केवळ आक्रोश करतो ही भावना चुकीची असून तो सुद्धा निरागस असतो, त्याच्या कवितेतेत सुद्धा बालपणाच्या आठवणी असतात, त्याव्दारे तो व्यक्त होत असतो. कवी सुभाष आढाव यांच्या कवितेत सुद्धा हेच भाव आहेत. बालकविता ही कोणाची मिरासदारी नाही. तर सर्वाची एक उस्फूर्त भावना असते. सहज साधी बालकविता लिहिणे अवघड असते, पण कवी सुभाष आढाव यांनी सहज पेलली आहे. असे साहित्यिक बी.अनिल तथा अनिल भालेराव रानपाखरं या बाल काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अनुषंगाने म्हणाले. ॲड.जालिंदर कांबळे,कामगार नेते सागर तायडे,लोकशाहीर वामनराव घोरपडे, डॉ.विजय मोरे, भिमसेन तपासे या मान्यवरांच्या उपस्थितीत मिरांश यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि रानपाखरं बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

तसेच ह्याच कार्यक्रमात स्वप्नाली सुरेश आढाव यांचाही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. पंडित जाधव, अरुण साळवे, अशोक गायकवाड यांनीही सुभाष आढाव यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुभाष आढाव यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित जालिंदर कांबळे यांनी स्व: लिखित कविता सादर केली.शाहीर सुखदेव जाधव यांनी बुध्द गीत, ममता मयूर आढाव यांनी रानपाखरं बालकाव्य संग्रहातील भरारी कवितेस चाल लावून सादर केली. भरारी कवितेस सर्व उपस्थितांनी दाद दिली.वाहवा मिळाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी भोरे यांनी केले. कार्यक्रमास जयश्री राजेंद्र घायवट, सुनिता राजेंद्र शिशुपाल, विमल निवृत्ती घायवट, संगिता बाळू रणदिवे, बृ.मुं.म.पा.चे माजी नगरसेवक अरूण कांबळे, नगरसेवक-गटनेता विजय उबाळे यांनी उपस्थिती दर्शविली. लखन पगारे,बबन तुपेरे, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब भोसले, माजी नगरसेवक ॲड.संजय गायकवाड ,ॲड.विशाखा काळे, जयश्री दडस, सुरेश बागडे उपस्थित होते.कवी,साहित्यिक,रसिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सुभाष आढाव ७४९९४१३०८६ गोवंडी मुंबई यांस कडून


