संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक
अन्याय अत्याचार झाला तर प्रथम पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जावे लागते.पोलिस अन्याय अत्याचार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत नसतील तर त्या विरोधात जन आंदोलन हे आलेच. जनआंदोलन केल्या नंतर जर पोलिस लाटी चार्ज करीत असतील तर खरे गुन्हेगार कोण ठरणार.सरकार म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते गुन्हेगारांना वाचविण्यासाठी तक्रारदार नागरिकांची तक्रार दाखल करून घेत नसतील. तर त्या विरोधात प्रथम आंदोलन हे गुन्हेगार व पोलिसांच्या विरोधातचं होत असते. त्यात नागरीकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला तर उद्रेक झाल्या शिवाय राहत नाही. बदलापूरत हेच घडले दोन दिवस पोलिस चिमुकल्या मुलीवर झालेल्या अन्यायची दाखल घेत नव्हते म्हणून बदलापूरात हा जनउद्रेक 13 ऑगस्ट ल घटना घडली तेव्हा पोलिसांना आर एस एस प्रणीत भाजपच्या राजकीय नेत्याच्या शाळा,संचालक संस्था वाचविणे महत्वाचे वाटले म्हणून त्यांनी पालकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा पाच सहा हजार विद्यार्थाचे पालक एकत्र रस्त्यावर आले आंदोलन केले तेव्हा पोलिसानी 16 ऑगस्ट 24 ला एफ आय आर दाखल करून घेतला आणि संबंधित व्यक्तीचे जबाब 21 ऑगस्ट ला घेतात म्हणजे हे पोलिस अधिकारी सरकारी सेवा देतात की राजकीय नेत्याचे गुलाम आहेत दाखवून देतात.त्यांना स्वतची सदविवेक बुद्धी नाही त्याचे शिक्षण, प्रशिक्षण हे मनुवादी विचारांच्या संस्कारा समोर लोटांगण घालते हे या घटनेचा घटनाक्रम पाहिल्यावर कोणाच्याही लक्षात आल्या शिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री गृहमंत्री आपल्या पक्षाच्या नेत्यांना व विचारधारेच्या शाळा संचालक संस्था वाचविण्यासाठी विरोधकांना राजकारण करण्याचा आरोप करीत आहे.ठाणे जिल्ह्यातील एका तीन वर्ष आठ महिन्याच्या व दुसऱ्या चार वर्षाच्या चिमूकलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्या नंतर अनेक ठिकाणी दाबून ठेवलेले असे प्रकरणे प्रकर्षाने उघड होत आहेत. त्या विरोधात सर्व पक्षीय 24 ऑगस्ट ला महाराष्ट्र बंद होत आहे.
पोलीसच न्याय देत नसतील तर संघर्ष कोणा बरोबर करावा ?. संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक तीव्र झाल्या शिवाय राहणार नाही. सरकार आदेश देणार पोलीस अंमलबजावणी करणार आणि नागरिक संघर्ष करणार,हे चक्र थांबत नाही.सध्या आपल्या देशात हेच चालू आहे.त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही. सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत.सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील नागरिकांचे आर्थिक शोषण करीत असतात.सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी योजना, बिल बनविणार त्यांची अंमलबजावणी कर्मचारी अधिकारी पोलीस करणार.सरकारच्या धोरणाला विरोध कोण करणार?. कामगार,शेतकरी,ग्राहक म्हणजेच नागरिक मोर्चे आंदोलने करणार पोलीस त्यांच्यावर बळाचा वापर करणार,आणि आदेशाचे पालन करणार.प्रत्येक नेता आणि शासकीय कर्मचारी अधिकारी नागरिकांचे वेगवेगळा पद्धतीने आर्थिक शोषण करणार आणि सांगणार सरकारचा आदेश आहे.आम्ही काय करणार?.सरकारच्या कोणत्याही खात्यात जा चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही.नाहीतर एक नाही अनेक चुका काढल्या जातात.मग कार्यालयात चकरा माराव्या लागतात.त्यामुळे एक तर रोजगार बुडतो आणि येण्याजाण्याचा प्रवास खर्च चहा पाणी जेवणा चा खर्च हा आलाच.तो करण्यापेक्षा चिरीमिरी देणेच सोयीस्कर परवडते.हाच सर्व नागरिकांना सरकारी खात्याचा अनुभव आला असेल.म्हणूनच सरकारी खाते हे खातेच असते.त्यांचे मालक कर्मचारी अधिकारी असतात.
एकटा दुकटा नागरिक संघर्ष करू शकत नाही.त्यासाठी प्रत्येक खात्यातील लाभार्थीची एकजूट म्हणजेच संघटना असायला पाहिजे.आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावी.स्वतंत्र विचारांची असावी.मी असंघटीत नाका कामगारांची नांव नोंदणी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो.पण शासकीय अडचणी दूर होत नाहीत.आणि नाका कामगारांना तेवढा दररोज संघर्ष करण्यासाठी वेळ नाही.तरी प्रत्येक तालुका जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगार नाका कामगारांच्या विविध संघटना मोर्चेबांधणी करून जनांदोलन करीत असतात.ते करीत असतांना संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक कायम असतो.म्हणूनच त्रिकोणी संघर्ष टाळावा.राजकारणी राज्यकर्ते आणि सर्वच खात्याचे कर्मचारी अधिकारी नागरिकांचे ग्राहकांचे वर बोट दाखवून आर्थिक शोषण ते संघटीतपणे करतात म्हणूनच आपण ही संघटीत झाले पाहिजे.
भारतीय नागरिकांच्या कामगार,कर्मचारी अधिकारी,पालक,ग्राहक,रहिवाशी अनेक समस्या आहेत. त्यासोडविण्यासाठी संघटना हव्या असतात. प्रत्येक विषयाचा अभ्यास करून चर्चा करून त्या सोडविण्यासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे.आपल्या महान भारत देशाची महान मनुवादी चातुर्वर्ण् व्यवस्था आहे.चातुर्वर्ण् ब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक.क्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक.वैश्य :- शेतकरी आणि व्यापारी.शूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे.आपला देश भारतात स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली तरी हा दिवस ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक मानल्या जातो. म्हणूनच सरकारी आणि खाजगी कार्यालये तसेच बँका, शाळा आणि महाविद्यालये आणि देशातील इतर सर्व संस्थांसाठी ही राष्ट्रीय सुट्टी चा दिवस असतो. त्याचे दोन दिवस अगोदर शाळेत टिळाधारी धर्माचे पालन व रक्षण करणारा नराधम चिमुकली वर अन्याय करतो यांचे बहुसंख्य लोकांना वाईट वाटत नाही. त्यात त्यांना राजकारण दिसते.
म्हणूनच देशाची घटना बनविणाऱ्यानी लिहून ठेवले आहे आणि मागसवर्गीयांना वेळोवेळी सांगितले आहे. “मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही” संघटीत होऊन संघर्ष केला तर यशस्वी होता येतो.प्रत्येक वेळी प्रथम संघर्ष हा उच्चवर्णीय,उच्चवर्गीय मनुवादी विचारांच्या समर्थक पोलिस अधिकाऱ्या बरोबर संघर्ष होत असतो.संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक संघर्ष पत्र व्यवहार करून टाळता येऊ शकतो.असंघटित असला तर अन्याय अत्याचार हा ठरलेला आहेच.संघटित झाला तर शक्ती प्रदर्शन आवश्यक आहेच.त्या शिवाय बदलापूर सारखा जन आक्रोश प्रगट होत नाही.या पासून सर्व मागासवर्गीय समाजाने बोध घ्यावा.पोलीसच न्याय देत नसतील तर संघर्ष कोणा बरोबर करावा ?. संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक हा कायम स्वरूपी ठरला आहेच.