गेल्या महिन्यात दोन महत्वपूर्ण घटना महाराष्ट्रात पहायला मिळाल्यात.एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत छावा चित्रपट प्रकाशित झाला. हा चित्रपट श्री शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीवर आधारीत आहे, चित्रपटाचे निर्माते श्री दिनेश विजन व दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत श्री विकी कौशल व औरंगजेब यांच्या भूमिकेत श्री अक्षय खन्ना यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट असल्यामुळे वास्तविक सामाजिक भूमिका जनतेसमोर प्रस्तुत करने हे अपेक्षित होते परंतु दुर्दैव म्हणजे महार जातीच्या शुरवीरांच्या इतिहासाकड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.अंगरक्षक रायप्पा महार ज्यांनी संभाजी महाराजांना सोडविण्याचा शेवटचा धाडसी प्रयत्न केला व प्राणाचे बलिदान दिले, गोपाळ गणपत महार जे संभाजी महाराज यांच्या लढाईत अग्रसर राहत असायचे या इतिहासावर पड़दा टाकण्यात आला. गणपत (गायकवाड) महार व अनेक महार सैनिक ज्यांनी रायगढ़ किल्ल्याचे उत्कृष्ट बांधकाम केले,किल्ल्याची रक्षा केली,लढाईत योगदान दिले या कडे चित्रपटात दुर्लक्ष करण्यात आले.औरंगजेबाच्या धास्तीमुळे संभाजी महाराज यांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्यास कोणीही समोर येत नव्हते अश्या कठीण परिस्थितीत गोविंद महार व त्यांचे साथीदार यांनी पूढ़ाकार घेऊन संभाजी महाराज यांच्या देहाचे छिन्न छिन्न अंग/अवयव गोळा करून व शिवून घेऊन महारवाड्या शेजारी अग्नी देऊन सन्मानपूर्वक अंतिम संस्कार केला हे पूर्णपणे चित्रपटात झाकण्यात आले. संभाजी महाराजासोबत विश्वासघात करणारे गणोजी शिर्के याकडे कॅमेराचे लक्ष्य गेले परंतु अन्नाजी दत्तो यांच्याकडे कॅमेराने पाठ दाखविली. कटकारस्थान करणारे व ज्यांना हत्तीच्या पायाखाली तुडविण्यात आले असे बाळाजी आवजी, श्याम आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जत या घटनेला जास्त महत्व न देता कॅमेरानी धावती दृष्टी ठेवली.
दूसरी महत्वपूर्ण घटना म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेला महार समाजाचा गौरवशाली इतिहास. भारतीय सैन्य दलातील महार रेजीमेंट शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव सभारंभमधे महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री श्री देवेंद्र फड़णवीस यांचे गाजलले भाषण व महार समाजा विषयी काढलेले गौरव उदगार. मी श्री फडणवीस यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करीत आहो असा गैरसमज करू नये. परंतु जे लोक विशेष करून मराठा/ओबीसी समाजाचे जे महार समाजाच्या गौरवशाली इतिहासाला हीन/तुच्छ भावनेने मान्यता देत नाही किंवा स्वीकार करीत नाहित त्यांच्यासाठी हे भाषण मोलाचे आहे कारण “सोनाराच्या हातानी कान टोचलले” व “काट्यानी काटा काढलेले” केव्हाही बरे. श्री फडणवीस यांचा उद्देश काय हे महत्वाचे नाही आहे कदाचित त्यांचा इशारा “जरांगेशाही” कडे असेलही.श्री फडणवीस आपल्या भाषणात जे म्हणतात “जो समाज आपल्या इतिहासाला, शुरविरांना,सैनिकांना विसरतो……. ” याचा रोख महार समाजाकडे राहुच शकत नाही. परंतु याचा बोध मराठा समाजाने घ्यायला पाहिजे जे महार समाजाचा गौरवशाली इतिहास नाकारतात, जे मराठा साम्राज्यला बाजुला ठेऊन पेशवाईला शरण गेलेत,जे छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे सन्मानपूर्वक रक्षण ही करू शकले नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला व शिव जयंती प्रारंभ केली तर संभाजी महाराज यांची समाधी 1939 मधे जेष्ठ इतिहासतज्ञ श्री बेंद्रे यांनी अरण्यातुन/जंगलातुन शोधून काढली. श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे संक्षिप्त उदगार त्यांच्याच भाषेत :
“आज आपल्या सगळ्याकरिता गौरवाचा दिवस आहे की भारताच्या इतिहासामधे ज्या महार रेजीमेंट नी प्रचंड मोठी शौर्याची कामगिरी केली त्या रेजीमेंट च्या शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव, त्यांच्या कुटुंबियांचा गौरव आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला संधी मिळाली आहे. खरतर एक मोठा इतिहास या रेजीमेंट चा देखील राहला आहे. विशेषता आपण बघीतल तर अतिशय प्राचीन काळा पासून आणि विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पासून आमच्या महार समाजातील शौर्य गाथा त्या ठिकाणी पहायला मिळतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्वाच्या पदावर आमच्या त्या वेळेच्या महार समाजाच्या सैनिकांना वेगवेगळ्या जवाबदाऱ्या दिल्या आपण बघितल्या आणि शिवाजी महाराजांचे किल्ले असतील,संभाजी महाराजांचे किल्ले असतील या किल्लाच्या सरंक्षणाची जवाबदारी मोठ्या प्रमाणात आमच्या महार सैनिकांना त्या वेळेस होती.रायगड किल्ल्याचे किल्लेदार ज्यांना शहनाक महार या नावाने ओळखले जायचे यांची देखील एक प्रचंड वीरगाथा आपल्या सगळ्याना ज्ञात आहे.त्याचप्रमाणे रोहडा किल्ल्याची जवाबदारी असणारे कालनाथ महार व सोनकर महार यांची देखील एक अत्यंत मोठी गाथा आपण सगळ्यांनी अनेक वर्ष पाहली आहे. बुर्हाणपूरमधे ज्या वेळेस संभाजी महाराजांना शत्रुनी घेरल त्यावेळी 25 महार सैनिक त्याठिकाणी गेले आणी ज्या प्रकारे त्यांनी सम्पूर्ण महाराजांना संरक्षण दिल आणी त्या ठिकाणच मुगल सैन्य कापून काढल याची देखील एक फार मोठी शौर्य गाथा आपण सगळ्यांनी बघीतली आहे आणी म्हणून आपण जर बघीतल तर मोघलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीचे महार आणी मोजे विलम चे सिद्धनाथ महार यांचा देखील गौरवशाली इतिहास या ठिकाणी आपल्याला पहायाला मिळाला आहे. खरड्याची लढाई असो,भीमा कोरेगांवची लढाई असो, एक प्रचंड मोठे शौर्य महार सैनिकांनी त्या ठिकाणी केल्याच आपण इतिहासा मधे सातत्याने पाहतो आणी अश्याच या सैनिकांच्या माध्यमातन त्या ठिकाणी महार रेजिमेंट ज्या वेळी तयार झाली आणी अतिशय मोठे शौर्य महार रेजीमेंटनी त्या काळात गाजविल. दुर्दैवाने ही रेजीमेंट बंद झाल्यानंतर पुनः एकदा ज्या वेळेस पहिले महायुद्ध शुरू झाल त्यावेळी ब्रिटिशांना पुनः एकदा सैनिकांची आवश्यकता होती, शुरुवीरांची आवश्यकता होती आणी म्हणून पुनः 1917 साली पुनः एकदा महार रेजीमेंटच पुनर्जीवित करण्यात आल परंतु दुर्दैवाने लढाई संपल्यानंतर इतक्या अतुल शौर्य ज्या रेजीमेंट नी गाजविल लढाई संपल्यानंतर पुनः एकदा त्या रेजीमेंटला बंद करण्याचे काम करण्यात आले. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरानी 1941 साली पुनः एकदा पुढाकार घेतला आणी इंग्रजाच्या समोर या महार रेजीमेंटच्या शौर्याची गाथा मांडली आणी इंग्रजांना लक्षात आणून दिल की ज्या ज्या वेळी आवश्यकता पडली त्या त्या वेळी या महार रेजीमेंटनी इतक अतुलनीय शौर्य दाखविले आहे आणी इंग्रजांना जे काही विजय प्राप्त झाले किंवा इंग्रजाना वेगवेगळ्या पहिले महायुद्ध असेल, दुसऱ्या महायुद्धाची शुरुवात असेल या सगळ्या महायुद्धात हे जे काही आमचे महार रेजीमेंटचे सैनिक आणी अधिकारी आहेत यांच्या मुळेच खऱ्या अर्थान तक धरता आला व विजय प्राप्त करता आला आणी म्हणून पुनः त्याच स्वरूपामधे ही रेजीमेंट शुरु झाली पाहिजे. अश्या प्रकारचा आग्रह त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला आणी 1941 साली महार रेजीमेंटची पुनर्स्थापना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळेच झाली आणी या ठिकाणी त्यांची सगळी शौर्य गाथा या ठिकाणी आपण बघीतली आहे. लढाई कुठली ही असो त्या लढाई मधे ज्या प्रकारच अतुलनीय शौर्य आमच्या महार रेजीमेंटनी दाखविले आहे. आपण बघीतल 9 युद्ध क्षेत्र सन्मान,12 रनक्षेत्र सन्मान,1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ठ सेनापदक, 4 महावीर चक्र, 4 कीर्ति चक्र, 1 पदमश्री, 3 उत्तम सेवा पदक, 16 अति विशिष्ठ सेवा पदक, 30 वीर चक्र, 39 शौर्य चक्र आणी 220 सेना मेडल असा हा प्रचंड मोठा शौर्याचा आलेख आमच्या महार रेजीमेंटनी खऱ्या अर्थाने या देशात उभा केला आहे आणी म्हणून या आमच्या महार रेजीमेंटच्या शूर सैनिकांचा या ठिकाणी सत्कार व्हावा आणि या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुनः एकदा त्यांच्या शौर्याची गाथा ही संपूर्ण भारतासमोर यावी आणी अनेकांना प्रेरणा मिळावी या दृष्टीने खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारताच्या परंपरेमधे दोनच गोष्टीना आपण महत्व दिले आहे, एक शौर्याला आणी दूसरे त्यागाला. शौर्य आणी त्याग या दोन गोष्टीच्या आधारावर आपला इतिहास उभा आहे आणी त्यामुळे जो समाज आपल्या शूर विरांना विसरतो, आपल्या सैनिकांना विसरतो, मातृभूमि करिता बलिदान देणाऱ्याना विसरतो त्याला वर्तमान तर असत पण भविष्य नसत आणी म्हणून भारताच्या भविष्याकरिता अश्या प्रकारची आठवण करण आणी आपल्या सैनिकांचा सन्मान करने आपल सर्वाचे कर्तव्य आहे आणी म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला.आमचा सामाजिक न्याय विभाग,त्याचे मंत्री,राज्यमंत्री, बार्टी या सगळ्यांचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन करतो. “
हे गूढ़ अजूनही कायम आहे की संभाजी महाराज यांच्या अमानुष हत्येनंतर मुगलांचे साम्राज का आले नाही व कालांतराने पेशवाई मधे कसे परिवर्तित झाले. ज्या प्रकारे संभाजी महाराजांची निर्घुन हत्त्या करण्यात आली जसे डोळे,नखे काढणे,जीभ छाटणे आदि अनेक शंका निर्माण करतात.पेशवाई मधे सर्वाधिक अत्याचार औरंगजेब
याच्या कठोर धमकीकडे पाठ फिरवून संभाजी महाराज यांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करणाऱ्या महार जातीवर झाला, गळ्यात मडके व कंबरेला झाड़ू आला. हा असंतोष थांबत नसल्यामुळे महार जातीचा तिव्र असंतोष ऊफाळूण आला ज्याचा प्रत्यय 1820 मधे “भीमा कोरेगांव” युद्धात पहायला मिळतो. भीमा कोरेगांव युद्धात पेशवाई विरुद्ध परत एकदा महार सैनिकांनी शौर्याचा परिचय दिला व पेशवाई संपुष्टात आणली. इंग्रजांच्या बाजूने युद्ध केल्यामुळे जातीच्या आधारावर अन्याय/अत्याचार याचा विचार न करता महार समाजावर राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेवला जातो. 1820 मधे एक राष्ट्र किंवा देश अस्तित्वात नव्हता. जवळपास 550 राजे-राजवाडे होते जे आपसातच प्रभुत्व गाजविण्यासाठी/ दाखविण्यासाठी युद्ध करीत होते. पेशवाईचे दूसरे घटक जसे इंदौरचे होळकर, ग्वालीअरचे शिंदे/सिंधिया,नागपूरचे भोसले,बड़ौदाचे गायकवाड व इतर ही राजे- रजवाडे आधीच इंग्रजांना शरण आले होते.मराठा,पेशव्यांनी सुद्धा मैसूर लढाईत इंग्रजांसोबत हात मिळवनी केली होती. इंग्रज,निजाम,मुगल,आदिलशहाच्या सैन्यात मराठा समेत अनेक जाती, समाज,धर्माचे सैनिक,दरबारी,वकील,पंडित होते जे महत्वपूर्ण प्रशासकीय पदावर होते.औरंगजेबचे सैन्य लाखात होते, एवढ़े तर मुगल/मुस्लीम नव्हतेच.
शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या काळातील मराठा साम्राज्यात किंवा त्या पूर्वी पण अस्पृश्यता (विशेष करून महार समाजा सोबत) इतकी तीव्र नव्हती असे समजायला हरकत नाही. कारण महार समाजाच्या लोकांकडे शेत जमिनी होत्या व वंशानुगत शेत जमिनी आजही संपूर्ण महाराष्ट्रात अधिकांश गावात आहेत.आमच्या अनेक पूर्वजाकडे शेकड़ो एकर शेत जमीनी होत्या याचे पुरावे सरकारी अभिलेखात आजही पहायला मिळतात. शेती करणारा,अन्नधान्य तयार करणारा, दुग्ध उत्पादन करणारा (व ज्याचा उपभोग सर्वच घेणारे) समाज अस्पृश्य कसा राहु शकतो. महार जातीचे लोक शुर, आणी शेती व्यवसायात सलग्न होते.महार समाजाने आपल्या वीरतेचा व पराक्रमाचा परिचय 14.10.1956 ला पुनः एकदा दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाला प्रमाण मानून 5 लाख लोकांनी विषमतावादी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला.आज सम्पूर्ण महार समाज हा बौद्ध धर्मी आहे.
आज पूर्वाश्रमीच्या महार व आताच्या बौद्ध समाजा समोर अनेक आव्हान आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर जी बौद्ध जनसंख्या दिसायला पाहिजे तशी दिसत नाही आहे. महाराष्ट्रात 1 कोटी समेत सम्पूर्ण देशात 2 कोटी जनसंख्या ही बौद्धांची आहे. जगाच्या पाठीवर असे बरेच देश आहेत ज्यांची कुल जनसंख्या ही 2 कोटी नाही आहे. भारतामधे बौद्धांची जनसंख्या 2 कोटी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसायला लागली तर विकसित बौद्ध राष्ट्राकडून मदत, संरक्षण, आर्थिक/शैक्षणिक/रोजगार सहायता मिळेल. बुद्धगया महाबोधी महाविहार सम्पूर्णपणे बौद्धांच्या नियंत्रणात येईल.बौद्धानी सामाजिक हितासाठी संगठित होऊन सामाजिक, राजकीय वाटचाल करने आवश्यक आहे. नेते संगठित होतील या भ्रमात न राहता सर्वांगीण विकासासाठी गाव/वस्ती म्हणजे ग्राउंड लेवल पासून संगठित व्हावे लागेल. बौद्धानी काळानुरूप परिवर्तन करने आवश्यक आहे. राजकारणात स्थाई मित्र किंवा शत्रु नसतात आणी शत्रु तर राहत नाही. शेवटी विकासोन्मुख कार्य सत्ता व प्रशासन यांच्या कडूनच करून घ्यायचे असतात यासाठी सर्वासोबत उचित सम्पर्क,समन्वय,व सौहार्द्रपूर्ण संबंध आवश्यक असतात.
लक्ष्मण बोरकर
मोबाईल : 77093 18607,नागपूर.
