५० वर्षात प्रथमच वसई शहारात दहा दिवसीय श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी वसई – जयभिम सामाजिक संघटना, सिद्धार्थ जागृती संघ,रमाई महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दहा दिवसीय श्रामणेर शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाले. दि. १ जून ते १० जून २०२६ या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र,सिद्धार्थ बुद्ध विहार आणि हर्षल भालेराव सभागृह सर्वे नंबर १७/०३, ब-हामपूर,वसई रोड (प.) तालुका वसई जिल्हा पालघर ४०१२०२ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.५० वर्षात शिबिराची मुळ संकल्पना हि आयु.गोविंदा सावळे-अध्यक्ष जयभीम सामाजिक संघटना यांची असून सिद्धार्थ जागृती संघ व रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून हे शिबिर पूर्णत्वास नेले.या श्रामणेर शिबिरात १८ शिबीर्थी होते.
   शिबिरास पूज्य भदंत नागवंश स्थविर नागपुर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सहाय्यक मार्गदर्शक प्रा.ललित कुमार कांबळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. सलग दहा दिवस यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.शिबिराच्या माध्यमातून बौद्ध धम्मातील श्रामणेर जीवन,शील,सदाचार,धम्म अभ्यास,दैनंदिन भिक्खूवर्गाबद्दल प्रशिक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन आयु.रमेश शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आयुष्यमानिनी उषाताई ठोंबरे यांनी कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.विविध धार्मिक विधी,धम्मचर्चा, ध्यानसाधना आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे शिबिरार्थ्यांना बौद्ध जीवनमूल्यांचा समृद्ध अनुभव घेता आला.
  दिनांक ११/६/२०२६ रोजी समारोप सोहळा पू भन्ते मिलिंद बोधी यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला.भन्ते मिलिंद बोधी यांचे स्वागत बौद्धाचार्या बन्सीराम ठोंबरे,प्रांजली काळबेंडे,सुधीर बैसाणे,धनराज जांभरूणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव इंगळे यांनी सादर केले.


भन्ते मिलिंद बोधी मेडिटेशन टिचर विलपॅावर इंस्टिट्यूट फाउंडेशन बँकांक थायलंड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थींचे चिवर उतरविण्याची विधी करून त्यांना श्रामणेर प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य प्रांजली प्रविण काळबेंडे यांनी केले.सिद्धार्थ जागृती संघ अध्यक्ष रमेश शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.समारोप सोहळ्यात मान्यवरांनी धम्मप्रसारासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित करत सहभागी श्रामणेरांचे अभिनंदन केले. उपस्थितांनी शिबिराचे आयोजन, शिस्तबद्ध नियोजन आणि धम्ममय वातावरणाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले. शिबिरामुळे सहभागी बांधवांमध्ये श्रद्धा, शील आणि प्रज्ञेची दृढ पायाभरणी झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.या श्रामणेर शिबीरा खास उपस्थिति ६ महिन्याची पारमिता आई राजकन्या सावळे सोबत दहा पारमिता पूर्ण केल्या सर्व श्रामणेर सम्राट वाटुरे,बुद्धभूषण सावळे,अशोक सावळे,प्रकाश निकम, आनंद पाडमुख, अशोक वाघ,अमोल घोंगडे, विधाधन सूर्यवंशी, महेंद्र निकम,दीपक मनवर,दयानंद गायकवाड,सुभाष वाघ,रविंद्र काळपांडे,सुरेश तेलगोटे,सिद्धार्थ जागृती संघ कार्यकारिणी आणि रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या सह सुरेखा सावळे मंनकर्णा बाई वाघ, अलका निकम, कावेरी घोंगडे, प्रज्वला मनवर, सुवर्णा सूर्यवंशी, शोभा बेलखेड़े, प्रियंका बनसोड, सविता घोंगडे,अस्मिता काशीदे, शिल्पा भालेराव,रीमा यादव,उज्वला निकम हया उपासिका न चुकता सायंकाळी ०६: ते ०८ पर्यंत पूज्य भदंत नागवंश महास्थविर नागपुर यांच्या दहा दिवसीय प्रवचनासाठी ०८ ते १० कि मि चा रोज प्रवास करत होत्या हे विशेष.

आयु.गोविंदा सावळे-8806877580,वसई यांस कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *