
1 सप्टेंबर सकाळी ९ वाजता हायवे रोड ऐरोली ब्रीज सिग्नल जवळ भांडूप, नाहूर, कांजूर मार्ग विभागातील धम्म उपासक उपासिका धम्म ध्वज जन संवाद यात्रेचे स्वागत करणार आहेत.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ऍक्ट 1949 रद्द करण्यासाठी भंते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबई कडे येत आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविल्या जात आहे, ऐतिहासिक असा सभेचे आयोजन जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झालेला आहे.दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या धम्म ध्वज जन संवाद यात्रा मुंबई कडे येत आहे.या यात्रेमध्ये जवळपास पूज्यनीय भिक्षु संघ,उपासक,उपासिका संघ सामील झाले आहेत.बिहार राज्य सरकारने षडयंत्र करून भंते विनाचार्य यांना जवळपास 68 दिवस कारागृहात ठेवले होते.कारागृहातून बाहेर येताच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा अधिक तीव्र गतीने करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांशी संवाद करण्यासाठी दिनांक 28 ऑगस्ट नाशिक, 29 ऑगस्ट कल्याण,30 ऑगस्ट डोंबिवली,31 ऑगस्ट ठाणे,
1 सप्टेंबर सकाळी ९ वाजता हायवे रोड ऐरोली ब्रीज सिग्नल जवळ भांडूप, नाहूर, कांजूर मार्ग विभागातील धम्म उपासक उपासिका धम्म ध्वज जन संवाद यात्रेचे स्वागत करणार आहोत.
पुढे ती चेंबूर घाटकोपर आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूला अभिवादन करण्यासाठी अभिवादन समारोह चैत्यभूमी दादर या ठिकाणी होणार आहे.
आपल्याला सर्व जागरूक धम्म बांधवांना नम्र निवेदन आहे की आपण सर्वानी या धम्म ध्वज जन संवाद यात्रे च्या समारोहात ला चैत्यभूमी दादर मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वज जन संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करा. आपसातील सर्व मतभेद विसरून एकत्र येऊ यावे असे भांडूप धम्म उपासिका महिला मंडळाच्या वतीने,धम्म उपासीका सुनिता उदेभान तायडे,चंद्रकला सागर तायडे,तुळजाबाई गोविंद इंगळे,कोकिळा महादेव बांगर,ज्योती दिलीप थाटे,सुनिता गौतम तायडे यांनी केले आहे.अधिक माहिती करिता संपर्क करावा.

परभणी ते चैत्यभूमी अस्थि कलश यात्रेचेभांडुप विभागातील धम्म उपासिका महिला संघाने गेल्यावर्षी असे भव्य स्वागत केले होते.
