बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ, मुंबई.आयोजित भव्य बौद्ध वधु वर परिचय मेळावा.

आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली- मुले लग्ना वाचुन घरी बसून आहेत. आता देखील जर आई-वडील जागे झाले नाहीत,तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते.आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत.समाजात आज 27-28-32 वयापर्यंत अनेक मुली अविवाहित आहेत,कारण त्यांच्या अपेक्षा कधी-कधी आहे त्या परिस्थिती पेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे.सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन. पैसा आवश्यक आहेच,पण तो मर्यादेपर्यंतच.फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे. पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी.अधिक पैशाच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही.“संपत्ती विकत घेता येते,पण गुण नाही.” माझ्या मते घर-परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का हे पहावे;“जास्त” या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये. सुखी वैवाहिक जीवन जगा.30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होतात.
जिथे मुला-मुली मधील सर्वगुण आहेत का ते पहा.कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाहीत.अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त आपण नको त्या अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे नातं तोडतो.आवाढव्य अपेक्षा यामुळेच आधुनिक,सुशिक्षित समाजाला एक शतक मागे नेले आहे. या अशा अवाढव्य अपेक्षामुळे कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत.आज मुलीं- मुलांना साठी नातं शोधताना त्यांच्यातील जणू २४ कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं,आणि बघता-बघता चार-पाच वर्षे निघून जातात.उच्च “शिक्षण” किंवा “जॉब” या नावाखालीही वेळ घालवला जातो.मुलगा-मुलगी पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचं उदाहरण बनली आहे.
मुलगा पाहताना स्वतःचं घर आहे काअसल्यास फर्निचर कसं आहेघरात खोल्या कितीगाडी आहे का कोणती राहणीमान,खाणंपिणं कसं,भाऊ-बहिणी किती आई-वडील कुणाकडे आहेत.बहिणींची लग्नं झाली आहेत?, का आई-वडिलांचा स्वभाव कसा आहे?.नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत का?. मुलाची उंची किती?,रंगरूप कसं? शिक्षण?,उत्पन्न?, बँक बॅलन्स? किती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे का?. मित्र किती आहेत?.यामुळेचे नाते जुळत नाही.
आई-वडिलांना शहाणपण येतं तेव्हा मुलीचं वय 30 पार झालेलं असतं.मग पुढची चार-पाच वर्षांची धावपळ मुलांच्या तरुणपणाचा बळी घेते.एक काळ असा होता की घराणं पाहून नाती ठरत.ती नाती टिकायची.विहीन-विहिनी मध्ये आदर,प्रेम,जिव्हाळा असायचा.धन कमी असलं तरी आनंद घरात भरलेला असायचा. कधी मतभेद झाले तरी वडीलधारी माणसं ते मिटवायची.घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता.दांपत्य जीवन गोड-तिखट अनुभवांतून सरत जायचं. दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे,आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे. आज ते संस्कार कुठे आहेत ?.लाज-शरम इतिहास जमा झाली आहे.त्यामुळेच नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते.
आज मुलं-मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत,आणि म्हणतात “आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही” मुलं-मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करताना, तेव्हा कुणाला बँक बॅलन्स,पैसा,नोकरी,घरदार काही आठवत नाही. आई-वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात.तेव्हा पैसा,स्टेटस, इनकम काहीच अडथळा ठरत नाही. आता देखील आई-वडील जागे झाले नाहीत.तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल.मुलींची लग्नं 22-23-24 वयात आणि मुलांची 25-26 वयात झाली पाहिजेत.सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात.घर,गाडी,बंगला याआधी वर्तन आणि स्वभाव तोलून पाहा.आई-वडीलही आर्थिक झगमगाटात वाहून गेले आहेत.पैशांच्या शर्यतीत नाती-गोती फार मागे पडली आहेत.कुटुंब असलेली घरं तुटत आहेत, प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. या पिढीने कुटुंबसंस्थेचं असं तमाशा केला आहे. की येणाऱ्या पिढ्या “संस्कार” फक्त पुस्तकांत वाचतील.समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर नाती शोधतच राहू.या सर्व गोष्टीवर पर्याय म्हणून बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ,मुंबई या संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बौद्ध वधू वर सूचक मेळावा रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेंट्रल स्कूल,सेक्टर 1, सीबीडी बेलापूर,नवी मुंबई येथे आयोजित केलेला आहे.या बौद्ध वधु वर सुचक मेळाव्यामध्ये सर्व तऱ्हेचे शैक्षणिक पात्रता धारण केलेले मुले मुली उपस्थित राहणार आहेत. तरी या अमूल्य कार्यक्रमाचा सर्व बौद्ध समाजाने लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई (रजि) कार्यकारिणी मंडळ-करीत आहोत.
मा.डॉ.भीमराव आंबेडकर (राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष :- भारतीय बौद्ध महासभा) मा.सरसेनानी आनंदराज आंबेडकर,(सभापती:- बौद्धजन पंचायत समिती, राष्ट्रीय अध्यक्ष:- रिपब्लिकन सेना),मा.आयुनी.मनिषा आनंदराज आंबेडकर. यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 29 मार्च 2026,वेळ सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत.स्थळ:- पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेंट्रल स्कूल,सेक्टर 1,सीबीडी बेलापूर,नवी मुंबई.येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याची प्रवेश फी-रुपये 500/ रुपये,अतिरिक्त व्यक्ती आल्यास प्रत्येकी 100/-रुपये.कार्यक्रमाची रूपरेषा-अल्पोपहार व चहा,नांव नोंदणी,प्रतिमा पूजन,बुद्धवंदना,प्रास्ताविक,प्रमुख पाहुणे मार्गदर्शन,वधू – वर परिचय,स्नेहभोजन,वधू – वर सुसंवाद,आभार प्रदर्शन,समारोप करण्यात येईल.

बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई (रजि) कार्यकारिणी मंडळ- डॅा.दयानंद इंगळे,अध्यक्ष- 97027 77927,आयु.प्रल्हाद सोनूने-उपाध्यक्ष- 9420645830, आयु.अरुण अंभोरे,सचिव- 9224633354,आयु.वामन मोरे,सहसचिव-9082189458, आयु.भास्कर पवार,खजिनदार- 9969131829,आयु.दिलीप भालेराव,सदस्य- 9870225644,आयु.राजेंद्र जाधव,सदस्य- 8898566340,आयु.रुस्तुम भालेराव, सदस्य-966562217,आयु.सुभाष गवई,सदस्य- 9867463572,आयु.सीमा जाधव, सदस्या- 9820220992,आयु.विजय खरात,सदस्य- 8169963285,
आयु.रमेश अडेलकर,सदस्य- 9082975404,आयु.ललिता पंडागळे,सदस्या- 9987239188 अधिक माहिती साठी संपर्क करावा असे डॅा.दयानंद इंगळे,अध्यक्ष यांनी केले आहे.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून मुंबई.
