जनप्रहार कामगार संघटना जिल्हा कमिटी हिंगोली यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला.
जनप्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांना नोंदणी,नूतनीकरण करण्यासाठी शासनाने खुली साईट बंद केली आहे.ती कशी चालू होईल व शासन स्तरावरून कश्या पध्दतीने मार्गी लावता येईल त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच चालू न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली.संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडविल्या जातील यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे राज्य सदस्या सविता इंगळे,जिल्हाध्यक्ष पंडित पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव वाघमारे,युवा जिल्हाध्यक्ष सर्जेराव खंदारे,कळमनुरी तालुकाध्यक्ष विश्वनाथ पतंगे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता गायकवाड,हिंगोली तालुका महिला आघाडी कांचन इंगोले,श्रीवंता बर्गे,चोंडेकर ताई आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पवन ढवळे तर आभार राजेश पारधे यांनी मांडले.