राष्ट्रीय महामार्गाचे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दलित मुसलमानांची 12 घरे तोडली. 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी नागपूर – कामठी स्थित नया नगर राष्ट्रीय महामार्गावर असलेली दलितांची वस्ती आहे. राष्ट्रीय महामार्गापासून तोडण्यात आलेली घर 1000 फूट दुरीवर होते. जेव्हा नगरपरिषदेने पीडित लोकांना नोटीस दिली. त्यावेळेस नागरिकांनी न्यायालयामध्ये केस दाखल केली. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानंतरही नगरपरिषदेने ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गाचे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दलित मुसलमानांची 12 घरे तोडली.गंमत अशी नया नगर येथील मैदानावर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या विरोधात शासन प्रशासनाने कसल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे ज्या लोकांना राहायला घर नव्हते अशा लोकांनी या मैदानावर 13 वर्ष पूर्वी घरे बांधली होती. येथील घरांना टॅक्स लावून देणे, वीज पुरवठा करणे, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे यासाठी नगरपरिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला.ज्या लोकांची घर तोडली अशा पीडित लोकांनी 24 तारखेपासून कामठी स्थित जयस्तंभ चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण 5 दिवस केले.या क्षेत्राचे खासदार,जिल्ह्याचे पालकमंत्री व कामठी विधानसभा क्षेत्र चे आमदार,शासन प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे लोक अधिकार परिषदेचे अध्यक्ष व बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे प्रभारी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी 1 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्णपणे सक्रिय झाली आहे.आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. आत्तापर्यंत भेटी देणाऱ्या मध्ये पूर्व आमदार व इंटक नेते एस.क्यु.जमा,बहुजन समाज पार्टीचे राज्यात महासचिव नागोराव जयकर,पृथ्वीराज शेंडे,मंगेश ठाकरे,जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार,जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर,जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम ,जिल्हा कार्यकारणी सदस्य माया उके,विधानसभा अध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी,वरिष्ठ बसपा नेता चंद्रशेखर पाटील,कामठी शहर उपाध्यक्ष सुनीता रंगारी,रामटेक विधानसभा अध्यक्ष राजेश फुलझेले,अमित गजभिये,अशोक मेश्राम,दीक्षाभूमी दक्षता समितीच्या सचिव पौर्णिमा शेंडे,उषा उपरे,ममता लांजेवार,सारिका उपरे,मंजुषा पारशी,दिपाली काटोले,सिंधु तागडे,समता काळे,सुकेशनी वैरागडे,नीलिमा शिकारी,आणि बसपा पदाधिकारी व उत्तर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपाला भेटी दिले आहेत.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *