
विशेष प्रतिनिधी पुणे – स्वतंत्र मजदूर युनियन,पुणे जिल्हा शाखेच्या वतीने जनसागर हॉल,सोमवार पेठ पुणे 11,येथे आयोजीत केल्यानुसार दि. 23.08.2025 रोजी महत्वपुर्ण संघटनात्मक बैठक पार पडली.सदर बैठकीचे अध्यक्षस्थान मा.जे.एस.पाटीलसाहेब,राष्टीय अध्यक्ष,स्वतंत्र मजदूर युनियन यांनी भुषविले.सदर बैठकीस स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघटना,स्वतंत्र रेल ठेका मजदूर युनियन,स्वतंत्र सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी बहुउद्देशीय संघटन,ऑल इंडिया युनियन बँक बहुजन एम्प्लॉइज युनियन,स्वतंत्र रक्षा कामगार युनियन,एच.ई.फॅक्टरी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटना या संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी व किर्याशील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करुन मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वतंत्र रेल ठेका मजदूर युनियनचे मा.संदिप गायकवाड, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा.अरुण कांबळे, स्वतंत्र रक्षा कामगार युनियन,एच.ई.फॅक्टरी,पुणे चे अध्यक्ष मा.अे.पी.शिंदे,ऑल इंडिया युनियन बँक बहुजन एम्प्लॉइज युनियनचे मा.रुपेश नागमोडे,मागासवर्गीय विदयुत कर्मचारी संघटन महापारेषण/महाववितरण चे मा.मनोज सुर्यवंशी व महिला प्रतिनिधी मा.वैशाली शिरसाठ, स्वतंत्र सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी बहुउददेशीय संघटनचे सचिव मा.प्रकाश जमधडे तसेच स्वंतत्र मजदूर युनियन,पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष मा.संतोष कडाळे यांनी आपआपल्या शाखेच्या कार्याचा आढावा घेउन पुढील वाटचालीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीचे अध्यक्ष मा.जे.एस.पाटीलसाहेब यांनी आपले मार्गदर्शपर मनोगत व्यक्त करताना पुणे येथे सर्वाधिक सदस्यसंख्या असलेली कार्यालये कार्यरत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर इतर संघटनांचा इतिहास सांगून त्यांची नेमकी आदर्शाची कल्पना काय आहे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. आपल्या आदर्शाची कल्पना म्हणजे सत्यशोधकाची असून रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बहुजनांच्या कामगार चळवळीचा दडपला गेलेला इतिहास मागासवर्गीय विदयुत कर्मचारी संघटनेने प्रकाशात आणला असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. पुढे त्यांनी असेही नमूद करताना उल्लेख केला की, स्वतंत्र मजदूर युनियन ला मान्यता मिळणेसाठी प्रयत्न केले जात असून त्यास बऱ्यापैकी यश आलेले आहे. त्यासाठी सर्वांनीच झ्टून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.असे झाल्यास लवकरच स्वतंत्र मजदूर युनियनला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळेल याबाबत सुतोवाच केले.
आजच्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारीणीची घोषणा करुन सदर कार्यकारीणीने काम कशा प्रकारे करावयाचे याबाबत मार्गदर्शन करताना पुणे महानगर पालिका,महानगर पालिका कंत्राटी कामगार, टपाल खाते, शिक्षक संघटना याकडे लक्ष देण्याचे निर्देशही दिले.सूत्रसंचालन रमेश कांबळे साहेबांनी केले.आणि शेवटी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन महापारेषण/महाववितरण चे मा.गणेश मुरकुटे यांनी आभार प्रदर्शन केले.
नवीन पुणे जिल्हा कार्यकारीणी 1)अध्यक्ष -मा.अरुण कांबळे,रेल्वे 2) उपाध्यक्ष -मा.अमोल लढे,प्राध्यापक 3) सचिव-मा.गोकुळ टिळेकर,महापारेषण 4 )सहसचिव- मा. रुपेश नागमोडे,युनियन बँक 5 ) संघटक- मा.गणेश मुरकुटे,महापारेषण 6) कोषाध्यक्ष-मा.अे.पी.शिंदे,स्वतंत्र रक्षा कामगार युनियन 7) सदस्य-मा. प्रकाश जमधडे,स्वतंत्र सेवानिवृत्त वि.कर्मचारी बहुउददेशीय संघटन 8) मा.मनोज सुर्यवंशी,महावितरण9) मा लखन साळवे 10) मा संदिप गायकवाड,रेल ठेका मजदूर युनियन 11) मा.आकाश सरवदे,स्वंतंत्र विदयुत कंत्राटी कामगार संघटना १२) रमेश कांबळे यांची मुख्य सल्लागार पदी निवड करण्यात आली.
संघटक-मा.गणेश मुरकुटे ८८८८८९७१९७,पुणे यांस कडून

