अमेरिकेने बुडविलेली इराणची युद्धनौका सत्यनारायण पूजेने भारत वाचवू शकत नाही…राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

जगात तेलासाठी युद्ध भडकले आहे.युद्धाला कोणतेही योग्य कारण न देता अमेरिकेने इराण या देशावर युद्ध लादले आहे.ही जागतिक हुकुमशाही आहे.आमच्या संविधानाने दिलेल्या अमूल्य मतांचे अधिकार पाचशे ते पाच हजार रुपयांत विकणाऱ्या भारतीय मतदारांना आता घरगुती गॅस,डिझेल,पेट्रोल यांच्या भडकलेल्या किंमती लोकशाही म्हणजे काय? हे शिकवीत आहेत.
  अमेरिकन ट्रम्प हुकुमशाहीला प्रश्न न विचारणारे मोदी हे अमेरिकेचे “गुलाममित्र “बनून देशाचे स्वातंत्र्य गहाण टाकत आहेत.प्रश्न आम्हा सामान्य आगरी आगरी कोळी भंडारी ओबीसींचा आहे.अन्यथा सकाळी पाच वाजता उठून लिहायची तसदि कशाला घेतली असते?. आगरी कोळी समाजात अनेक दिग्गज शेठ असताना ? आमची घरे गावठाणे शेतजमिनी शिक्षण आरक्षण या प्रश्नांवर लढणारे ओबीसी नेते दि बा पाटील हे आमचे गरीब नेतृत्व आजही मला लढण्याची प्रेरणा देते.त्यांच्या विचारांचा हा वर्तमान ओबीसी विचारांचा महामार्ग आहे.
    लोकनेते दि बा पाटील यांनी स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवराय हे आपले आदर्श मानले होते.आज अमेरिका साऱ्या जगावर हुकुमशाही गाजवण्यासाठी साम्राज्यवादी लढाई लढत आहे.त्यातील हवेतून हवेत,चाललेली विमाने, क्षेपणास्त्रे ही आधुनिक विज्ञानाच्या विकासाची किमया आहे.आमच्या कोकणात आता लग्नसराई सुरू आहे.लग्नानंतर लगेच सत्यनारायण पूजा होत असतात.प्रश्न आमच्या मानवी मनातील, जगण्यातील आधुनिक नवे शोध,तर्क विचारांचा आहे. “समुद्रात बुडालेली साधुवाण्याची नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढता येते.”या पोटभरण्यासाठी भारतीय ब्राह्मणी बुद्धीने पेरलेल्या अंधश्रद्धेचा आहे.या “असत्य विचारांनी “आमच्या मुंबईच्या समुद्रात बुडालेली एकही मासेमारी नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढता येत नसेल? तर आम्ही सुशिक्षित तरुण मुले केवळ ब्राह्मण भटजी सांगतात. ती कथा,पोथी धर्म श्रद्धा म्हणून का स्वीकारतो? असा आहे.


     भारताच्या आमंत्रणावरून नौदल युद्ध सरावाला आलेली आपल्या मित्र राष्ट्राची इराणची युद्धनौका, आंतरराष्ट्रीय नियम मोडून अमेरिकेने बुडविली.आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणे.अर्थात “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृती हिंदुत्वाचे हिंदुराष्ट्राचे कट्टर समर्थक मां पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरले का? ज्या श्रीलंकेला आम्ही ओबीसी रामायणाच्या कथेने “रावणाचे राष्ट्र” समजतो. ते प्रत्यक्षात एकवीरा महामाया पुत्र भगवान बुद्धांचे विचारांचे राष्ट्र आहे. त्यांच्याकडे भारतीय ब्राह्मणी विचारांचे बुडालेल्या नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढण्याचे,सत्यनारायण पूजेचे “फसवे तत्वद्न्यान” नाही.तरीही माणुसकीच्या तत्वाने त्यांनी जहाजावरील बुडणाऱ्या नाविक आरमारी जवानांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.आम्हा आगरी कोळी ओबीसींच्या जीवनातील साधे निसर्ग तत्वद्न्यान आम्ही विसरून.या मूर्ख ब्राह्मण लोकांच्या नादाला का लागतो आहोत? बुडालेली नौका केवळ सत्यनारायण पूजेने बाहेर काढता येत नाही.हे अखंड सत्य आगरी कोळी आरमारी सागर पुत्र ओबीसी लोकांत जेवढे माहित आहे.तेवढे साऱ्या भारतात कुणालाच माहीत नाही.
  नौका बांधणे त्या श्रीलंका इजिप्त अर्थात साऱ्या जगात व्यापारासाठी चालविणे. हा आमचा व्यापारी सागरी जागतिक इतिहास आहे.दुसरीकडे “समुद्र उल्लंघन करणे पाप आहे.” असे आमच्या छत्रपती शिवरायांनी सन्मानित केलेल्या सागरी आरमाराचा विरोध करणारे तत्वद्न्यान ब्राह्मणी मनुस्मृती सांगते.नव्हे नव्हे ब्राह्मण पेशवाई छत्रपतींचे आरमार इंग्रजांना हाताशी धरून बुडविते. हा देशाचा इतिहास आहे.हा देशद्रोह आहे.राष्ट्रद्रोह आहे.बुडालेली नौका देवाच्या पूजेने बाहेर काढतो हे सांगून लोकांना फसविणे यासाठी पूजा सांगून दक्षिणा मागणाऱ्या भटजी विरुद्ध महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अंधश्रद्धा विरोधी कायद्याने गुन्हा नोंदवतील का?
   प्रश्न देशातील लोकांना मूर्ख बनविण्याचा आहे.नवे घर, नवा किल्ला बांधल्यानंतर आरमार उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी कधी सत्यनारायण पूजा केली का?कोकणच्या समुद्रात पोहणाऱ्या या राजाला हे माहीत होते.”ज्याला पाण्यात पोहता येते तोच सागरात तरतो.”. तोच कोळी..तेच आमचे ठाण्याचे कोळी नेते अनंत “तरे..” सत्य नारायण पूजा सांगणाऱ्या समस्त ब्रह्म वृंदास विनंती आहे.आपण उरण येथे यावे आमच्या मोरा आणि करंजा तसेच जे एन पी टी बदरात बुडालेल्या मासेमारी नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढा.आपण तुमची महापूजा घालू.सत्य नारायण पूजेने नौका बाहेर निघाली तर ? अमेरिकेने बुडविली इराणी युद्ध नौका बाहेर काढू ..


  आज घरा घरात संपलेले गॅस सिलेंडर इराणी लोक प्रेमाने भरून देतील.भारताचा इंधन तुटवडा संपेल.पुन्हा मोदी सत्तेत येतील.Epstein फाइल मध्ये महापाप करून बदनाम झालेले ट्रम्प याच्या सोबत “अनैतिक मैत्री” आपले पंतप्रधान मोदी आणि देशाला महागात पडली आहे.किंमत घरा घरातील गृहिणी मोजत आहेत.त्या बोलायला लागल्या खासकरून आमच्या आगरी कोळी महिला तर ?मोदी सत्ता बुडणार!ती सत्य नारायण पूजेने वाचू शकणार नाही. “समुद्रात बुडालेली नौका,भटजींचा सत्य नारायण किंवा कोणत्याही देवाचा बाप बाहेर काढू शकत नाही..” ती नौका काढण्यासाठी मानवी प्रयत्न किंवा आधुनिक क्रेन हवी.
हे निसर्ग सत्य मानवी जीवनात उपयोगाचे आहे.कोणताही चमत्कारी देव आगरी कोळी ओबीसी एससी एसटी यांना वाचवू शकत नाही.
    हजारो वर्षा पूर्वी भगवान बुद्ध चार्वाक यांनी देव नाकारला.आगरी कोळ्यांनी याच मार्गाने जावे असे लोकनेते दि बा पाटील यांचे म्हणणे होते.आम्ही आगरी कोळी कराडी भंडारी देशाचे ,सागरी सीमांचे रक्षक आहोत.सत्य नारायण पूजा बुडालेल्या नौका बाहेर काढू शकत नाहीत.हे “सत्य” स्वीकारणे? म्हणजे आधुनिक विज्ञानवादी असणे होय.चला लोकनेते दि बा पाटील यांच्या नव्या विचारांनी जगू या.लग्न,साखपुडे, वाढदिवस मानवी मृत्यू पिंडदान विधी यातील सत्य शोधू या..महात्मा जोतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीमांईंचे “सत्यशोधक “होऊ या.
  तुमचे आई बाबा हेच सत्य आहेत.करायची असेल? तर त्याची पूजा आजच करा.भटजी ची गरज काय? नमस्कार करा त्यांना..आनंदाचे उष्ण अश्रू त्यांच्या डोळ्यातून पडतील.जमिनीवर स्वर्ग सुख देतील तुम्हाला.मृत्यूनंतर स्मशानात जाळल्या नंतर राखच राहते.कोणत्याही देवाच्या पूजेने पुन्हा आई बाबा नाही दिसणार हो.सत्य हेच आहे.तुमचे आई बाबा..पत्नी मुले..मित्र परिवार..प्राणी, पक्षी हा निसर्ग.हे जग पृथ्वी. युद्धात जाळू नका.जपा हे जग.तुम्हाला.तुम्हाला प्रेम पूर्वक अर्पण करतो.तुम्हा चरणी…विनंती करतो.
तुमचा भाऊ
राजाराम पाटील.८२८६०३१४६३ 
उरण जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *