रमाई जयंती कार्यक्रमात पंजाबराव वर लिखीत ‘गाथा रमाईची’ ग्रंथाचे प्रकाशन

बातमी शेअर करा.

‘गाथा रमाईची’ हा ग्रंथ महिलांनी आदर्श घेण्यासारखा : प्रा. भारसाकळे

अकोला : येथील पत्रकार, साहित्यिक, कवी/लेखक पंजाबराव वर लिखीत ‘गाथा रमाईची’ ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन अशोक वाटीका प्रेरणाभुमी संघ अकोला येथील भव्यदिव्य रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे सर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता तसेच प्रदेश सचिव राजेंद्र पातोडे, प्रा. सुरेश मोरे, मा.गटनेते गजानन गवई, संतोष रायबोले, डॉ. न्या.वा. गवई यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला येथे प्रतिष्ठानचे शिल्पकार संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, सचिव अशोक इंगळे, प्राचार्य गणेश बोरकर, प्राचार्य नानवाला सर, व्यवस्थापक तुषार खंडेराव, से.नि. ठाणेदार पी.टी. इंगळे, मा. प्राचार्य मधुकर शिरसाट,वंदनाताई तायडे, सुनंदा वर, या मान्यवरांचे हस्ते शेकडोंच्या उपस्थितीत या भव्य दिव्य रमाई जयंती कार्यक्रमात संपन्न झाले. प्रा. मुकुंद भारसाकळे सरांनी आवाहन केले की, महिलांनी आदर्श घ्यायचा असेल तर माता रमाईचा आदर्श घ्या व प्रत्येक महिलांनी ‘गाथा रमाईची’ हा ग्रंथाचे वाचन केल्यास आपला संसार निश्चीतच सुखाचा होण्यास मदत होईल. रमाईच्या त्यागातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव पदी विराजमान झाले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ‘गाथा रमाईची’ चे कवी/लेखक पंजाबराव वर व त्यांच्या सहचारीणी सुनंदाताई वर या उभयतांचे मन:पूर्वक कौतूक करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

आपला विश्वासू

पंजाबराव वर,९९२२९२४६८४,अकोला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *