सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे दिवाळी राष्ट्रीय उत्सव आहे. 

बातमी शेअर करा.

 Diwali is a  National festival Supreme Court’s Order dated 29/20/2026 दिवाळी हा राष्ट्रीय उत्सव आहे!

लवकरच दीपावली/दिवाळी सण सुरू होणार आहे.कट्टर आंबेडकरवादी बौध्दजन बावीस प्रतिज्ञा अधोरेखित करुन बौध्दजनांनी दिवाळी सण साजरा करू नये. ह्या आशयाचे संदेश WhatsApp ग्रुपवर पोस्ट करायला सुरुवात करतील व दिवाळी सण हिंदुंचा धार्मिक सण आहे आपण बौध्द आहोत म्हणून दिवाळी सण साजरा करू नये असे फतवे काढतील हा सण साजरा करणाऱ्या बौध्द बंधू भगिनींना गद्दार,बेईमान व आंबेडकरद्रोही अशी दुषणे देतील. अशा आंबेडकरवादी बौध्दजनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील खाली नमूद केलेले काही मुद्दे वाचावेत.
ORDER OF SUPREME COURT
dated 29 October 2026
In such context, we may observe that, in an order dated 29 October 2026, passed by the Supreme Court, in Arjun Gopal & Ors. vs. Union of India & Ors.It has been categorically observed that ‘Deepawali’ / ‘Diwali’ is the festival of lights. It was observed that over the centuries, it has partaken the character of a national festival, so much so, that at present, one can even consider it as an international festival. Most importantly, the Supreme Court observed that the festival is celebrated by people regardless of their caste, community and religion.
The Supreme Court observed that it is a festival celebrated for centuries, bringing joy and prosperity to every individual, dispelling darkness and ensuring .
Ancient Hindu scriptures such as the ‘Skanda Purana and the ‘Padma Purana refer to the use of lamps as a ritual, while observing the festival of Deepawali. With the introduction of gun-powder in India a few centuries ago, the celebration underwent a change. This led to the introduction of bursting firecrackers, which have been extensively done for many years.


अशा संदर्भात, आपण हे पाहू शकतो की, अर्जुन गोपाल आणि इतर विरुद्ध भारत सरकार आणि इतर या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात,असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘दीपावली’ / ‘दिवाळी’ हा दिव्यांचा सण आहे. असे निरीक्षण नोंदवले गेले की, शतकानुशतके या सणाला राष्ट्रीय उत्सव स्वरूप प्राप्त झाले आहे, इतकेच नव्हे तर, सध्या याला आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणूनही मानले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, हा सण लोक त्यांच्या जात, समुदाय आणि धर्माचा विचार न करता साजरा करतात.सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, हा शतकानुशतके साजरा केला जाणारा उत्सव आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो, अंधकार दूर करतो आणि सुरक्षितता सुनिश्चित करतो.
    प्राचीन हिंदू धर्मग्रंथ जसे की स्कंदपुराण आणि पद्मपुराण, दिवाळीचा सण साजरा करताना एक विधी म्हणून दिवे वापरण्याचा उल्लेख करतात. काही शतकांपूर्वी भारतात दारूगोळ्याच्या आगमनाने या उत्सवात बदल झाला. ह्यामुळे फटाके फोडण्याची प्रथा सुरू झाली, जी अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
दिवाळीला वामनाने महामानव बळीराजाला पाताळात गाडले आणि कृष्णाने बहुजन प्रतिपालक नरकासूर या राक्षक नव्हे रक्षकाला ठार मारले म्हणून त्या आनंदाच्या प्रित्यर्थ दिवाळी सण साजरा केला जातो अशी अख्यायिका सांगितली जाते. तसेच याच काळात सम्राट अशोक राजा यांचेक आठवे वंशज बौध्द राजा बृहद्रथ  मौर्य यांची हत्या करून आर्यवंश पुष्यमित्र शुंगाने आपल्या समाजाचे सत्ता आणली म्हणून हा त्यांच्या ब्राम्हणी सत्तेचा विजय म्हणूनही ते दिप लावून आनंद साजरा करतात. तीच ही दिवाळी असल्याचेही बौध्द सांगतात. तेव्हा ब्राम्हणी दिवाळी सणाचे दिवस हे  बहुजन व बौध्दांच्यासाठी काळे दिवस आहेत. आपले महामानव नरकासूर, बळीराजा व बृहद्रथ यांच्या स्मृतिदिन आहे.बौध्दांनी दिवाळी सण साजरा करू नये बौध्दजन आवाहन करतात.
    मुळात दस्तुरखुद्द डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौथ्या प्रतिज्ञेत देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही. ही आख्यायिका (दंतकथा) आहे.त्यामुळे वामनाने बळीराजाला पाताळात गाडले, म्हणून दिवाळी साजरी केली जाते, हे म्हणणे साफ चुकीचे आहे.बृहद्रथ ह्या बौध्द राजाची हत्या हा इतिहास आहे.मात्र, ही हत्या दिवाळी सणांत झाली, ह्याला ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे का?  काही लोक म्हणतात दिवाळी बौद्धांनी का साजरी करू नये, का तर महामोगल्लान यांची हत्या झाली म्हणून आपण दिवाळी साजरी करू नये.
   जर आपल्या  बहिणीची किंवा पत्नीची हिंदू मैत्रीण बौध्द व्यक्तीस भाऊबीजेच्या दिवशी ओवाळायली आली तर तिला काय सांगणार? आम्ही बौध्द आहोत, दिवाळी सण साजरा करीत नाही. मुसलमानांचा शीरखुर्मा आणि ख्रिश्चनांचा केक बौध्द समाजाला चालतो. मग, रक्षाबंधन व भाऊबीज का चालत नाही? माझ्या अल्पस्वल्प ज्ञानानुसार असले तालीबानी वर्तन बौध्द शिकवणुकीत नाही.रक्षाबंधन व भाऊबीज ह्यासारख्या उत्सवांना/सणांना धार्मिक बंधने घालणे मला पटत नाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर,१९५६ रोजी दिलेल्या प्रतिज्ञांतील अकरावी आणि बारावी प्रतिज्ञा.
अकरावी प्रतिज्ञा
मी तथागत बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
बारावी प्रतिज्ञा
तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
मैत्री पारमिता : – आपला मित्र असो वा शत्रु, आपला हितचिंतक असो वा टीकाकार सांप्रती दयाभाव, प्रेमयुक्त दया बाळगणे म्हणजे मैत्री होय, केवल मनुष्याप्रतीच मैत्री नव्हे तर सर्वच प्राणी मात्रांप्रती दयाभाव. प्रेमभाव ठेवणे, प्रेम युक्त दयाभाव म्हणजे मैत्री होय. मैत्रीला कसलीच बंधने व सीमा नसतात. मैत्री ही वैश्विक असते. ती प्रांत व देशांच्या सीमा ओलांडून जाते ती बंदीस्त नसते, म्हणून मैत्री ही अत्यंत महत्वाची आहे. मैत्रीचा लोप म्हणजे विनाश होय.
आपणास तथागत गौतम बुध्द यांनी  (Metta) मंगलमैत्रीचा संदेश दिलेला आहे.तो स्वागतार्ह व स्वीकारार्ह आहे.हाच मंगलमैत्रीचा संदेश मार्क झुकेरबर्ग यांनी जागतिक स्तरांवर Facebook Logo द्वारे स्वीकारलेला आहे.

Metta
Metta is goodwill, loving kindness, universal love, a feeling of friendliness and heartfelt concern for all living beings, human or non human, in all situations. The chief mark of metta is a benevolent attitude: a keen desire to promote the welfare of others. Metta subdues the vice of hatred in all its varied shades: anger, ill will, aversion, and resentment.
The Buddha said:
Hatreds do not cease through hatreds
Anywhere at anytime.
Through love alone do they cease:
This is an eternal law.

मैत्री
मैत्री म्हणजे सदिच्छा, प्रेमळपणा, वैश्विक प्रेम, सर्व परिस्थितीत, मानव असो वा मानवेतर, सर्व सजीवांबद्दल वाटणारी मैत्रीची आणि मनापासूनची काळजीची भावना. मैत्रीचे मुख्य लक्षण म्हणजे परोपकारी वृत्ती: इतरांचे कल्याण साधण्याची तीव्र इच्छा. मैत्री द्वेषाच्या सर्व विविध छटांवर, जसे की राग, वैर, तिरस्कार आणि संताप यांवर मात करते.


बुध्द म्हणाले:
द्वेष द्वेषाने संपत नाही
कुठेही, कधीही.
केवळ प्रेमानेच ते संपतात:
हा एक शाश्वत नियम आहे
जगाने भगवान गौतम बुध्द यांच्या मंगलमैत्रीचा स्वीकार केलेला आहे.परंतु, महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौध्दजन मंगलमैत्रीचा अजुनही स्वीकार व आचरण करायला तयार नाहीत.ह्याचे सखेद आश्चर्य वाटते.
एखादा बौध्द स्वत:स कितीही कट्टर बौध्द म्हणवून घेत असला तरी घटनेच्या पंचविसाव्या कलमानुसार तो हिंदूच आहे. राज्यघटना शीख, जैन व बौध्द धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून घटना मान्यता देत नाही. मुस्लिम धर्मिय आणि ख्रिश्चन धर्मिय बांधवांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत.शीख,जैन व बौध्द धर्मियांसाठी एकाच नावाची ‘हिंदू स्मशानभूमी’ आहे.साधारण इसवी सन १०० ते ६०० या कालखंडात लेण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान कसे होते ह्यावर जर आपण प्रकाश टाकला तर याचे  उत्तर नक्की मिळते.  बॉम्बे प्रेसिडेन्सी च्या खंड १४ मध्ये पान नं १४५ वर दिवाळीचा उल्लेख आहे आणि ह्याकाळात कान्हेरी लेणी वर दिवे लावले जात होते असा उल्लेख सापडतो. एकूण सांगायचे झाले तर दिवाळी हा काही विशिष्ट धर्माचा सण नाही तो खऱ्या अर्थाने निसर्गपूजक लोकांनी निर्माण केलेला उत्सव आहे.
Reference:
GAZETTEER BOMBAY PRESIDENCY VOLUME XIV published in 1882 by JAMES M.CAMPBELL
Festival of Lights It marked the time during which the monks originally gathered after their eight months’ wandering and lived together reading the scriptures and teaching one one another.The climate and the position of Kanheri would make it difficult to have large gay open air meeting which mark this season in other Buddhist countries,the favorite jataka or story of Buddha’s live
But preaching booths bana mandaps were raised in the front of chapels and shelter provided,so that visitors could hear in comfort the favorite jatakas or stories of Buddha’s lives.Besides these Holy seasons, there were three yearly holidays, at the beginning of spring, in the later spring, and at the end of the rainy seasons old nature-worship days to which events in Gautama’s life had been made to fit.Of these the chief of the autumn festival,the divali, when sermans were preached and the the whole hillside cells, chapels and stairs were ablaze with lights.This was also the yearly confession of the whole congregation,and the the time when when layman brought the monks their yearly gifts cloths.
हा तो काळ होता जेव्हा भिक्षू त्यांच्या आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर मूळतः एकत्र जमत असत आणि धर्मग्रंथ वाचत व एकमेकांना शिकवत एकत्र राहत असत. कान्हेरीचे हवामान आणि भौगोलिक स्थानामुळे इतर बौद्ध देशांमध्ये या काळात होणाऱ्या मोठ्या, उत्साही आणि मोकळ्या हवेतील सभा घेणे कठीण होते. परंतु प्रार्थनास्थळांच्या समोर प्रवचनासाठी बाना केळींच्या पानांचा मंडप उभारले जात आणि निवाऱ्याची सोय केली जात असे, जेणेकरून अभ्यागत आरामात बुद्धांच्या जीवनातील आवडत्या जातक कथा ऐकू शकतील. या पवित्र ऋतूंव्यतिरिक्त, वसंत ऋतूच्या सुरुवातीला, वसंत ऋतूच्या उत्तरार्धात आणि पावसाळ्याच्या शेवटी असे तीन वार्षिक सण असत – हे जुने निसर्ग-पूजेचे दिवस होते, ज्यांच्याशी गौतमाच्या जीवनातील घटना जुळवून घेतल्या गेल्या होत्या. यापैकी मुख्य सण म्हणजे शरद ऋतूतील दिवाळी, जेव्हा प्रवचने दिली जात आणि डोंगरावरील संपूर्ण खोल्या, प्रार्थनास्थळे आणि पायऱ्या दिव्यांनी उजळून निघत. हा संपूर्ण भक्तगणाचा वार्षिक कबुलीजबाबही होता आणि याच काळात सामान्य लोक भिक्षूंना त्यांची वार्षिक भेटवस्तू – वस्त्रे – आणत असत.

शरद आढाव,९८३३१७५६६६९,भांडुप मुंबई
दिनांक:०४/११/२०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *