
जगातील पहिल प्रशिक्षित संघटन निर्माण करणारे मानवाला दुःख मुक्तीचा,मानव हिताचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे,चरथ भिक्खये चारिकम,बहुजन हिताय – बहुजन सुखाय असा आपल्या अनुयायांना क्रांतीकारी उपदेश करणारे,कुशल संघटक तथागत गौतम बुद्ध यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आचरण करणारे आज कुठे ही सापडत नाही. कारण बुद्ध आशिर्वाद देत नाही, बुद्ध शाप ही देत नाही.इतर देव,देवी सारखी भीती घालण्याची त्यांना गरज वाटली नाही.किंवा त्यांच्या मध्ये मध्यस्थी करणाऱ्या पूजाऱ्या सारख्या भटा ब्राम्हणा निर्मिती करण्याची गरज वाटली नाही. उलट बहुजन हितायसाठी सुखायसाठी घरोघरी फिरणारे भिख्खू संघ त्यांनी निर्माण केले.
शील संपन्न भिख्खू संघाने घरो घरी जाऊन,किंवा विहारात बसून सांगितले की बुद्ध कोंबडे,बकरे खात नाही,बुद्ध नवसाला ही पावत नाही.बुद्ध अगरबत्ती मेणबत्ती ही मागत नाही.बुद्ध आस्तिक नाही,नास्तीक ही नाही,बुद्ध वास्तविक आहेत.बुद्ध म्हणजे आचार,विचार,रित आहे,बुद्ध म्हणजे वास्तव आहे.बुद्ध मार्ग दाता आहे,जगण्याची आदर्श शैली म्हणजे बुद्ध.बुद्ध कोणाला पावत नाही.कोणावर कोपतही नाही,बुद्ध कोणाला आशीर्वाद देत नाही.कोणाला शाप देत नाही.बुद्ध कोणाच्या अंगातही येत नाही.अंगात येणारे भूत,प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो.ते स्वतःला देव म्हणवून घेत नाही.बुद्धांना पूजा नकोय.ते कुणालाही भीती दाखवत नाही,ते जगण्याचा मार्ग दाखवतात.कारण बुध्द मुक्तीदाता नसून,मार्गदाता आहेत.
इतर देव,देवी सारखा कुणाचाही द्वेष न करणे म्हणजे बुद्ध, खरे बोलणे म्हणजे बुद्ध द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊन शांतता प्रस्थापित करायला बुद्ध सांगतो.बुद्ध माणसाच्या मनाला महत्त्व देतो.मन चांगले करावे असे सांगतो.मनात वाईट विचार येऊ नयेत सांगतो.बुद्ध कर्माला महत्त्व देतो.चांगले कर्म करा वाईट करू नका,असे सांगतो.बुद्ध बुद्धीला महत्त्व देतोच,पण बुद्धीपेक्षा शील,नैतिकतेला जास्त महत्त्व देतो.अत्त दिप भव:…यांचा अर्थ.कुणाचेही अनूकरण न करता स्वयंप्रकाशीत व्हा व माझे सुध्दा अनूकरण करु नका.चिकित्सक व्हा.सम्यक बुद्धिने विचार करा असे बुद्ध सांगतात.
जगात सर्वात मोठी ठेव कोणती असेल?. ती ठेव कुणासाठी?.या जगात आपले स्वत:चे काहीही नाही.जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे.पुत्र ही सुनेची ठेव आहे.कन्या ही जावयाची ठेव आहे.जीवन हे मृत्युची ठेव आहे. आणि शरिर हे स्मशानाची ठेव आहे.एक दिवस प्रत्येकाला दिसेल तुमचा मुलगा सुनेचा होईल.मुलीला जावई घेऊन जाईल. जीवनाला मृत्यु घेऊन जाईल.आणी शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल.जिवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो.कारण काळ जो शिकवतो तो कोणीच शिकवत नाही. तेंव्हा ठेव ही ठेव आहे म्हणुन ती सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवु नका. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ती अंत:करणाची संपत्ती आहे.ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी असतो..!
थोडं थोडंसं का होईना,स्वतः आराम करा,जगा स्वतःसाठी.कोणीही म्हणणार नाही. थकलात,आता आराम करा. आयुष्यात खरे दोनच मित्र असतात.एक आरसा,जो नेहमी खर बोलतो,आणि सावली,साथ कधी सोडत नाही.बाकी सगळेही असतातच की समजून घ्यायच्या सवयीची “लस”आत्ताच टोचून घ्या. “गैरसमज” आणि “अहंकार” रोगाची लागण कधीही लागू शकते.नाही सुधारू शकत आपण आपल्या प्रियजणांना.अंधश्रद्धेतुन त्यांना सावरताना.आपल्या भावनांना मुठमाती देऊन.जगायला शिकले पाहिजे.आनंदाची डोही अनंत तरंग.आनंदात जगायचे असेल तर, “वाद” आणि “स्वाद” यांचा त्याग करा.वाद सोडला तर “नात्याला” फायदा.स्वाद सोडला तर “तब्येतीला” फायदा.आपल्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तू.पेक्षा दिलेला वेळ जास्त किमती आहे.वस्तू काय तुटू,फुटू,हारवू शकते.पण दिलेला वेळ आठवणीत कायम राहील..!
चालून थकल्यावर समजले कि प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा आहे.सोबतीवरच प्रवास अवलंबून आहे.मग तो रस्त्यावरचा असो वा आयुष्याचा.जेव्हा तुम्ही तुमच्या पात्रता इतक्या,वृद्धींगत कराल की विचलित न होता.नकारात्मक बाबींनां सामोरे जाल.म्हणजे तुम्ही मॅच्युअर्ड झाला आहात.काही लोक असे असतात.एकतर स्वतः दारू पितात आणि म्हणतात नशा खराब आहे.स्वतः काही करित नाही.म्हणतात नशीब खराब आहे.स्वतः चांगले राहत नाही.आणि म्हणतात जमाना खराब आहे.काही लोक खूप विज्ञानवादी शिक्षण घेतात आणि आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला असे सांगतात.चूक त्यांची नसते.कारण शिक्षण विज्ञानवादी घेऊन अज्ञान,अंधश्रद्धा रीतिरिवाज परंपरा कायम स्वरूपी मेंदूमध्ये ठेवतात.त्यानुसार आचरण करतात. म्हणजेच अभ्यास भवनांचा करतात आणि जगात पेपर व्यवहाराचा निघतो.
मरण हे जीवनातील खूप मोठं नुकसान नाही.मोठं नुकसान तेव्हा होत,नाती मरतात आपण जिवंत असताना.ना साला दुःख विकू शकत,ना सुख विकत घेऊ शकत.तरीही जगण्याची इच्छाशक्ती.नाही आवरू शकत.त्याला कधीच दुखमुक्त होता येत नाही. माणसं जीवनात येतात जातात,पण मनातील आरशात जी कैद होतात.ती जिवनाच्या अंतापर्यंत कैदच राहतात.आठवणी कधीच नष्ट होत नाही.म्हणूनच म्हणतात आशेचा किरण कितीही बारीक असला.तरी तो फार आशादायक असतो.निराशेच्या अंधकारात तो प्रेरणा देणारी उर्जा देवुन जातो.म्हणूनच बुद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. आणि दुखमुक्त करतात.कारण बुद्ध आशिर्वाद देत नाही,बुद्ध शाप ही देत नाही.औषधांचा डोस गिळतांनां का बरं घशात अडखळत जातो….?. शिक्षण आणि संस्कार आचरणात दिसत नसतील. तर दोष कोणाला देणार?. शिक्षकांना गुरुजनांना आई वडिलांना की धर्म मानणाऱ्या समाजाला ?.

वैशाख शुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरेची एक तारीख नाही, तर ती मानवी इतिहासातील एका महान “प्रकाशयुगाची” आठवण आहे.याच दिवशी कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला,याच दिवशी बोधगयेच्या पिंपळवृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्ती झाली आणि याच दिवशी कुशीनगर येथे त्यांनी निर्वाण प्राप्त केलं. म्हणूनच ही पौर्णिमा ‘त्रिसंधी’ म्हणून ओळखली जाते – जन्म,बोध आणि निर्वाणाचा संगम.पण या ऐतिहासिक घटनांच्या पलीकडे,बुद्धाचा जीवनप्रवास आणि त्यांचा धम्म म्हणजे मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारा शाश्वत विचार आहे.
आजचा आधुनिक माणूस जेव्हा विज्ञान,तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता,संपत्ती आणि यशाच्या शिखरांवर पोहोचतो,तेव्हा त्याला बाह्य साधनांची प्रचंड भरभराट दिसते,पण त्याचवेळी अंतर्मनात एक खोल अस्वस्थता घर करून बसलेली असते.मानसिक ताण,नातेसंबंधातील तुटणं,सामाजिक असहिष्णुता,जात-धर्माधारित द्वेष,आणि राजकीय फायद्यासाठी फोडले जाणारे समाज हे आजच्या युगाचं वेदनादायी वास्तव आहे. अशा अस्वस्थ काळात बुद्धांच्या करुणामय आणि विवेकनिष्ठ तत्त्वज्ञानाची नितांत आवश्यकता भासते. बुद्ध पौर्णिमेला डोक्यात ज्ञानाचे दिवे लावा,भोंदू भंते लोकांचे ऐकून समुद्रात दिवे सोडून आपल्या डोक्यात निर्बुद्धपणाचा अंधार करू नका.बुध्द धर्म आचरणात आहे,गंडा दोरा,आणि दिवे लावण्यात नाही.जागृत व्हा ! प्रज्ञा, शील, करुणा आणि समाधी चा अभ्यास वाढवा,बुद्ध आचरणात आहे, कर्मकांड आणि शो बाजीत नाही. इतर देशातील बौद्ध बुद्ध पौर्णिमेला कशी साजरी करतात.तशी आपण साजरी केली पाहिजे. तिकडे बुद्ध विहार हे धम्मउपासकांच्या मार्केटिंगचे प्रमुख केंद्र असतात.ते अंधारातून प्रकाशा कडे नेतात. इथे काही शील भ्रष्ट भिख्खू प्रकाशा कडून अंधारा कडे, विज्ञानातून अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांडाकडे नेण्याचा काम करत आहेत. त्यांना राजकीय आशीर्वाद मिळत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी चरथ भिक्खये चारिकम,असायला पाहिजे ते कुठे ही दिसत नाही. वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हणजे जन्म,ज्ञान प्राप्ती आणि निर्वाण यांचा त्रिवेरी संगम. त्याकडे आपण कसे पाहतो. हे खूप महत्वाचे असले पाहिजे.ते गांभीर्य कुठे दिसत नाही. वैशाख शुद्ध पौर्णिमा च्या सर्व धम्म उपासक उपासिक,लोकप्रिय दैनिकाचे प्रिय वाचक यांना हार्दिक मंगल कामना!!!. सर्वांचे मंगल हो !!!.
आयु. सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप.मुंबई धम्म उपासक अभ्यासक प्रचारक

