
विशेष प्रतिनिधी मुंबई -माटुंगा मुंबई येथील 140 वर्षाच्या इंजिनिअरिंग कॉलेज ; वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजीकल इन्स्टिट्यूट च्या 22 कंत्राटी कामगारांचा पगार रखडवला होता मॅनेजमेंट आणि ठेकेदारांनी.शिव स्वराज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड.अमोल मातेले (शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे) त्यांनी व्हीजेटीआय संचालक, डॉ.सचिन कोरे यांच्या माटुंगा मुंबई येथील ऑफिसवर सदरील कामगार व कार्यकर्ते यांनी धडक दिली.

लगेच दुसर्या दिवशी व दिवाळी आगोदर थकित पगार देऊन लबाड ठेकेदाराला नारळ देण्याचे मान्य केले.तसेच व्हीजेटीआय मधे काही भंपक अधिकारी झारितले शुक्राचार्य बनून संस्थेच्या कामात खो घालत आहेत म्हणून या चहा पेक्षा किटली गरम वाले जे पदावर बसले आहेत त्यांना सुधरा किंवा पदावरून हाटवा असा इशारा संघटनेने दिला.
या संस्थेचे खूप मोठे नाव आहे आणि काम पण आहे त्यामुळे आम्हाला वारंवार कंत्राटदारांपुढे नियमित गोष्टी साठी यावे लागू नये याची खबरदारी संचालक डॉ. सचिन कोरे यांनी घ्यावी असे ऍड.अमोल मातेने यांनी ठणकावून सांगितले.यावेळी व्हीजेटीआय माटुंगा मुंबई चे संचालक डॉ सचिन कोरे,एडव्होकेट मातेले, सुधीर जाधव-,मुंबई राष्ट्रवादी (श.प.) चे तरुण तडफदार पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.
सुधीर जाधव – ९८६९४१५५३३ यांस कडून


