सेवानिवृतीचे जीवन म्हणजे म्हातारपणाचे जगणे जगू नका.

बातमी शेअर करा.

म्हातारपणी एकटे पडू नये आणि कोणावरही ओझे होऊ नये म्हणून, या गोष्टी आताच समजून घ्या.मी असंघटित नाका कामगार म्हणून १९८१ ला भांडुपच्या मधूबन उद्यान समोरच्या नाक्यावरून बिगारी कामगार म्हणून सुरवात केली.१९८२ टाटा पावर कंपनी मध्ये गार्डन मध्ये माळी काम करण्यास कंत्राटदाराकडे काम केले.१९८४ साली कंपनीचा कामगार म्हणून अधिकृत झालो.१९९४ टासफोर्स कामगार झालो.आणि २००० साली कायम कामगार म्हणून रुजू झाला.२०२१ ला वयाची साठ वर्ष पूर्ण झाले म्हणून सेवा निवृत झालो.पण संघटित असंघटित कामगारांच्या अनेक समस्या सोडविण्या साठी १० जून १९८२ ला सत्यशोधक कामगार संघटनेची स्थापना दिवंगत विजय गोविंद सातपुते,अंकुश हरी भोळे यांच्या सोबतीने केली होती. महात्मा ज्योतिबा फुले,रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे यांचा कामगार चळवळीचा वैचारिक वारसा लाभला होता. तेव्हा पासून मी गोरगरीब कष्टकरी मजूर,नाका कामगार,घर कामगारांच्या समस्या सोडविण्या साठी प्रबोधन करून सनदशीर मार्गाने जन आंदोलन आणि संघर्ष करत आलो आहे.त्यावेळी आणि आज ही असंघटित कामगारांना पेन्शन मिळत नाही.टाटा कंपनी मध्ये सेवानिवृती नंतर कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी कसे जीवन जगावे यांचे प्रशिक्षण दिले जात होते.ते आज मला पत्रलेखक,पत्रकार म्हणून खूप उपयोगी ठरत आहे. 

    असंघटित कामगारांकडे मालमत्ता संपती फारशी नसते.पण संघटित कर्मचारी अधिकारी वर्गाकडे खूप मोठ्या प्रमाणात संपती मालमत्ता असते. तीच त्यांची मोठी दुख देणारी ठरते.याबाबतीचे अनेक घटना मला पत्रकार,कामगार नेता म्हणून पाहण्यास मिळतात. यावर मी लिहावे असे अनेक सेवानिवृत मित्र सांगतात. मालमत्तेचा कधी माज करू नका तुमच्या जवळ किती पैसा आहे, तुमची कीती इज्जत आहे,तुमच समाजात काय स्टेटस आहे,याच्याशी कोणाला काही घेणे देणे नाही.घेणे देणे आहे ते तुमच्या स्वभावाशी,तुमच्या वागणूकीशी,तुमच्या स्वभावातील विनम्रतेशी, कधीच पद,पैसा,प्रतिष्ठा याचा गर्व करू नका,आपल्या पेक्षा चांगले चांगले आले व गेले हे लक्षात असु दया, शेवट सोबत काय नेणार आपण तर आपले चांगले कर्म व पुण्य कर्म बाकी काहीच नाही.त्यासाठी मन शांत ठेऊन सकारत्मक विचार ठेवा.माझा बंगला झाला,माझ्या मित्राचा व्हावा,अशी विचारधारा ठेवा. अनाथांचे “नाथ” बना !.गोर-गरीबाला मदत करून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करा.जीवनात एखादं काम असं करा की तुमची पुढची पिढी “याद” करील. परोपकारी बना.कमावलेल्या रककमेतील  ठराविक रक्कम समाजोन्नतीसाठी खर्च करा. ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले.अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस.असं मला वाटतेय.हे आम्ही टाटा कंपनीत शिकलो,त्याही पेक्षा जास्त फुले,लोखंडे,शाहू आणि आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारातून प्रत्येकशात कष्टकरी कामगाराच्या सोबत राहून शिकलो. 

   तुम्हाला काय वाटतय तुमचा देव जाणे.मला जे वाटते ते मांडण्याचा प्रयत्न मी करतो, चांगले वाटले तर जवळच्या मित्रांना पाठवा. त्यावर गांभीर्याने चर्चा करा.आणि हो चुकीचं वाटत असेल तर मुर्ख म्हणून सोडून द्या.मी असंघटित कष्टकरी कामगारांसाठी काम करता करता मी उच्च पदवीधर अधिकारी वर्गाला महत्वाचे समजत नाही.त्यांचे सामाजिक बांधिलकी म्हणून अनुभव वाईट आहेत. ते लोक पदावर असतांना समाजाला,नातलगानां आपल्या बरोबरचे समजत नाही. काही अपवाद आहेत.त्यासाठी सेवा निवृत म्हणजे म्हातारे झाले अशी समाजाची समज झाली आहे. त्यामुळेच किती ही संपती मालमत्ता कमावून ठेवली असेल तरी त्या व्यक्तीला म्हाताऱ्याला जास्त किंमत दिली जात नाही. त्यासाठी ह्या काही सूचना.  
पहिली सूचना :- जमिनीच्या वादात पडू नका:फक्त ‘शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी’ आपले आयुष्य न्यायालयाच्या पायऱ्यांवर घालवू नका.खटला संपण्यापूर्वीच तुम्ही कदाचित जगातून गेलेले असाल.आणि जरी तुम्ही लढून जमीन जिंकलीत, तरी तिथे तुम्ही नाही,तर वकीलच स्थायिक होतील.
दुसरी सूचना :- जुनी वाहने ओझे बनू शकतात:पाच लाखांचा फायदा होत आहे असे समजून जुनी वाहने घरी आणू नका.जर गाडी रस्त्यापेक्षा गॅरेजमध्येच जास्त वेळ घालवत असेल,तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही,तर तुम्हाला येईल.
तिसरी सूचना :- आपली मालमत्ता हस्तांतरित करण्याची घाई करू नका:आज जरी मुले ‘देवासारखी’ वाटत असली, तरी एकदा तुम्ही तुमच्या मालमत्तेचा प्रत्येक पैसा त्यांच्या नावावर केलात, की त्याच घरात तुम्ही एक ‘नको असलेली वस्तू’ बनू शकता. मुले वाईट नसतात, पण जग क्रूर आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी स्वतःच्या नावावर ठेवा.
चौथी सूचना :- तुमची शेवटची बचत सुरक्षित ठेवा: ३० वर्षे कमावलेले पेन्शनचे पैसे मुलांच्या व्यवसायासाठी देऊ नका.शेवटी,औषधे खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्याच मुलांसमोर हात पसरावे लागतील.
पाचवी सूचना :- मुलांच्या घराला चिकटून राहू नका: फक्त ‘ती आपली मुले आहेत’ म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. जास्त जवळीक तुमचे प्रेम त्यांच्यासाठी त्रासदायक बनवू शकते. स्वतःसाठी एक छोटी जागा शोधा आणि स्वतंत्रपणे जगा.
सहावी सूचना :- तीर्थयात्रेसाठी मुलांची वाट पाहू नका: ‘त्यांना सुट्टी मिळाल्यावर ते मला घेऊन जातील’ असे म्हणून वाट पाहत बसू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल,तेव्हा कदाचित तुम्ही चालायलाही सक्षम राहणार नाही.जोपर्यंत तुमच्यात शक्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी जा- अगदी एकटे का असेना.हातापायत शक्ति असे पर्यंत फिरा. 
सातवी सूचना :- आज जे खावेसे वाटते ते खा: तुमच्या जोडीदाराला (पत्नी/पतीला) आजच त्यांच्या आवडीची वस्तू घेऊन द्या.एखाद्या अन्नाच्या ताटासोबत शवपेटीजवळ रडत, “त्यांना हे खूप आवडायचे,” असे म्हणणे म्हणजे निव्वळ ढोंग आहे.ती वेळ येऊ देऊ नका.
आठवी सूचना :-  स्वतःसाठी विश्रांतीची सोय करा:मरणाच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर रचू नका. जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत धावतच राहिलात, तर शेवटी तुम्ही काहीही जिंकलेले नसाल. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती द्या.
नववी सूचना :-  झोपेसारखे दुसरे औषध नाही: अनावश्यक निद्रानाश कमी करा आणि शांतपणे झोपा.जेव्हा तुम्ही आजारी पडाल,तेव्हा कोणीही तुमचे दुःख वाटून घेणार नाही – ते तुम्हाला एकट्यालाच अनुभवावे लागेल.
दहावी सूचना :- तुम्ही एकटेच आला आहात हे कधीही विसरू नका:तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल या अपेक्षा कमी करायला शिका.एक दिवस तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जाईल.मृत्यूसुद्धा एकाकी असतो,म्हणून आनंदाने एकटे राहायला शिका.आनंद ही अशी गोष्ट नाही जी कोणीतरी तुम्हाला देतो; ती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःच निर्माण करावी लागते.
अकरावी सूचना :-  तुमचा पती/पत्नी निरोगी असताना, प्रत्येक लहान-मोठे काम स्वतःहून करायला शिकण्यास अजिबात संकोच करू नका.
बारावी सूचना :- जरी तुम्ही मृत्युपत्र लिहिले असले तरी, ते बदलण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे हे लक्षात ठेवा.
तेरावी सूचना :- जर वारसदार तुमचा छळ करत असतील किंवा त्रास देत असतील, तर हे विसरू नका की आज कायदा आणि जिल्हा प्रशासन तुमच्या बाजूने आहे.
चौदावी सूचना :- दररोज फिरायला जाण्याची सवय लावा आणि तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक असल्यास, त्यांच्यासोबत तुमच्या तरुणपणीच्या आठवणी न चुकता शेअर करा.
पंधरावी सूचना :- नेहमी लक्षात ठेवा की एक दिवस जीवनाचा हिशोब संपणार आहे; त्या अंतिम दिवसासाठी मानसिक तयारीने जगा.
सोळावी सूचना :- शेवटी तुम्ही काहीही सोबत घेऊन जाणार नाही हे लक्षात ठेवून, प्रत्येकाशी प्रेमाने आणि मैत्रीने वागा,मैत्री भावना वाढवा सर्व दुख विसरून त्यात सहभागी व्हा.गरजूंना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस म्हणून घडवा. तुमच्या कुशल कामाची आणि कुशल पुण्याची लोकांनी आठवण काढली पाहिजे.मी हे शिकलो.म्हणूनच सामाजिक बांधिलकी ठेऊन आज ही राज्यात आणि देशभरात पत्रकार साहित्यिक कामगार नेता म्हणून फिरत असतो.कारण मी कामावर असतांना सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक चळवळ,धम्म प्रचार प्रसार आणि कामगार चळवळीशी जुळवून घेतले होते. याचे समाधान मिळते. त्यामुळे मी म्हातारपणी एकटा पडून राहत.आणि कोणावरही ओझे न होता. धम्मासाठी,असंघटित कामगारांसाठी क्रियाशील राहतो. आपण ही आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा. सेवा निवृती चे जीवन म्हणजे म्हातारपणाचे जगणे जगू नका. हे आयुष बोनस आहे असे समजून त्याचा सामाजिक कार्यात वेळ देऊन सन्मानाने जगा.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.टाटा पॉवर कंपनी सेवानिवृत कर्मचारी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *