सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या बहुजन समाजाच्या नेत्यांनो आपलाच समाज जर आपल्यातच फूट पाडून घेत असेल तर तो कधीच सत्तेवर पोहचू शकत नाही.

बातमी शेअर करा.

एकी शिवाय सत्ताधिकार अशक्य आंबेडकरी समाजातील गटबाजीचा भेद मिटवा,

आजच्या काळात आंबेडकरी समाजासाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकीचा अभाव. बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांनी संघटित होण्याचा मंत्र दिला, पण दुर्दैवाने आज तोच समाज शेकडो गटांमध्ये विखुरला आहे. या गटांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मुख्य नेते, संघटक एवढेच नव्हे तर प्रत्येकाचा स्वतंत्र झेंडा,कार्यालये आणि आपापसातील आरोप-प्रत्यारोपांची साखळी पाहून कोणालाही हसू येईल,पण ही वस्तुस्थिती दु:खद आणि धोकादायक आहे,भारिप बहुजन महासंघ,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट आठवले,कांबळे,खरात,गायकवाड,प्रेसिडियम हेच काय कमी होते म्हणून भीम आर्मी,बामसेफ,ब्लॅक पॅंथर,भीम टायगर सेना,युवा सेना असेही अनेक विंग तयार झाले आहेत.हे सर्व गट-उपगट एकमेकांवर टीका करण्यात इतके रममाण झाले आहेत की मूळ लढाई शोषितांची, वंचितांची मागेच पडली आहे, हे सत्य समजून घेतले पाहिजे पण कोणी समजून घ्यायला तयारच होत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलाच समाज जर आपल्यातच फूट पाडून घेईल तर तो कधीच सत्तेवर पोहचू शकत नाही. कारण मतदानात मते फुटतात,नेतृत्व फुटते, दिशा हरवते. त्यामुळेच आजही आपल्या समाजाचा ‘किंगमेकर’ म्हणून वापर होतो पण आपण कधीच ‘किंग’ होत नाही! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ता समाज व्हा असे सांगितले,पण आज त्यांचे अनुयायी आपापसातच ‘विरोधक’ झाले आहेत.शिक्षण, संघटना आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर लक्ष देण्याऐवजी फक्त ‘स्वप्न’ पाहण्यात आपण रमलो आहोत,आता तरी हे सर्व छोटे मोठे पक्ष,संघटना आणि नेते एकत्र यायला हवे, एकच झेंडा,एकच आवाज आणि एकच संघर्ष हाच बाबासाहेबांचा खरा वारसा आहे. अन्यथा आपण सत्तेच्या स्वप्नातच आयुष्यभर फिरत राहणार! एकी हीच खरी सत्ता आहे, हे लक्षात घेऊन सर्व गटांनी एकत्र यावे, वैयक्तिक स्वार्थ,पदलालसा बाजूला ठेवावी आणि समाजहितासाठी एक दिशा घ्यावी.महत्त्वाची गोष्ट अशी आहे असे लिहून बोलून बऱ्याचदा झाले परंतु या गटातटावाल्यांच्या लक्षात ही गोष्ट का येत नाही आमच्या गटाचा त्यामुळे आमच्या मुलांचे भविष्य बरबाद होत आहे याला जिम्मेदार कोण?.

जय भीम! नमो बुद्धाय! जय संविधान! जय भारत!..

प्रशिक सम्राट 816941365,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक धम्म प्रसारक जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *