
विशेष प्रतिनिधी – महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला यावर्षी ९९ वर्षे पूर्ण होत असून आपण १०० व्या वर्षात प्रवेश करत आहोत. हा केवळ सत्याग्रहाचा नव्हे, तर त्या ऐतिहासिक परिषदेलाही १०० वर्षे पूर्ण होण्याचा टप्पा आहे. १९ व २० मार्च १९२७ रोजी गाडीतळ,महाड येथे ही ऐतिहासिक परिषद झाली होती, ज्यातून समतेच्या लढ्याला नवे बळ मिळाले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः १९ मार्च हा दिवस अस्पृश्यांचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यासाठी महाड येथे येत असत,असे मूकनायक मधील बातम्यांमधून स्पष्ट होते.या ऐतिहासिक स्मृती जिवंत ठेवण्यासाठी गेल्या ८ वर्षांपासून “शिवराय ते भीमराय समता मार्च” आपण आयोजित करत आहोत. यावर्षी या मार्चचे ९ वे वर्ष असून आता तो दशकाकडे वाटचाल करत आहे.
१९ मार्च २०२६ दुपारी ३ वाजता समता मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन क्रांतीस्तंभ-चवदार तळे-बाजारपेठ मार्गे भगवानदास बेकरी मागील गाडीतळ येथे पोहोचेल.याच ऐतिहासिक स्थळी, जिथे ९९ वर्षांपूर्वी परिषद झाली होती, तेथे सायंकाळी ५ वाजल्यापासून सभा व चळवळीतील गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि महाडमधील सर्व आंबेडकरी विचारांच्या संस्था संघटना एकत्र आल्या आहेत. महाडमधील सर्व आंबेडकरी कार्यकर्ते,संघटना आणि समताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यात सहभागी होत आहेत.
चला,इतिहासाच्या या महान भूमीवर पुन्हा एकदा समतेची ज्योत प्रज्वलित करूया! “शिवराय ते भीमराय समता मार्च” या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला सहकारी नागेश जाधव –७०४५६१८९६१,(संविधान प्रचारक) महाड यांच्याशी संपर्क करावा.
सागर तायडे यांस कडून

