
बापाला समजून घेणे,समजणे फार कमी मुला,मुलींना जमत असेल.नाहीतर त्यानी मुला,मुलींसाठी घेतलेला त्रास,कष्ट, स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो मुला मुलींना जाणवू देत नाही. मुला,मुलीच शिक्षण, त्यांच्या तब्बेती ची काळजी घेणारा आणी मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही तो बाप मला काहीच झाल नाही म्हणून सांगणारा, होणार नाही, काळजी करू नकोस म्हणून तो मुला,मुलींना धीर देतो तो बाप असतो. स्वतः उपासी राहून मुला,मुलींना दोन घास देण्यात त्याला आनंद मिळतो.तो बाप असतो.बाप आपलं,दुःख,आसवं लपविण्यात माहीर असतो.तो बाप असतो.बाप कुणाचाही असो बापाला समजणें फार कठीण जात, तो मुला,मुलीवर रागावतो,वेळ प्रसंगी मारतो त्यात खर प्रेम असते.मुलांना योग्य दिशा देण्याचा त्याचा माणस असतो. पण मुला,मुलीला शुद्ध म्हणजे वडिलाच शुद्ध प्रेम दिसत नाही,आणी त्याच्या आईला ही दिसत नाही,त्यामुळे मूल,मुली वडिलाला,खूप,रागीट,क्रूर समजतात,पण तसे नसते.हे समजणें,आणी समजून घेणे काळाची गरज आहे. तो सतत मुला,मुलींना दुःख मुक्त करण्यासाठी धावपळ करतो तो बाप असतो. म्हणून “शुद्ध प्रेम,करणारा,मुला, मुलीकडून कसलीही अपेक्षा न बाळगणारा खरा बाप असतो.तो बाप किती मूल,मुली योग्य प्रकारे समजून घेतात. त्यावर कुटूंबातील लोकांचे हित अवलंबून असते.
मुलांना योग्य दिशेने नेण्याचा बापाचा सम्यक संकल्प असतो.त्यासाठी तो योग्य नियोजन करीत असतो.जी बाब त्याला कळत नाही ती बाब तो इतरांकडून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो.पण आपला मुलगा, मुलगी मात्र योग्य दिशेनी गेली पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. आपल्या मनातील भावना तो फार कमी लोकांसोबत बोलून दाखवितो ज्यावर त्याचा प्रचंड विश्वास असतो.बाप आर्थिक तेने कमजोर जरी असला तरी तो मुलांना आपण कमी पडतो आहे हे जाणवू देत नाही.तो बाप असतो.मी बऱ्याच श्रीमंत, गरीब बापाला जवळून पाहिले आहे.त्याच्या समस्या,त्याचे मुला,मुली प्रति प्रेम, हे अगदी सारखे असते.आर्थिक तेने कमजोर असलेला बाप मुलांना आपन दिलेल्या पैशाची उधळ पट्टी करू नको योग्य ठिकाणी खर्च कर असे वारंवार सांगत असतो कारण त्याचे पैसे हे मेहनतीचे,घामाचे पैसे असतात. ज्या बापाकडे भ्रष्टाचाराचे पैसे असतात त्याला काही वाटत नाही.त्याला श्रीमंती चा माज असतो हे मात्र नक्की. पण तो भ्रष्टाचार करणारा व्यक्ती हा तर देशद्रोही आहे. समाज द्रोही आहे. आणि मुला, मुलींना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा, कुटूंब द्रोही आहे. हे समजून घेणे काळाची गरज आहे.

आज देशात नीट चे पेपर फोडून विकणारा एक बापच होता आणि विकत घेणाराही बापच होता. पण ज्यांनी विकले तो भ्रष्टाचारी होता, देशद्रोही होता, समाज द्रोही होता. आणि ज्यांनी विकत घेतले तो स्वार्थी होता.आपला मुलगा खूप हुशार आहे,असा शेखी मिरविणारा स्वार्थी बाप होता.या काही लोकांच्या स्वार्थी प्रवृत्ती मुळे लाखो गरीब विद्यार्थी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले.त्या विद्यार्थी,विद्यार्थीनीची मानसिकता खराब झाली आणि त्याच्या बापाचे तर स्वप्न भंग झाले. कारण त्याची सारी मेहनत पाण्यात गेली काही लोकांच्या स्वार्थी,आणि भ्रष्टाचारी प्रवृत्ती मुळे देशातील वातावरण गढूळ झालेले आहे.भारत देशात लोकशाही आहे.संविधान आहे.आणि चुकीच्या माणसाला रोखण्यासाठी भारतीय न्याय संहिता आहे.पूर्वी भारतीय दंड संहिता होती.असे असतांना ही भ्रष्टाचार करणारे आपल्याला दिसतात,याला जबाबदार कोण? प्रशासन, शासन,न्यायालय, या जनता,नेमके कोण? हे सांगणे खूप कठीण आहे.जसे बाप समजून घेणे कठीण आहे. जरी मुलाचा सम्यक संकल्प असला तरी त्या त्या वेळी कोणती परिस्थिती निर्माण होईल हे आज तरी सांगता येत नाही.त्यामुळे मुला,मुली शिक्षण घेत असतांना,खरं आणि खोटं समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी हवी.त्यामुळे भारतीय समाजात चांगले,वाईट जे काही चालते त्यातून योग्य ते समजून घेऊन तुम्हाला मार्ग काढता येतो.तो घाम गाळून मुला, मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढे येतो तो खरा स्वाभिमानी बाप असतो.
तो नैतिकता असलेला,स्वाभिमान जपणारा,भ्रष्टाचाराला थारा न देणारा,दारू न पिणारा,कुटूंबातील लोकांची काळजी घेणारा, मरणाच्या दारात असतांना मला काहीच झालं नाही असं म्हणणारा खरा बाप असतो. त्या “बापाला समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी हवी” ती तुमच्या कडे शिक्षणामुळे आली की तुम्ही बापाची थकत्या काळात नक्कीच काळजी घेणार यात संशय नाही.आणि ती संम्यक दृष्टी नसेल तर मात्र बाप समजणे कठीण जाईल.कारण बाप आपल्या वेदना कुणालाही सांगत नसतो तो बाप असतो.केवळ तो काळजी घेतो.जसा माझ्या बापाचा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर,माझाही बाप,माझ्या पत्नीचाही बाप,मुला, मुलीचा ही बाप, बाबासाहेब होते. त्यानी आपल्या वेदना, दुःख, मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही सांगितले नाही.5 डिसेंबर 1956 ला शेवटच्या रात्री बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथा ची प्रस्थावना बाबासाहेब पूर्ण करतात, अंत्यन्त त्याना आनंद होतो, आणि त्याच रात्री त्याचे निधन होते.त्या बापा नी सारे काही दिले.तुमच्या सुरक्षे साठी संविधान दिले. आणि योग्य दिशेने जाण्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ दिला. आपण त्या बापाला किती समजून घेतो. त्यावर सुख आणि दुःख अवलंबून आहे. खरं तर “बापाला समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी हवी” नाहीतर बापाला समजने कठीण आहे.
अविनाश टिपले चंद्रपूर-9970917389.

