भिम जयंती महोत्सव हा महामानवांच्या विचारांचा जागर….

बातमी शेअर करा.

ठाणे – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बेतवडे,दिवा शहर,ठाणे यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी भिम जयंती निमित्ताने समाजसेविका मा.आयुनी.सुवर्णाताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेले भिम विचारांचे विद्रोही कविसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
               अंधाऱ्या वस्तीत आमच्या भिम विचारांचा प्रकाश व्हावा…!
      अज्ञानी माणसांना जागृत करण्यासाठी भिम विचारांचा जागर व्हावा..!

 दिवा शहरातील तमाम आंबेडकरी बौद्ध समाज तसेच समितीचे कार्यकर्ते,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमंत्रित कविवर्यांचे समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुक,संगीत,नृत्याबरोबर महामनवांचे विचार ही समाजात रूजणे आवश्यक आहे.भिम जयंती वैचारिक परिवर्तनाची नांदी असल्याने या कविसंमेलनाच्या माध्यमातून वैचारिक जयंती साजरी झाली.कोल्हापूरहून आलेले सुप्रसिद्ध विद्रोही कवी पि.के.यांनी आपल्या “आमच्या रक्तात रुजवलेत दाभोळकर,पानसरे ” या कवितेतून माणसं मारणारी व्यवस्था मांडली गेली तसेच कळवा ठाण्याचे विद्रोही कवी र.वि. माळापुडेकर यांनी त्यांच्या “भिम माझा” या कवितेतून बाबासाहेब पुतळ्यात नसून पुस्तकात मिळतील अशी मांडणी केली. पुण्याच्या कवयित्री आशाताई शिंदे यांनी आपल्या “भोंदू बाबा खरात” या कवितेतून स्त्रियांची जागृती केली. तसेच दिघा नवी मुंबईचे विद्रोही कवी राजीव गायकवाड यांनी आपल्या “रमाई” या कवितेतून रमाई सारखा संसार आजच्या स्त्रियांनी करायला हवा अशी मांडणी केली. सर्वच मान्यवर कवींच्या कवितेने लोकांची मने जिंकली गेली.अशा प्रकारे वैचारिक कवी संमेलन जयंती निमित्त भरवून जयंती महोत्सव साजरा करण्यात आला
     या कार्यक्रमासाठी योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक मा.शैलेश पाटील (साहेब),मा.राहूल जोगदंड (सर),मा.रवि.कदम (साहेब) मा.विश्वास भालेराव, मा.जयसिंग कांबळे,यांचे मोलाचे योगदान लाभले…
  र.वि.माळापुडेकर-८६९१८८३२१४.कळवा,ठाणे यांस कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *