वारकरी संप्रदायाने आणि भिक्षू संघाने आता समाजाला दिशा दिली पाहिजे!

बातमी शेअर करा.

सध्या भारतीय समाज पाण्यावर तरंगणाऱ्या ओंडक्यासारखा लाट येईल तिकडे भरकटलेला प्रवास करीत आहे. अशा या बिकट प्रवासात व आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून संतश्रेष्ठ, संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या एकमेका सहाय्य करू! अवघे धरू सुपंथ!या संस्कारूपी मुशीत तयार झालेल्या वारकरी संप्रदायाने आणि भगवान गौतम बुद्धाच्या नैतिक आधार असलेल्या ज्ञान कोषात परिपक्व होऊन बसलेल्या भिक्षू संघाने म्हणजेच या दोन समतावादी मत प्रवाहाच्या माध्यमातून व एकजूटीतून घडवलेल्या संस्काराने सुसंस्कारीत अशा सभ्य समाजाची निर्मिती निश्चितपणे होऊ शकते!

     कारण की तसा भारत भूमीचा इतिहासच आहे. तो इतिहास असा आहे की, जेव्हा जेव्हा संतांची मधुर वाणी या भारत भूमीवर सूर धरते तेव्हा-तेव्हा सुसंस्कारी पुरुष जन्माला येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर जेव्हा जगद्गुरु तुकारामाच्या गाथा या भारत भूमीच्या मातीत गर्जू लागल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होऊन रयतेचे रक्षण करणारा असा बहुजन प्रतिपालक राजा जन्माला आला. या राजाने अलूतेदार बलुतेदारांना रोजगार देऊन संरक्षण दिले आणि त्याचबरोबर गाव गाड्यातील एकूणच सर्व जातीसमूहाच्या तरुणांना सोबत घेऊन त्यांच्या हातात शस्त्र तर दिलेच वरून त्यांना प्रशिक्षण  देऊन लढण्यासाठी सुद्धा तरबेज केले होते. आणि तेव्हाच स्वराज्यातून सुराज्याची निर्मिती केली असे महान कार्य संतांच्या वाणीनेच घडून आलेले आहे. हे लक्षात घ्या! त्यानंतर असे अनेक संत जन्मास आले आणि हे भूमी पुणीत झाली. त्यात संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत रविदास, संत गाडगेबाबा अशा अनेक महान संतांच्या मंगल वाणीतुन या भारत भूमीत सुसंस्काराचे बिज पेरल्या गेलेले आहे. विशेष असे की बहुजनातील तरुणांमधे शिक्षणाची जाणीव निर्माण व्हावी म्हणूनच ज्योतिबा फुलें या महापुरुषांने जे शिक्षण विषयक ज्ञान प्रस्तुत केले त्याच ज्योतिबा फुलेंच्या साहित्यातुन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठी प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे आपल्याला भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार मिळाले. हा या भारत भूमीचा इतिहास आहे 

       म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात काँक्रीट स्वरूपात बंधू भावाच्या शिकवणीची पायाभरणी केली आहे. ही आमच्या राष्ट्रसंतांचीच देणगी म्हणावी लागेल. कारण की, तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणत नाहीत का? या भारतात बंधुभाव नित्य वसु दे!दे वरची असा दे! हीच मानवी मूल्य संविधानात आहेत ना! म्हणूनच वाटते की, जिथे आज दोन-तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर आमच्या समाजाची नाव आज चालली तरी कोणत्या खडकावर आदळायला? सोबतच दररोज दलित आदिवासी व अल्पसंख्याकावर होणारे अन्याय अत्याचार चालूच आहेत त्यात भयंकर म्हणजे नित्य रोज कुठे ना कुठे खून खराबा जेव्हा आम्ही युट्युब वर बघतो ना! तेव्हा हा देश एका रक्तरंजित क्रांतीकडे तर वळलेला नाही ना? ही रक्तरंजित क्रांतीची चाहूल तर नाही ना? अशा खूंखार प्रश्नांनी मन कासावीस होऊन या महान भारत देशात सामाजिक क्षती पोहोचते की काय? अशी भीती वाटते त्याचप्रमाणे जातांधळेपणा व धर्मांधळेपणा यामुळे ही इथला सामाजिक एकोपा उद्ध्वस्त तर होणार नाही ना? याही प्रश्नाने मन विषन्न होते. तेव्हा अशा या वाईट घडीला आमच्या आदर्श संतांचे स्मरण करून देण्यासाठी व त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच गेले पाहिजे.असे वाटते! परंतु त्या मार्गाने आमचे बोट धरून नेईल कोण? तर आज आम्हाला त्या कुशल मार्गावर नेण्यासाठीच जर कोणी पात्र वाटत असेल माझ्या मते इथला वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्धाचा भिक्षूसंघ होय! नाही का? असा जेव्हा प्रश्न निर्माण होते तेव्हा या दोन समान मतप्रवाहाशिवाय दुसरा कोणी या देशाचा तारणहार असुच शकत नाही! कशी वाटत असताना मात्र तो भिक्षूसंघ विदत्ता प्रच्यूर आणि तेवढा शील संपन्न असेल, तो चरक भिक्कवे चारिकं बहुजन हीताय, बहुजन सुखाय लोकांनु कंपाय! लोकांनु हीताय याच न्यायाने वागणारा आणि जगणारा असेल तर निश्चितच मानवी कल्याण आहे असे वाटते कारण हे जे दोन मानवतावादी विचार प्रवाह म्हणजे बुद्धाची समतावादी विचारधारा व तुकारामाची समतावादी विचारधारा हे दोन एकमेकांना पूरक विचार प्रवाह एकत्र जर आले तरच आज देशाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात आणि देशातील विचित्र चित्राला आदर्श चित्रात उभे करू शकतात अन्यथा_

जय भीम जय भारत

जीवन बोदडे 9689268620 भांबेरी,जिल्हा अकोला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *