महाड क्रांती शताब्दी महोत्सवाची सुरवात “एक ओंजळ समतेसाठी..” या अभियानाने उत्साहात साजरी करण्यात आली. 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 13 मार्च 2026 रोजी मुंबई पत्रकार संघाच्या सभागृहा मध्ये महाड क्रांती शताब्दी महोत्सवाची सुरवात “एक ओंजळ समतेसाठी..” अशा एका अभिनव अभियानाने सुरू करण्यात आली.यावेळी भारतीय संविधानाची प्रास्ताविका प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी वाचून सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक भान असलेले प्रमुख वक्ते मान.किरण माने हे होते. त्याच बरोबर मुंबई विद्यापिठाचे पत्रकारिता विभागप्रमुख डॉ.सूंदर राजदीप हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मुंबई पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप चव्हाण होते.जेष्ठ पत्रकार तसेच आंबेडकर चळवळीचे अभ्यासक दिवाकर शेजवळ यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिशादर्शक असे आपले विचार व्यक्त केले.समान संधी अभियानाचे अध्यक्ष सुनील कदम यांनी कार्यक्रमाची भूमिका प्रभावीपणे मांडणी केली.

  कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ट नेते साहित्यिक अर्जुन डांगळे,माजी मंत्री हुसेन दलवाई,पॅथर सुरेश पगारे, अनेक मान्यवरासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत,साहित्यिक,पत्रकार व कामगार नेते उपस्थित होते.कार्यकर्माचे सूत्रसंचालन राजू रोटे आणि अनघा जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी नामदेव साबळे,गजानन सिरसाट प्रमोद नाईक,संजय कांबळे, ऍड. जालिंदर यादव,यांनी विशेष कष्ट घेतले.

“एक ओंजळ समतेसाठी..” ही थीम घेऊन महाड क्रांती शताब्दी महोत्सव वर्ष भर विभागा विभागात राबविण्याचा संकल्प समान संधी अभियान च्या वतीने करण्यात आला.अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम झाल्यावर असे कार्यक्रम आता गरजेचे असून ते आपण सर्व मिळून महाराष्ट्रभर घ्यावेत ही भावना व्यक्त केली.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *