सम्राटनगर देवमूर्ती येथे नववीचा वर्ग सुरू करण्याची मागणी..शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांचे तोंडी आश्वासन.

बातमी शेअर करा.

जालना:- सम्राट नगरदेव मूर्ती जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांना सम्राट नगर देवमूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेत नववीचे वर्ग सुरू करण्या बाबत दिनांक २४ जून २०२५ रोजीशिष्टमंडळा कडून औपचारिक निवेदन देण्यात आले, या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक राम जाधव, अध्यक्ष प्रभाकर खरात, माजी अध्यक्ष सतीश राम जाधव, उपाध्यक्ष अरुण म्हस्के, सदस्य गणेश चौरे, शांतीलाल म्हस्के, अमोल म्हस्के तसेच जिल्हा संघटक प्रशिक सम्राट उपस्थित होते. गावकऱ्यांची मागणी आहे की, आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जालना शहरात प्रवेश घ्यावा लागतो, ज्यामुळे विशेषतः मुलींना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर देवमूर्ती येथेच नववीचा वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांना स्थानिक शिक्षणाची सुविधा मिळावी अशी पालकांची आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे, निवेदन स्विकारताना शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॅडम यांनी या विषयाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खात्री दिली. तसेच लवकरात लवकर नववीचा वर्ग सुरू करण्यात येईल असे तोंडी आश्वासनही दिले, यावेळी शिष्टमंडळाचे पदाधिकारी शिक्षण प्रेमी वरिष्ठ समाजसेवक राम जाधव, शालये व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर खरात, उपाध्यक्ष अरुण म्हस्के, माजी अध्यक्ष सतीश राम म्हस्के, सदस्य गणेश चौरे, सदस्य शांतीलाल म्हस्के, अमोल म्हस्के, बदलता महाराष्ट्र पत्रकार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट शिक्षण प्रेमी वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय राम जाधव  शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॅडम यांचे स्थानांतरण पालघर येथून जिल्हा परिषद जालना शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, गावकरी पालकवर्ग व शाळेचे शिक्षक वर्ग एकत्र येऊन विद्यार्थ्यांना नववीसाठी योग्य सुविधा आणि वर्गखोल्यांची व्यवस्था करण्यास सज्ज असल्याचे ठळकपणे सांगण्यात आले, ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे लवकरच देवमूर्तीतील विद्यार्थ्यांना गावातच नववीचे शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध होईल,असा विश्वास शिष्टमंडळाचे पदाधिकारी व गावकरी पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशिक सम्राट 816941365,जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *