एका कामगार नेत्याने कार्यकर्त्यांना आदेश दिला मंत्रालयात प्रधान सचिव,कामगार मंत्री बरोबर मिटिंग आहे,ज्यांना शक्य आहे त्यांनी मंत्रालयात हजर राहावे.कामगार,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांची नेत्यांची क्षमा मागून पुढील निवेदन करत आहे.प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्य असलेले नेते कार्यकर्ते अत्यल्प आहेत.स्वताला मोठे करण्यासाठी छोट्या लोकांचा भावनिक करून बळी देणे चुकीचे असले तरी गनिमी काव्याने कुशल नेतृत्व दाखविण्याची ती एक संधी समजतात. बेधडक दे धडक कधी यशस्वी होते तर कधी खूप महागात पडते.मंत्रालयात आय ए एस अधिकाऱ्याला भेटायचे असेल तर एक पूर्व परवानगी घ्यावी लागते,किंवा त्यांची भेटण्याची वेळ व वार ठरलेला असतो.तेव्हा भेट घ्याची असते.भेटीसाठी लेखी पत्र दिले किंवा ईमेल दिला म्हणजेच परवानगी मिळाली असे होत नाही. त्याची दखल घेऊन उत्तर मिळाले तर ती अधिकृत भेट होऊ शकते. पण तसे न करता पन्नास साठ लोकांना वेग वेगळे बोलाऊन एकत्र जाणे म्हणजेच कायदा सुव्यवस्था न जुमानता केलेला गुन्हा ठरतो.मंत्रालयात आय ए एस अधिकाऱ्यांचे शांत पणे ऐकून न घेता उलट सुलट बोलणे म्हणजेच वादविवाद करणे यामुळे गैरसमज निर्माण होऊन आपल्या हातून गुन्हा घडते.त्यांचे परिणाम सोबत आलेल्या सर्व लोकांना भोगावे लागतात.नेत्यांच्या आदेशांचे पालन करतांना शांत डोक्याने विचार करा.दोन वेळा गंभीर गुन्ह्यातुन निरपराध पन्नास साठ लोक सही सलामत सुटले.देशात सर्वात मोठा उद्योग धंदा असलेले बांधकाम क्षेत्र आहे.93 टक्के कामगार यांच असंघटित कष्टकरी कामगार क्षेत्रात गणले जातात.सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 28 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. इतकेच नव्हे तर 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत.म्हणजेच एकूण 54 लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे.यासाठी मोर्चा जन आंदोलन करतांना पोलिसानी पकडले तर ते गुन्हे न्याय मागतांना झाले ते आम्ही आनंदाने स्वीकारू शकतो,पण जाणून बुजून कायदा सुव्यवस्था मोडून गुन्हेगार होणे चुकीचे ठरते.
आपण सुज्ञ असाल तर कामगार,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांशी मैत्री करू नका.त्यांचेशी खुप सलगी करू नका.खुप जवळीक करू नका.केवळ कामापुरते संबंध ठेवा.कामगार,सामाजिक आणि राजकीय नेते हे कुणाचे ही मित्र नसतात.(सर्वच नाही काही अपवाद असू शकतात. त्यांच्या कामाला सलुट ) ते केवळ स्वार्थ साधुन घेण्यासाठी तुमचा वापर करतात.तुमचे धन,तुमचा अमूल्य वेळ,तुमचे शारिरिक श्रम त्यांचेसाठी उपयोगात आणू नका.कामगार,सामाजिक आणि राजकीय लोक प्रसंगी तुमच्या जिवाला धोका निर्माण करतात.तुमचा जीव ही घेतात.त्यांना त्याचे काहीच वाटत नाही.ते तुम्हाला त्यांच्यासाठी गुंडागर्दी करायला सांगतात.दगडफेक करायला सांगतात.जाळपोळ करायला सांगतात.मारामारी करायला सांगतात.प्रसंगी इतरांना जीवनातून उठवतात.तुम्ही तुमचे जीवन बर्बाद करू नका.तुम्ही पोलिस केस मध्ये आयुष्य भर कोर्ट केसेस मध्ये अटकुन राहता.तुमचे कुटुंबिय त्रस्त होतात.तुमचे चारित्र्य मलिन होते.ते केवळ नेत्यांच्या आदेशांचे पालन करतांना शांत डोक्याने विचार न केल्यामुळे, मराठी हिंदी चित्रपटात दाखविले जाते त्या प्रमाणे बघा राज्यात आणि देशात असंख्य घटना घडत आहे.निरपराध माणसे राजकीय लोकांसाठी जीवन अर्पण करतात आणि शेवटी गुन्ह्यात अड़कुन मरतात.अनेक लोक राजकीय लोकांच्या सोबत राहून गुंडागर्दी करतात,खंडनी वसूल करतात,लोकांना धमक्या देतात आणि प्रसंगी जीव घेतात.स्वता चांगले शिक्षण घ्या,शिक्षण घेताना आर्थिक त्रास ही होईल, मानसिक त्रास ही होईल पण शिक्षण घ्या.स्वताचे व्यवसाय सुरु करा.व्यवसाय छोटा का असेना पण स्वताचे असावे.शेती असल्यास आधुनिक शेती करा.सरकार मध्ये बसलेल्या स्वार्थी, जातीयवादी,धर्मांध लोकांनी बहुजनांच्या सरकारी नोकऱ्यां समाप्त केल्या आहेत. व्यवसाय करण्यासाठी बँकांचे कर्ज प्रक्रिया कठीण करून ठेवली आहे.तुम्ही हाल हाल झाले पाहिजे,तुम्ही त्रस्त झाले पाहिजे,दुःखी झाले पाहिजे,तुम्ही गरीब च राहिले पाहिजे, तुमची मुले मुलीं शिक्षणापासुन वंचित राहिले पाहिजे,त्यांनी व्यावसायिक शिक्षण महाग करून ठेवले आहे म्हणजे तुम्ही शिक्षण घेवू नये अशी त्यांची नकारात्मक मानसिकता आहे.तुम्ही त्रस्त होवून त्यांचेकडे जावे,त्यांच्या समोर हात जोडावे अशी त्यांची नकारात्मक मानसिकता आहे.तुम्ही गरजू असल्याने त्यांचे कार्यकर्ते बनून त्यांचे कड़े गुलामी करावी ही त्यांची नकारात्मक मानसिकता आहे.राज्यात एकूण 54 लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे.त्याविरोधात एकही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते बोलत नाही. कारण काय असेल?
लोकांचा गैरसमज असतो की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आपल्या साठी कधी धाऊन येईल.आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आपणच निवडून दिलेले पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांनी बनवलेले सरकार आपलेच संरक्षण करेल हा मोठा गैरसमज असतो.सामान्य लोकांचे जीवन अत्यंत स्वस्त झाले आहे.सामान्य लोकांचे खून सहज दडपले जातात.खूनी लोकांना संरक्षण मिळते.त्यांना अटक देखील होत नाही.खूनी लोकांना अटक करावी म्हणून लाखो लोक रस्त्यावर येतात.याचा अर्थ असा आहे की सरकार मधील लोक हे संवेदनशील नाहीत,प्रामाणिक नाहीत.सर्वत्र अराजक असल्या सारखे वाटते.कारण त्याला आपणच जबाबदार असतो.ते केवळ नेत्यांच्या आदेशांचे पालन करतांना शांत डोक्याने विचार न केल्यामुळे.
सार्वजनिक रोडवर वेगाने वाहन चालवून लोकांना चिरडणे,अपहरण करून बलात्कार करणे,जीव घेणे,तोंडावर लघुशंका करणे,खून करणे,बंदूक चालवून खून करणे,धमक्या देणे,सार्वजनिक शांतता भंग करणे,रात्री बेरात्री फटाके फोडणे,धार्मिक उत्सव साजरे करताना मनमानी करणे,दंगे करणे ह्या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत.बहुसंख्य लोक एकत्र राहून ही अश्या तरुण मुलांना विरोध करण्याचे धाडस करीत नाही. एखाद्याने केला ही तर त्याला ही मंडळी जगणे असाह्य कठीण करून ठेवतात.त्यामुळेच देशातील मुलीं,महिला ह्या तर असुरक्षित आहेत.त्या रात्री तुन कुठेही प्रवास करू शकत नाहीत असे वातावरण सध्या राज्यात व देशात आहे.याला जबाबदार केवळ पोलिस यंत्रणा नाही तर नेत्यांच्या आदेशांचे पालन करतांना शांत डोक्याने विचार न केल्यामुळे आपण ही ठरतो.
2014 नंतर देशात दोन गट निर्माण झाले समर्थन करणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही.म्हणूनच सध्याच्या काळात धार्मिक द्वेष प्रचंड प्रमाणात वाढले आहे.हिन्दू मुस्लिम,हिन्दू ख्रिश्चन,हिन्दू दलित,हिन्दू सिख असा भेदाभेद निर्माण करण्यात आले आहे.घरा घरात,चौका चौकात, बस डेपो,रेल्वे स्टेशन,ते कार्यालयत सुद्धा उघड उघड राजकीय समर्थन व विरोध करणारे ठळकपणे दिसत आहेत. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी ह्या सर्व खेळी आहेत.सामान्य माणसे ह्याला सहज बळी पडतांना दिसतात.एकमेकांचे द्वेष करायला लागतात.राजकीय लोकांना असे वातावरण पोषक असते.लोकांचे जीव घेवून सत्तेत बसायचे असे कारस्थान ते करतात.
समाजातील सुज्ञ,ज्ञानी आणि समंजस लोकांनी पुढाकार घेवून समाजात प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे.बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक,संपादक,पत्रकार लोकांनी समाजात सामंजस्य आणि एकात्मता राहावी म्हणून लेखन,भाषण आणि मार्गदर्शन करण्याची नितांत गरज आहे.तेच भयभीत होऊन समर्थन करीत असतील तर राजकीय आणि धार्मिक लोकांच्या द्वारे समाजात हुकुमशाही एकाधिकारशाही, अराजक,असहिष्णुता,द्वेष आणि कटुतेचे वातावरण निर्माण केले जाते. तेव्हा प्रामाणिक आणि सुज्ञ बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक,संपादक,पत्रकार लोकांची भूमिका महत्वाची ठरते.
देशात सर्वात मोठा उद्योग धंदा असलेले बांधकाम क्षेत्र आहे.93 टक्के कामगार यांच असंघटित कष्टकरी कामगार क्षेत्रात गणले जातात.सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 28 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. इतकेच नव्हे तर 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत.म्हणजेच एकूण 54 लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे.आचारसंहिता सुरू आहे म्हणून काम करता येणार नाही असे सांगून सर्व कामकाज बंद पाडले.याची काही आवश्यकता नव्हती म्हणून मुंबई उच्च न्यायालया मध्ये या निर्णयाविरुद्ध कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केस दाखल केली होती.याबाबत सहा नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश केलेला आहे की एका दिवसात पूर्वी असलेले सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीचे सुरू करण्यात यावे.परंतु जाणीवपूर्वक बड्या कंत्राटदारांचे भरे करण्यासाठी लाखो कामगारांना सगळ्या लाभांपासून वंचित ठेवल्या जात आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही.या विरोधात न्याय कुठे मागावा हा प्रश्न बांधकाम कामगारांसामोर उभा राहील आहे. सनदशीर पत्रव्यवहार केला त्याला उत्तर मिळत नाही. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतांना त्याचा उपयोग होतांना दिसत नाही. भेटायला वेळ दिला जात नाही अशा वेळी गनिमी कावा वापरला तर निरपराध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.मोर्चा जन आंदोलन करतांना पोलिसानी पकडले तर ते गुन्हे न्याय मागतांना झाले ते आम्ही आनंदाने स्वीकारू शकतो,पण जाणून बुजून कायदा सुव्यवस्था मोडून गुन्हेगार होणे चुकीचे ठरते.म्हणून मी मंत्रालयात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी हा लेख लिहला आहे. बांधकाम कामगार संघटना पदाधिकारी यांनी नेत्याचे ऐकून गनिमी काव्याने मंत्रालयात झुंडीने जाणे चुकीचे आहे. शांततेने चर्चा झाली तर समस्या सुटू शकते आणि वाद विवाद केल्यास चर्चा थांबून वातावरण बिगडून पोलिसांच्या ताब्यात जाते. पोलिस चार ते पांच गुन्हे दाखल करून गुन्हेगार म्हणून नोंद करून घेतात. त्यांनंतर कोर्ट कचरीचे चकरा मारणे ठरलेले आहे. कोणत्याही नेत्यांच्या आदेशांचे पालन करतांना शांत डोक्याने विचार करा.
सागर रामभाऊ तायडे-9920403859,भांडुप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना