मान्यवर कांशीराम यांच्या 92 व्या जयंती निमित्य विशेष लेख

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ २००७ ला पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली होती.आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला.देशातील पहिली एस सी ची महिला देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली होती. आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय एस सी महिला नेता ठरली.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे!. उतर भारतात कांशीराम यांनी जी समाज प्रबोधनाची मोहीम राबविली त्यामुळेच कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई असा नारा दिल्या जात होता.
महापुरुषाची विचारधारा सांगणारी जी बसपा देशातील बहुजन समाजाला जागृत करून सांगत होती ” बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!.” मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात.आणि त्याचा वापर समाजाला तोडण्यासाठी हत्यार म्हणून कसा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्चवर्णीय लोकांना आहे. आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे एस सी,एसटी, ओबीसी शोषित आदिवाशी अल्पसंख्याक समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपाची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या आणि आहे. तरी चमच्यानी पक्षात भ्रष्टाचार केल्यामुळे चाळीस मंत्री गुन्हेगार ठरले होते.त्यांना मायावती यांनीच जेलमध्ये टाकले,पण पक्षाला विचारधारेला कलंक लागला असा विचार बहुजन समाज जास्त करतो,काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कारकीर्द मध्ये किती घोटाळे व भ्रष्टाचार झाले पण ते सर्वच समाज विसरून जातात, बहुजन समाज मात्र त्यावर कायमच चिंतन करत राहतो. संघटित न होता असंघटित होत जातो.काँग्रेस व भाजपने देशाला दलित,मुस्लिम, आदिवाशी राष्ट्रपती दिले. पण त्यांना भारताचे प्रथम नागरिक म्हणून जो मान सन्मान दिल पाहिजे तो दिला काय ?. मग या विरोधात या तिन्ही समाजाने काय संघर्ष केला.देशाच्या प्रथम नागरिकाचा अपमान केला जातो तेव्हा प्रोटॉकल आणि सुरक्षा यंत्रणा काय करत असते?.बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा.

कांशीराम (ज्यांना ‘मान्यवर’ किंवा ‘साहेब’ म्हणून ओळखले जाते) हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली नेते, क्रांतिकारी समाजसुधारक आणि बहुजन समाज पक्षाचे (BSP) संस्थापक होते.त्यांचा जन्म: १५ मार्च १९३४ रोजी पंजाबमधील रोपड जिल्ह्यातील खवासपूर (पीरथपूर बुंगा) या गावात झाला.त्यांचे कुटुंब रामदासिया शीख कुटुंबातील होते,जे मूळचे दलित चमार समाजाचे समजल्या जाते.त्यांचे शिक्षण: त्यांनी रोपड येथील शासकीय महाविद्यालयातून (पंजाब विद्यापीठ) बीएससी (B.Sc.) पदवी पूर्ण केली.नोकरी करत असतांना त्यांच्या जीवनात सामाजिक परिवर्तनाची ठिणगी पडली.१९५७ मध्ये त्यांनी जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवली होती, परंतु एका बॉन्डवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यांनी ती सोडली.त्यानंतर त्यांनी पुण्यातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये संशोधक म्हणून काम केले.नोकरीदरम्यान त्यांच्या एका सहकाऱ्याला (दीना भाना) बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रजा मागितल्यामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे कांशीराम व्यथित झाले आणि त्यांनी दलित हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी त्यांनी प्रथम संघटनात्मक बांधणी सुरू केली. कांशीराम यांनी बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या संघटनांची स्थापना केली:बामसेफ (BAMCEF – 1978): चा पूर्ण अर्थ बैकवर्ड एंड माइनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाइज फेडरेशन (Backward and Minority Communities Employees Federation) असा होतो.अनुसूचित जाती (एस सी),अनुसूचित जमाती (एस टी) आणि मागासवर्गीय (ओबीसी) अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी याची स्थापना केली.डीएस-४ (DS-4 – 1981): ‘दलित शोषित समाज संघर्ष समिती’ च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चेतना निर्माण केली.बहुजन समाज पक्ष (BSP – 1984): शेवटी, त्यांनी १४ एप्रिल १९८४ रोजी या राजकीय पक्षाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश बहुजन समाजाची सत्ता स्थापन करणे हा होता.कांशीरामजी चे राजकीय योगदान त्यांनी “ज्याची जेवढी संख्या भारी, त्याची तेवढी भागीदारी” हा नारा दिला.उत्तर प्रदेशात बहुजन समाजाची सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, जिथे त्यांनी मायावतींना मुख्यमंत्री बनवले.त्यांनी स्वतः कधीही मोठे राजकीय पद स्वीकारले नाही, तर समाज आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले.९ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे दीर्घ आजाराने निधन झाले.कांशीराम यांना आजही दलित राजकारणाचे “भीष्म पितामह” आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जमिनीवर उतरवणारा “बहुजन नायक” मानले जाते.
बसपाने बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण घेण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती केली आहे.सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे अनेक जिल्ह्याला दिली आहेत, त्यामुळेच बहुजन समाजात वैचारिक व आर्थिक क्रांती झाली.त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात मोठा बदल झाला.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने महत्वपूर्ण करून ठेवले “जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागेदारी” संपली.जिसका पैसा भारी उतना उसका पद भारी झाली.त्यामुळे घरादाराची परवा न करता बसपा साठी काम करणाऱ्या जीवदानी कॅडर चे मरण झाले.आणि त्यामुळेच चमचा युग काय करू शकते.हे दाखवून दिले.मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून मान्यवर कांशीराम यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने देणगी,बुद्धी,वेळ आणि पैसा मिळविला त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक, राजकिय नेत्याने असे धाडस केले नाही.कांशीराम यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.
कांशीरामजी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा व मायावती आज प्रत्येक समाजाच्या घरात पोचली आहे,त्यामुळेच ब्राम्हण,बनिया,क्षेत्रीय समाज आता मोठ्या प्रमाणात बसपा मध्ये सहभागी होऊन जयभिम बोलतो आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हितासाठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजातील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो. कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा मान्यवर कांशीराम यांच्या स्मृर्ती दिनी बहुजन समाजाला विसरता येत नाही. काँग्रेस,भाजपा ज्या प्रमाणे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता काबीज करते त्याच प्रमाणे बसपाची वाटचाल आता सुरू झाली आहे, त्यामुळेच बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. असे स्वप्न पाहण्यास हरकत नसावी, सर्व समाजाला सोबत घेतल्या शिवाय सत्ता प्रस्थापित करता येत नाही, त्यासाठी इतर पक्ष ज्या प्रमाणे काम करतात तसेच बसपाला करणे आवश्यक आहे, परिस्थिती नुसार बदल घडवून आणला पाहिजे त्यादृष्टिकोणाने मायावती योग्य प्रकारे राजकारण करत आहेत असे समजले पाहिजे,त्या सर्वांना सोबत घेऊन केंद्रातील सत्ता हस्तगत करू शकतात.

मान्यवर कांशीराम जी च्या तालमीत तयार झालेल्या मायावती समजून घ्यायला मोठी अडचण आहे. दूरदृष्टी ठेवून काम केल्यास राष्ट्रीय पातळीवर मायावती च्या तोडीचे धाडसी राजकीय नेतृत्व दुसरे नाही.परिस्थिती नुसार माणसं बदलतात,तसेच राजकीय समीकरण आर्थिक परिस्थिती नुसार बदलतात,बहुजन समाजातील लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे,काँग्रेस,भाजपा कम्युनिस्ट, समाजवादी पक्षात सर्व समाजाचे लोक काम करू शकतात मग बसपात का नाही,इतर समाजाचे लोक बसपात सहभागी झाले तर प्रत्येक वेळी त्यांच्या जातीचा बाहू करता काम नये,वैचारिक फुटपट्या सर्वच ठिकाणी वापरल्या जात नाहीत, देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती दलित आहे,त्याला मंदिरात प्रवेश नाही,अनेक आमदार खासदार मागासवर्गीय समाजातील आहेत,त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तरी त्या त्या पक्षात त्यावर चर्चा होत नाही. म्हणूनच बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. ही घोषणा यशस्वी झाली नाही. मान्यवर कांशीराम यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे धाडस आत्मसात केले पाहिजे तरच राजकारणात यशस्वी होता येते. त्यानुसार मायावती यांना बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. हे कांशीरामजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 92 व्या जयंती दिना निमित्ताने ठरवावे लागेल.मान्यवर कांशीरामजी यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार वंदन
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,
