घरे गावठाण हक्कांबाबत आगरी कोळी ओबीसींची गुलामी.- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

कोकणातील आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन कुणबी आदिवासी या मनुस्मृतीनुसार शूद्र अतिशूद्र जाती या मानसिकदृष्ट्या गुलाम मानसिकतेत जगत आहेत.उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा क्षत्रिय वैश्य यांना शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यावर अधिकार गाजविणारा जो “धर्म” शिकवला गेला त्याचे नाव “वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्म” होय. ओबीसींच्या अन्याय अत्याचारांचा पाढा वाचत असताना.आपल्या मानसिकतेतील दोष उघड करणे गरजेचे आहे.अन्यथा ओबीसींच्या मनातील गुलामीचा दोष शोधून त्यावर उपाय शोधणे कधीच शक्य होणार नाही.
  २०१६/१७ मध्ये मुंबई मधील सर्वात महागड्या म्हणजे दहा कोटी रुपये प्रति गुंठा बाजारभाव असलेल्या जमिनी लुटण्यासाठी SRA प्रकल्प राबविण्याचा निर्णय आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन कोळीवाडे आगरी वाडे, भंडारवाडे ईस्ट इंडियनवाडे,आदिवासी पाडे यांच्या बाबतीत तत्कालीन महाराष्ट्र शासनाने घेतला. याविषयी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा आमदार चांगले आहे की वाईट असे बोलला नाही.परंतु ज्यांची जमीन ज्यांची मातृभूमी लुटली जात होती त्या आगरी कोळी ओबीसींचे आमदार शांत होते.ही शांती म्हणजे ओबीसी गुलामी होती.या अगोदर मुंबईत रोजगार व्यवसाय यांच्या साठी स्थलांतरित झालेल्या देशभरातील एससी एसटी अल्पनख्यांक लोकांच्या वस्त्या SRA प्रकल्पात,सर्व पक्षीय बिल्डर,नगरसेवक,आमदार खासदार या राजकीय लोकांनी उध्वस्त केल्या होत्या.यांचे मुंबई वरील प्रेम खोटे आहे.इतर परकीय आक्रमक लोकईतकेच हे लुटारू लोक आहेत.हा इतिहास मातृसत्ताक मुंबई ने नोंदवून ठेवला आहे.
   जागतिक स्तरावर तेलासाठी इराण किंवा तेलसमृद्ध इस्लामिक राष्ट्रावर अमेरिका इस्रायल यांच्यासारखी साम्राज्यवादी राष्ट्रे विनाशकारी युद्ध लादून,आपली पैसे,सत्ता, तेल हवस पूर्ण करून घेतात.हे आता भारतातल्या ओबीसींना समजू लागले आहे.परंतु भारतात ओबीसी आगरी कोळ्यांच्या ताब्यात हजारो वर्षांच्या वहिवाट मालकीत असलेल्या जमिनीत अमेरिकेसारखाच “लोकशाहीचा” चेहरा घेऊन “SRA “विषारी हा बिल्डर धार्जिणा प्रकल्प लादला जातो.तेव्हा हे शोषण ओळखण्यासाठी शूद्र अतिशूद्र यांच्या मनातील गुलामीचा दोष ओळखण्यासाठी बुद्ध फुले आंबेडकर यांच्या मनाचे मानसशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे.
   उच्चवर्णीय जाती भारतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या नावाने ओळखल्या जात असल्या तरीही समस्त स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांना चिरडण्यात जगभरात अमेरिका इस्रायल ही राष्ट्रे,त्यांना मदत करणारे आपले पंतप्रधान मोदी पर्यायाने उच्चवर्णीय भारतीय अदानी अंबानी शरद पवार फडणवीस एकनाथ शिंदे हे सारे सत्ताधारी ही शोषक,जागतिक स्तरावर “एकच” असल्याचे माझे निरीक्षण आहे.
   इराण मधील मुलींच्या शाळेवर क्षेपणास्त्र डागून त्या निरागस मुलींना ठार करणारे अमेरिका इस्रायल आणि मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी सावित्रीमाई आणि त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकून स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करणारी भारतीय उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जमांत epstin फाइल मध्ये मनुस्मृती नुसार जागतिक स्तरावर “एकच” असल्याचे माझे आताचे निरीक्षण आहे.सातत्याने जगातील समस्त शोषित अत्याचारित गुलाम लोकांच्या स्वातंत्र्याचा लढा सामाजिक न्यायाच्या तत्वाने अनेक महान विचारवंत समाजसुधारक यांनी लढला आहे.या जागतिक लढवय्या लोकांकडून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजेच.परंतु भारताच्या भूमीतील समाज सुधारक ,धर्मसुधारक यांची माहिती अजूनही भारतीय गुलाम आगरी कोळी ओबीसी जातीतील लोक घेत नाहीत ? हे वास्तव आहे.जगातील हुकुमशहा ओळखण्यात शिक्षणा अभावी आमची चूक होत असेल ? किंवा झाली असेल.?
     आताच्या काळात घरगुती सिलेंडरचा वाढलेला भाव यामुळे रडकुंडीला आलेली आमची आई,बहीण,मावशी यांच्या दुःखास खरे कारण आमच्या पंतप्रधान मोदी यांची मान epstin फाइल मध्ये अडकविणाऱ्या इस्रायल या राष्ट्राचा साम्राज्यवादी स्वभाव आणि भारतीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे स्वभाव का जुळतात ? हे देखील आम्ही पाहिले पाहिजे.आज जागतिक स्तरावर सारे लुटारू एक झाले आहेत.दुःख याचे आहे जे लुटले जात आहेत.ते एकमेकांना कधी ओळखणार? भारतीय लोकांच्या गुलाम मानसिकतेला ओळखणे,हे ऐतिहासिक काम चार्वाक बुद्ध महावीर यांनी दोन हजार वर्षापूर्वी केले आहे.
  आगरी कोळी कराडी भंडारी या ओबीसी जातींचे नेते दि बा पाटील यांनी ही बुद्ध चार्वाक यांच्या विचारांच्या विवेकावर सिडको मधल्या उच्चाजातींच्या मराठा ब्राह्मण वैश्य अत्याचारविरोधी लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले.उरण पनवेल पेण हा आता दहा कोटी रुपये प्रति गुंठा बाजारभाव असलेल्या मौल्यवान जमिनी रिलायन्स सेझ प्रकल्पासाठी पाच ते दहा हजार रुपये प्रति गुंठा भावाने अंबानी साठी देणारे ब्राह्मण मराठा महाराष्ट्र शासन २००५/६ सेझ प्रकल्पात  कार्यरत होते.सेझ आंदोलनात आदरणीय ॲड दत्ता पाटील अलिबाग रायगड यांच्या संपर्कात मी आलो.त्यानंतर सिडको विरोधात लढणाऱ्या लोकनेते दि बा पाटील यांच्या संपर्कात आलो.आगरी समाजाचे हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकसभेत आगरी कोळी कराडी ओबीसींच्या प्रश्नात लढत होते.त्यांची वैचारिक दिशा ही बुद्ध चार्वाक फुले शाहू आंबेडकर अशी स्पष्ट होती.याच विचार सरणी नुसार जो विवेक मागासवर्गीय बुद्धी आणि मनात येतो त्यातून आजच्या उच्चवर्णीय साम्राज्यवादी जगाची “दाहकता” ओळखता येते.
     मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथल्या शेतजमिनी खोत सावकार लुटीचा इतिहास आपण ओळखता.छत्रपती शिवरायांचे स्वराज्य बुडवून आजच्या ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्त्यांनी आम्हा आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसींना गुलामीत टाकले होते.ही गुलामी भंडारी नेते सी के बोले.आगरी नेते नारायण नागू पाटील आणि संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा ओबीसी गुलामांच्या स्वातंत्र्याची जमीन हक्कांची लढाई “कुळ कायदा “म्हणून १एप्रिल१९५७ साळी जिंकली.आज आगरी कोळी ओबीसींना आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे गुलाम होतो.हे कटू सत्य मान्य होत नाही.हे ढोंग आहे.मुंबई कोळीवाडा गावठाण हक्कांचा लढा समजून घ्यायचा असेल ?तर आम्हास गुलाम करणाऱ्या उच्च जातीय लोकांना समजून घेतले पाहिजे.आगरी कोळी भंडारी ओबीसींचा लढा लढत असताना. आम्ही वैदिक हिंदुत्वाच्या विचाराने तो जिंकूच शकत नाही.ब्राह्मणी हिंदुत्वाचा हा विचार आमच्या गुलामीचा मनुस्मृतीचा विचार आहे.
    आमच्या स्वातंत्र्याचा विचार कुळ कायद्याचा,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय साविधानिक आर्थिक सामाजिक न्याय स्वातंत्र्य समता बंधुता शिक्षण आरक्षण आणि राजकीय हक्क यांचा आहे.आम्ही आमच्या जमिनी एमआयडीसी सेझ एम एम आर डी ये विमानतळ नैना मुंबई नवी मुंबई दुसरी तिसरी मुंबई याच्या नावे मराठा ब्राह्मण वैश्य अदानी अंबानी यांना फुकट दिल्या आहेत.किंवा कवडीमोल भावाने दिल्या आहेत.हा मूर्खपणा आधुनिक गुलामच करू शकतात.आम्ही ओबीसी १५ टक्के उच्चवर्णीयांचे ५२ टक्के ओबीसी समाज म्हणून “सामूहिक गुलाम” आहोत. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण येथील घरे गावठाण हक्कांचा लढा हा केवळ आर्थिक लढा नाही? तर तो आमच्या मानसिक गुलामी विरुद्धचा लढा आहे.२०१६/१७ पासून वरली कोळीवाडा  इथल्या सभेने कोळीवाडे गावठाणे संघटित करायला सुरुवात मी केली.यात ‘मी’ हा शब्द मी माझ्या मनासाठी वापरतो.त्यात कोणताही नेतृत्वाचा हिटलरी अहंकार नाही.तो एकवीरा पुत्र बुद्ध यांच्या “अत्त दीप भव” या जागतिक विचारांचा विनयशील “मी” आहे.अर्थात आमच्या मनाची गुलामी ओळखून त्यास उच्चवर्णीय मनुवादी गुलामीतून मुक्त करण्याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मुक्ती कोण पथे?”या भाषणातील विचारांचा “सारांश” आहे.
  माझ्या विनंतीस मान देऊन ज्या माझ्या कोळी बांधवांनी खास करून कुलाबा सायन माहीम जुहू ठाणे उरण पनवेल रायगड या भागातील आगरी कोळी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी लोकांनी जी लोकवर्गणी लोकसभाग यातून सामूहिक आंदोलने केली. यातूनच वर्तमान महाराष्ट्र सरकारने साऱ्या कोकणातल्या कोळीवाडा गावठाण यांचे सीमांकन व्हावे .त्याची दिशा निश्चित करण्यासाठी एक सरकारी आदेश महसूल व वनविभाग यांच्याकडून दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी काढला आहे.अर्थात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे मराठा उच्चवर्णीय नेते सिडको एम एम आरडी महानगर पालिका यांच्या माध्यमातून मराठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असले आदेश कधीच मानणार नाहीत. कोकणात महसूल विभागास कुणी भीक घालत नाही. हे वास्तव महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांनी उरण येथे येऊन माझ्याकडून समजून घ्यावे.
   ओबीसी आगरी कोळ्यांच्या जमिनीचे “जमीनचोर” मराठा ब्राह्मण गुजराती बिल्डर अदानी अंबानी लोढा यांना पकडणारा ‘पोलिस’ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औषधाला असेल?.तर त्याचा ‘जीवन गौरव” पुरस्कार देऊन मी स्वतः सत्कार करून त्यांची पाठ थोपटेनं.आगरी कोळी ओबिसिनो गुलामीची मानसिकता सोडा.स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसते.असे असते तर जग आज अमेरिकेचा गुलाम झालेले दिसले नसते.आम्ही रशिया कडून पेट्रोल खरेदी साठी अमेरिकेची गुलामी करतो.हा मोदी अदानी यांच्यासाठी फायद्याचा व्यापार असेल ? परंतु ८५ टक्के शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी देश “गुलामीत” असल्याचा पुरावा आहे.कोळीवाडे गावठाणे मोजणे त्याचे पुरावे शोधणे तेही लोकवर्गणीतून हे आपले कर्तव्य आहे.उच्च जातींचे महाराष्ट्र जातींचे शासन,धारावीचे १२ कोळीवाडे अदानी ला विकत आहे.आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांनी आपापल्या गावठाणात संविधान घेऊन संघटित होणे .ही काळाची गरज आहे.त्यासाठी सर्वस्व द्यायची तयारी माझ्यासारख्या पन्नाशीत असलेल्या बंधू भगिनी आई वडील यांनी ठेवली तरच ज्यांना आम्ही जन्म दिलाय ती नवी पिढी वाचेल.नव्या पिढीने या ओबीसी गुलाम मानसिकतेचा शोध घेऊन “स्वातंत्र्य” म्हणजे काय ?.हे समजून घ्यावे.ही नम्र विनंती करतो.

राजाराम पाटील-८२८६०३१४६३.
उरण जिल्हा – रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *